बेलापुर (प्रतिनिधी )-येथील खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली असुन या प्रकरणाशी खटोड बंधुचा कुठलाही संबध नसुन त्यांचेवर दाखल झालेला खोटा मागे घेण्यात यावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे केली आहे.या बाबत बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मयत सुनिल गायकवाड याने काही महीन्यापूर्वी खटोड यांच्याकडे झाडे लावण्यासाठी खोदकाम करण्याचे काम घेतले होते त्या वेळी खोदकाम करताना काही प्रमाणात चांदीची नाणी सापडली होती ती रितसर काऱ्यवाही करुन तहसीलदार यांच्या ताब्यात देण्यात आली होती या बाबत विनाकारण वावड्या उठविण्यात आल्या होत्या मयत गायकवाड याने गळफास घेवुन आत्महत्या केली त्या वेळी घरी कुणीही नव्हते त्याचे पती पत्नीमध्ये वाद झाल्यामुळे पत्नी माहेरी गेलेली होती घरी कुणीही नसताना त्याने कौटुंबिक वादातुन आत्महत्या केली असावी परंतु काही बाहेर गावच्या पुढाऱ्यांनी व पत्रकारांनी या प्रकरणास वेगळे वळण देवून खटोड बंधुवर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले ते गुप्तधन तहसीलदार यांच्या ताब्यात दिल्यानंतरही मयत गायकवाड याने प्रतिज्ञापत्र करुन दिले होते त्या नंतर मयत सुनिल गायकवाड व खटोड बंधुचा कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष अथवा फोनद्वारे संपर्क आलेला नाही गायकवाड याच्या आत्महत्येशी खटोड बंधु किंवा त्या गुप्तधनाचा कोणताही संबध नाही मयत सुनिल याने सुसाईड नोटही लिहलेली नाही त्यामुळे त्याच्या आत्महत्येशी खटोड बंधुंचा कुठलाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबध नाही मयत सुनिल गायकवाड याने या बाबत पोलीसांना कसलाही तक्रार अर्ज दिलेला नाही गावातील शांतता भंग व्हावी या करीता बाहेरील काही पुढाऱ्यांनी मयताच्या पत्नीला खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले असुन या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन खोटा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा आम्हाला सनदशिर मार्गाने आंदोलन करावे लागेल असेही निवेदनात म्हटले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांना निवेदन देताना सुनिल मुथा सुधीर नवले अँड शरद सोमाणी भरत साळूंके अजय डाकले अशोक पवार जावेद शेख शेषराव पवार ज्ञानदेव वाबळे जाकीर शेख प्रकाश जाजू प्रसाद खरात प्रशांत लढ्ढा शांतीलाल हिरण दत्ता कुऱ्हे उपस्थित होते.
Post a Comment