श्रीरामपुर । प्रतिनिधि - महाराष्ट्र शासनाचे कोरोना संबंधित प्रतिबंध आदेशान्वये आपले कार्यालयाकडून श्रीरामपूर शहरातील काही दुकाने सिल करणेत आलेली आहेत . त्या अनुषंगाने आपणांस या निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की , आपले स्तरावरुन जी कार्यवाही करणेत आली ती कायद्याचे दृष्टीने योग्य आहे . परंतू सध्या कोरोना महामारीमुळे सर्वच नागरिकांना त्याचा खुपच मनस्ताप सहन करावा लागतो . त्यामुळे कुटूंबाचे उदरनिर्वाह होणेकामी सर्वसामान्य नागरिक , दुकानदार यांचेकडून काही येळेस कायद्याचे उल्लंघन होत असते . सबब या नम्र निवेदनास कारण की , आपण संबंधित दुकानदार , नागरिकांचा हा पहिलाच गुन्हा समजून त्यांना आपले स्तरावरुन माफी देऊन यापुळे त्यांचेकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याबाबत समज देण्यात यावी व दूकाने सिल मुक्त करावी ही नम्र विनंती तरी साहेबांना ह्या निवेदनाचा गांभिर्याने विचार होऊन आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी त्यावेळी समाजवादी पार्टी चे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार,तालुकाध्यक्ष आसिफ तंबोली,शहराध्यक्ष अय्युब पठान, अब्दुल सैय्यद, मतीन शेख, शाहिद खान,परवेज शेख, तबरेज शेख, फिरोज शेख,इमरान शेख,अल्तमश शेख, नाजिम शेख,या निवेदनातआदिचे सह्य आहे.
Post a Comment