बेलापुर (प्रतिनिधी )- तहसील कार्यालयातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले त्यांच्याच कमाच्या रुपाने मला उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला असुन तो पुरस्कार माझ्यावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील जनतेचा पुरस्कार आहे अशा शब्दात तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महसुल दिनानिमित्त श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला त्याबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते या वेळी बोलताना तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की तालुक्याचा तहसीलदार म्हणून काम करत असताना शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जनतेची गऱ्हाणी अडचणी सोडविण्याचे काम मी केले अन त्या कामाची जेव्हा बातमी झाली मी कार्यालयात आलेल्या आजीची विचारपुस केली तिची किरकोळ समस्या होती ती सोडविली हे फार काही वेगळे काम केले असे मला वाटत नाही माझ्या परिवाराचे माझ्यावर संस्कारच असे झालेले आहेत की आपल्याकडे कुणीही समस्या घेवुन आला तर त्याचे समाधान करणे हे माझे पहीले कर्तव्य आहे अनेकांशी शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी व्यवस्थित बोलले विचारपुस केली योग्य सल्ला दिला तरी समोरील व्यक्तीचे समाधान होत असते तहसीलदार ही एक संस्था आहे या संस्थेत शिपायापासून ते नायब तहसीलदार या सर्वांनी आपणास ठरवून दिलेले काम योग्य वेळेत पार पाडले म्हणून मला हा सन्मान मिळाला हा सन्मान सर्व महसुल कर्मचाऱ्यांचा आहे तालुक्यातील जनतेचा आहे ज्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली सकारात्मक विचार ठेवुन काम केले तर त्या कामाचा आनंद वेगळाच असतो माझ्या शिपायाने कर्मचाऱ्यांनी जेव्हा एखाद्या सर्वसामान्य नागरीकाचे काम केले ही जेव्हा बातमी होईल तेव्हाच मी तहसीलदार असल्याचा मला अभिमान वाटेल असेही पाटील म्हणाले या वेळी उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून सन्मान मिळालेले बेलापुरचे मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कोरोना योध्दा पुरस्कार मिळालेले प स सदस्य अरुण पा नाईक पदोन्नती मिळालेले कामगार तलाठी वायखिंडे यांचाही सन्मान करण्यात आला या वेळी जि प सदस्य शरद नवले रणजीत श्रीगोड अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी आदिंनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शरद नवले,अरुण पाटील नाईक,रणजित श्रीगोड,महेंद्र साळवी,अभिषेक खंडागळे,अशोक प्रधान, पुरुषोत्तम भराटे,देविदास देसाई,सुहास शेलार,दिलीप दायमा,किशोर कदम,कामगार तलाठी कैलास खाडे,रमेश अमोलिक, मुस्ताक शेख,मोहसिन सय्यद, मिलिंद दुधाळ,शफीक बागवान,नितीन नवले,अजीज शेख,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,सतीश काळे,योगेश जाधव,अन्वर बागवान,रावसाहेब अमोलिक,महेश कु-हे,शांतवन अमोलिक,तस्वर बागवान,नाना तुवर,युनूस शेख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन देविदास देसाई यांनी केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.
Post a Comment