बेलापुर (प्रतिनिधी )-गावातीलच एका २२ वर्षीय मुलाने आपल्या १४ वर्ष वयाच्या मुलीला फुस लावुन पळवुन नेले असुन या घटनेला चौदा दिवस उलटून गेलेले आहे अजुनही मुलीचा तपास लागलेला नाही माझ्या मुलीला शोधुन आणा हो साहेब अशी आर्त हाक मुलीच्या आईने पोलीस अधिकाऱ्यांना घातली. बेलापुर येथील एका अल्पवयीन मुलीस गावातीलच एका तरुणाने फुस लावुन पळवुन नेले अजुनही या घटनेचा तपास लागेना त्यामुळे परिवाराचा जिव टांगणीला लागला आहे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी उपविभागीय पोलीस आधिकारी संदीप मिटके यांच्याशी मुलीच्या आईची भेट घडवुन आणली त्या वेळी मुलीच्या आईने माझी मुलगी अल्पवयीन असुन तिला लिहता वाचता काहीच येत नाही मोबाईलही लावता येत नाही तिच्या जिवाला धोका असुन माझ्या मुलीचा शोध लावा हो साहेब या गरीब मातेला न्याय मिळवून द्या साहेब अशी विनवणी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना केली त्या वेळी लवकरात लवकर तुमच्या मुलीला तुमच्या स्वाधीन करु अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाचीही मदत घेवुन मुलीचा शोध लावु काळजी करु नका असे अश्वासन मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांना दिले या वेळी तातडीने मुलीचा शोध लावावा नाही तर ग्रामस्थांना आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल असे जि प सदस्य शरद नवले यांनी सांगीतले या वेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पत्रकार देविदास देसाई सुनिल मुथा दिलीप दायमा प्रफुल्ल डावरे सचिन वाघ विशाल आंबेकर रमेश अमोलीक राहुल माळवदे गणेश फुलबाठीया रोहीत शिंदे मुलीचे नातेवाईक पदमावती साळूंके ज्ञानेश्वर पवार रामा पवार नवनाथ पवार विलास पवार भगवान पवार अक्षय पवार विश्वास पवार लहानुबाई पवार जालींदर पवार बेलापुर पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे हरिष पानसंबळ उपस्थित होते.
Post a Comment