Latest Post

कोल्हार :-(प्रतिनिधी)  आज सकाळी कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदिवरील जुन्या पुलावर निबे वस्ती च्या समोर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदरची घटना कळताच कोल्हार पोलीस स्टेशनचे श्री.लबडे साहेब व श्री कुसळकर साहेब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृत व्यक्ती जवळील सामानाची पीशवी तपासली असता त्यात मिळुन आलेल्या डायरीवरून त्यांनी मृत व्यक्तीकोन आहे याचा शोध लावला.सदर मृत व्यक्तीचे नाव हे किसन यादवराव साबळे असुन ते मु/पो- पानेवाडी, ता- घनसांगवी, जिल्हा- जालना येथील होते.

श्रीरामपुर । प्रतिनिधि - महाराष्ट्र शासनाचे कोरोना संबंधित प्रतिबंध आदेशान्वये आपले कार्यालयाकडून श्रीरामपूर शहरातील काही दुकाने सिल करणेत आलेली आहेत . त्या अनुषंगाने आपणांस या निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की , आपले स्तरावरुन जी कार्यवाही करणेत आली ती कायद्याचे दृष्टीने योग्य आहे . परंतू सध्या कोरोना महामारीमुळे सर्वच नागरिकांना त्याचा खुपच मनस्ताप सहन करावा लागतो . त्यामुळे कुटूंबाचे उदरनिर्वाह होणेकामी सर्वसामान्य नागरिक , दुकानदार यांचेकडून काही येळेस कायद्याचे उल्लंघन होत असते . सबब या नम्र निवेदनास कारण की , आपण संबंधित दुकानदार , नागरिकांचा हा पहिलाच गुन्हा समजून त्यांना आपले स्तरावरुन माफी देऊन यापुळे त्यांचेकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याबाबत समज देण्यात यावी व दूकाने सिल मुक्त करावी ही नम्र विनंती तरी साहेबांना ह्या निवेदनाचा गांभिर्याने विचार होऊन आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी त्यावेळी समाजवादी पार्टी चे  उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार,तालुकाध्यक्ष आसिफ तंबोली,शहराध्यक्ष अय्युब पठान, अब्दुल सैय्यद, मतीन शेख, शाहिद खान,परवेज शेख, तबरेज शेख, फिरोज शेख,इमरान शेख,अल्तमश शेख, नाजिम शेख,या निवेदनातआदिचे सह्य आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये या करीता जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी घालून दिलेले वेळेचे बंधन न पाळल्यामुळे बेलापूर गावातील पाच दुकाने सिल करण्यात आली आहे महसुलच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी दुकान उघडे ठेवण्यासाठी दुपारी चारची वेळ दिलेली असतानाही अनेक दुकानदार दुकानाचा एक दरवाजा एक फळी उघडी ठेवुन व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे व कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागल्यामुळे जिल्हाधिकारी यानी कडक निर्बंध घालून दिले आहेत ठरवुन दिलेल्या वेळेनंतर दुकान उघडे असल्यास दुकाने सिल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत बेलापूर येथील चिकन शाँप हे दुपारी चार नंतरही सुरु असल्याचे व वारवार सांगुनहीचार नंतर दुकान सुरुच ठेवल्यामुळे लकी चिकन सेंटर गुडलक चिकन सेंटरडेली फ्रेश चिकन सेंटर ए नव चिकन शाँप सुपर चिकन शाँप ही दुकाने शासनाने ठरवुन दिलेल्या वेळे व्यतिरीक्त उघडी ठेवुन नियामाचा भंग केला जात असल्याचा आहवाल पोलीसांनी तहासील कार्यालय श्रीरामपुर येथे पाठविला होता तससीलदार प्रशांत पाटील यांनी ही दुकाने तातडीने सिल करण्याचे आदेश मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी यांना दिले त्या नंतर आज दुपारी मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे यांनी बेलापुर पोलीसांना सोबत घेवुन हे पाचही दुकाने सिल केली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे कोरोना परिस्थितीत व्यापारी वर्ग हा मेटाकुटीस आलेला असताना आता प्रशासनाने ही कठोर कारवाई केल्यामुळे आता प्रपंच कसे चालवावे असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावातीलच एका २२ वर्षीय मुलाने आपल्या १४ वर्ष वयाच्या मुलीला फुस लावुन पळवुन नेले असुन या घटनेला चौदा दिवस उलटून गेलेले आहे अजुनही मुलीचा तपास लागलेला नाही माझ्या मुलीला शोधुन आणा हो साहेब अशी आर्त हाक मुलीच्या आईने पोलीस अधिकाऱ्यांना घातली. बेलापुर येथील एका अल्पवयीन मुलीस गावातीलच एका तरुणाने फुस लावुन पळवुन नेले अजुनही या घटनेचा तपास लागेना त्यामुळे परिवाराचा जिव टांगणीला लागला आहे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी उपविभागीय पोलीस आधिकारी संदीप मिटके यांच्याशी मुलीच्या आईची भेट घडवुन आणली त्या वेळी मुलीच्या आईने माझी मुलगी अल्पवयीन असुन तिला लिहता वाचता काहीच येत नाही मोबाईलही लावता येत नाही तिच्या जिवाला धोका असुन माझ्या मुलीचा शोध लावा हो साहेब या गरीब मातेला न्याय मिळवून द्या साहेब अशी विनवणी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना केली त्या वेळी लवकरात लवकर तुमच्या मुलीला तुमच्या स्वाधीन करु अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाचीही मदत घेवुन मुलीचा शोध लावु काळजी करु नका  असे अश्वासन मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांना दिले या वेळी तातडीने मुलीचा शोध लावावा नाही तर ग्रामस्थांना आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल असे जि प सदस्य शरद नवले यांनी सांगीतले या वेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पत्रकार देविदास देसाई सुनिल मुथा दिलीप दायमा प्रफुल्ल डावरे सचिन वाघ विशाल आंबेकर रमेश अमोलीक राहुल माळवदे गणेश फुलबाठीया रोहीत शिंदे मुलीचे नातेवाईक पदमावती साळूंके ज्ञानेश्वर पवार रामा पवार नवनाथ पवार विलास पवार भगवान पवार अक्षय पवार विश्वास पवार लहानुबाई पवार जालींदर पवार बेलापुर पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे हरिष पानसंबळ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )- तहसील कार्यालयातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले त्यांच्याच कमाच्या रुपाने मला उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला असुन तो पुरस्कार माझ्यावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील जनतेचा पुरस्कार आहे अशा शब्दात तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या                महसुल दिनानिमित्त श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला त्याबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते  या  वेळी बोलताना तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की तालुक्याचा तहसीलदार म्हणून काम करत असताना शासकीय कामकाजा व्यतिरिक्त  जनतेची गऱ्हाणी अडचणी सोडविण्याचे काम मी केले अन त्या कामाची जेव्हा बातमी झाली मी कार्यालयात आलेल्या आजीची विचारपुस केली तिची किरकोळ समस्या होती ती सोडविली हे फार काही वेगळे काम केले असे मला वाटत नाही माझ्या परिवाराचे माझ्यावर संस्कारच असे झालेले आहेत की आपल्याकडे कुणीही समस्या घेवुन आला तर त्याचे समाधान करणे हे माझे पहीले कर्तव्य आहे अनेकांशी शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी व्यवस्थित बोलले विचारपुस केली योग्य सल्ला दिला तरी समोरील व्यक्तीचे समाधान होत असते तहसीलदार ही एक संस्था आहे या संस्थेत शिपायापासून ते नायब तहसीलदार या सर्वांनी आपणास ठरवून दिलेले काम योग्य वेळेत पार पाडले म्हणून मला हा सन्मान मिळाला हा सन्मान सर्व महसुल कर्मचाऱ्यांचा आहे तालुक्यातील जनतेचा आहे ज्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली सकारात्मक विचार ठेवुन काम केले तर त्या कामाचा आनंद वेगळाच असतो माझ्या शिपायाने कर्मचाऱ्यांनी जेव्हा एखाद्या सर्वसामान्य नागरीकाचे काम केले ही जेव्हा बातमी होईल तेव्हाच मी तहसीलदार असल्याचा मला अभिमान वाटेल असेही पाटील म्हणाले या वेळी उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून सन्मान मिळालेले बेलापुरचे मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कोरोना योध्दा पुरस्कार मिळालेले प स सदस्य अरुण पा नाईक पदोन्नती मिळालेले कामगार तलाठी वायखिंडे यांचाही सन्मान करण्यात आला या वेळी जि प सदस्य शरद नवले रणजीत श्रीगोड अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी आदिंनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शरद नवले,अरुण पाटील नाईक,रणजित श्रीगोड,महेंद्र साळवी,अभिषेक खंडागळे,अशोक प्रधान, पुरुषोत्तम भराटे,देविदास देसाई,सुहास शेलार,दिलीप दायमा,किशोर कदम,कामगार तलाठी कैलास खाडे,रमेश अमोलिक, मुस्ताक शेख,मोहसिन सय्यद, मिलिंद दुधाळ,शफीक बागवान,नितीन नवले,अजीज शेख,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,सतीश काळे,योगेश जाधव,अन्वर बागवान,रावसाहेब अमोलिक,महेश कु-हे,शांतवन अमोलिक,तस्वर बागवान,नाना तुवर,युनूस शेख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन देविदास देसाई यांनी केले तर उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी आभार मानले.

श्रीरामपुर (  प्रतिनिधी )- एकाच क्यू आर कोडच्या अधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ऐ पी अँटोमोटीव्ह या स्पीड गव्हर्नरने वाहनधारका बरोबरच शासनाचीही फसवणूक केली असुन संबधीतावर कारवाई न केल्यास प्रादेशिक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जरीया फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेला आहे. जरीया फाऊंडेशनच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की ए पी अँटोमोटीक यांना स्पीड गव्हर्नर म्हणून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार दिलेले आहेत या अधिकाराचा दुरुपयोग करुन त्यांनी शासनाची फसवणूक तर केलीच शिवाय भरमसाठ पैसे घेवून वाहनधारकाची देखील फसवणूक केलेली आहे प्रमाणपत्र देताना एकाच क्यू आर कोडचा वापर करुन अनेकांना प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यात शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक  नुकसान झालेले आहे अशा व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे असताना काही अधिकारी त्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत गंभीर दोष आढळले असताना त्याचा परवाना निलंबीत केला होता परवाना निलंबीत असतानाही संबधीताने अनाधिकाराने दोन वाहनधारकांना प्रमाणपत्र दिले आहे या सर्व बाबींची चौकशी होवुन संबधीतावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तो कारवाई केल्यास  धमक्या देत आहे अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी नाही तर आम्हाला उचित न्याय मागण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति परिवहन मंत्री प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन आयुक्त यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.


अहमदनगर(प्रतिनिधी)- सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा व मोक्का गुन्ह्यातील एका आरोपीला शिराळा (ता. पाथर्डी) शिवारात पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे (रा. आडगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा प्रकरणी आठ आरोपीविरोधात मोक्का कलमान्वये कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपींना यापूर्वी अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी या गुन्ह्यातील आरोपी विक्रम गायकवाड, बाबा आढाव यांना भिंगार पोलिसांनी नगर तालुक्यातील वाळूंज शिवारात अटक केली होती. यातील एकमात्र आरोपी बाळासाहेब भिंगारदिवे पसार होता. तो पाथर्डी तालुक्यातील शिराळा गावामध्ये आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी मनोहर शेजवळ, भाऊसाहेब कुरूंद, संदीप घोडके, सुरेश माळी, संतोष लोंढे, जालिंदर माने, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने भिंगारदिवे याला अटक केली.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget