Latest Post

दिनांक 13 श्रीरामपूर प्रतिनिधी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरामध्ये आज पोलिसांनी शहरातील तसेच मुख्य मार्गावर पोलीस संचलन केले.

उद्या सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे. प्रत्येक ठिकाणी चोख असा पोलिस बंदोबस्त सुद्धा करण्यात आला असून महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.आज श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सावंत यांच्या नेतृत्व खाली   श्रीरामपूर शहरामध्ये    पोलिसांच्या पथकाने व त्यांच्या समवेत राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी श्रीरामपूर शहरातून संचलन केले श्रीरामपूर शहरातील मुख्य अशा साई बाबा चौक मौलाना आझाद चौक वाड नंबर 2 मिल्लात नगर या परिसरातून पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत शहरातील मुख्य मार्गावर सुद्धा हे संचलन करण्यात आले.


मी जितेश लोकचंदानी गेली १५ (पुर्वी माहिती अधिकार अध्यादेश २००२ आणि नंतर माहिती अधिकार कायदा २००५ ) ते १८ वर्षांपासून माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कामे करत आहे, मी अनेक प्रकरण माहिती अधिकारात माहिती काढून त्याचा पाठपुरावा करून यातील एकाचे भ्रष्टाचार प्रकरण आज रोजी हायकोर्टात प्रलंबित तथा न्याय प्रविष्ट आहे, मी दैनिक साईदर्शनमध्ये निर्भिड लेखणीद्वारे अनेक प्रकरण गाजवले आहेत, त्यातील शिर्डीतील कुप्रसिद्ध गुंड तथा सराईत गुन्हेगार पाप्या शेख पासून ते शिर्डीच्या गुन्हेगारी जगतापर्यंत आपल्या प्राणांची पर्वा न करता सामाजातील निच प्रवृतीचा नायनाट करण्याकामी अनेक अव्हाने पत्करली आहेत, मात्र आजवर माझ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल नाही आणि होणारही नव्हता,कारण माझी पत्रकारीता ही स्वफायदाची नव्हेतर समाजहिताची आहे हे सर्वश्रृत आहे,सर्वांना चांगले ठाऊक आहे, त्यामुळे कोणी तक्रारच काय साधा संशय देखील घेऊ शकत नाही ही प्रामाणिकता मी जपलेली आहे आणि जपतच राहणार आहे, मात्र सदरील प्रकरणी या तक्रारी् मागील खरे आणि सत्य कारण असे वाटते की, श्रीसाईबाबांच्या पुन्य

पावनभूमी असलेल्या शिर्डी शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या आडमाप अवैद्य व्यवसायांविरोधात मी अनेकदा तक्रार अर्ज दिले तथा उपोषणे केली आहेत या वर्षीच २६ जानेवारीला मी शिर्डीतील अवैध व्यवसाय बंद व्हावेत याकरीता शिर्डी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास छेडले होते, त्यावेळी शिर्डीचे पोलीस उप विभागीय अधिकारी श्री. संजय सातव यांनी माझ्या मागणीची दखल घेऊन शिर्डीत चालत असलेले अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी एक विशेष पथक नेमले होते, त्या पथकाने सुरुवातीला अनेक हातभट्टी दारु आणि मटकावाल्यांवर कारवाया केल्या, मात्र नंतर ही मोहीम थंडावली, त्याची मी पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिल्याने शिर्डीचे पी आय यांची बहुतेक याच प्रकरणी बदली झाली असावी,आणि याचाच राग मनात धरुन त्यांनी रुई येथील सरपंचाच्या आरोपांची कुठल्याही प्रकारची शाहानिशा न करता अक्षरश: खोटी तक्रार दाखल करुन घेतली, कारण की या सरपंचाला दैनिक साईदर्शन विशेषांकात प्रकाशित जाहिरातीचे पेमेंट द्यावयाचे नव्हते, आणि शिर्डीचे पी.आय. प्रवीण लोखंडे यांना माहीत झाले असावे की शिर्डीतील अवैध व्यावसायांना पाठिशी घातल्या प्रकरणी आपली बदली होणार आहे, म्हणून  शिर्डीतील अवैध व्यवसाय बंद केल्याचा राग मनात धरुन माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करुन घेतली असावी ?, अशी शंका मनात निर्माण झालेली आहे, या प्रकरणाची देखील सखोल चौकशी होण्याकामी मी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे, यात जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी मी शेवट पर्यंत लढा देणार असून कोणी कितीही मोठा असो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, म्हणून कोणी स्वत:ला मोठा समजू नये, असे कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी मी माझे कार्य सुरूच ठेवणार आहे,

मात्र शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करतेवेळी कुठले पुरावे सदरील सरपंचाकडून घेतले ?, कुठले कॉल रेकॉर्ड्स, घेतले ?, सरपंचाकडे असे कोणतेच ठोस पुरावे नसताना, पोलिसांनी हा जो गुन्हा दाखल केला आहे त्याचे खरे कारण मी पहीलेच वर नमूद केले आहे, आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याचा तपास जे अवैध व्यवसाय बंद करण्याकामी पोलिस पथक नेमले होते, त्याच पथकप्रमुखाकडे सदरील प्रकरणी तपास दिला गेला असल्याने स्पष्ट होते की हे सर्व जाणून बुजून हेतुपुरस्सर मला बदनाम करण्याच्या मोठे षडयंत्र रचले गेले आहे, मात्र मी देखील दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय स्तब्ध बसणार नाही,हे ही तीतकचं सत्य आहे...................................लोकचंदाणीवर खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी रुईचे सरपंच संदीप वाबळे विरोधात आब्रू नुकसान भरपाई दावा दाखल !                                                  शिर्डी येथून गेल्या दहा - आकरा वर्षांपासून दैनिक साईदर्शन हे वृत्तपत्र सातत्याने प्रकाशित होत आहे, या वृत्तपत्राने आजवर अनेक गैरकारभार/भ्रष्टाचार  उघडकीस आणले आहेत,अनेक गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, आणि शिर्डीतील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करणेकामी या वृत्तपत्राने आजवर मोठी भुमिका पार पाडली आहे,तथा यापुढे देखील हा लढा सुरूच राहणार आहे, 

दैनिक साईदर्शन या दैनिकाचे २६ जानेवारी २०२१ रोजी वर्धापनदिन होते, त्या वर्धापनदिनानिमित्त शिर्डी व परिसरातील अनेक मान्यवरांनी दैनिकास शुभेच्छा रुपी जाहिराती दिल्या, त्यात रुई ग्रामपंचायतीने देखील शुभेच्छा जाहिरात दिली,  त्याच शुभेच्छा जाहिरातीचे रुपये ६०००/- सहा हजाराचे बिल रुई ग्रामपंचायतीला आमचे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल यांनी रुई येथे जाऊन दिले होते, आणि जाहिरात पेमेंटबाबत सरपंच  संदीप वाबळे याच्याकडे मागणी केली असता,वाबळे म्हणाला की, मी स्वतः शिर्डीला आलो की आपले जाहिरातीचे पेमेंट देतो, त्यास अनेक दिवस उलटून गेले तरी वाबळे याने जाहिरातीचे पेमेंट दिले नाही, त्यावर मी  वाबळे याला फोन करून जाहिरातीचे पेमेंट मागितले, त्यावर वाबळे हा  जाहिरात पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले म्हणून मी रुई येथे ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये गेलो असता तेथे सरपंच वाबळे हा बसलेले होता त्याने आम्हास चहा,पाणी करत पाहुणचारही केला, व आपले जाहिरातीचे पेमेंट एक दोन दिवसांत शिर्डीत पोहोच करतो असे म्हणाला, त्यानंतरही श्री. वाबळे यांनी अद्यापही जाहिरातीचे पेमेंट दिले नाही, मात्र जाहिरातीचे पेमेंट मागितल्याचा राग आल्याने तथा रुई ग्रामपंचायतीस माहिती मागणीचा अर्ज दिल्याने याचा त्याला राग धरुन दिनांक 12/05/2021 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला माझ्याविरोधात तब्बल पंधरा दिवसानंतर खोटी फिर्याद दाखल केली, त्यात त्याने म्हटले आहे की, जितेश लोकचंदानी म्हणजे मी त्यांच्याकडून खंडणी मागितली आहे, मात्र सदरील प्रकरणी रुई ग्रामपंचायतीने दिलेल्या जाहिरातीचे कात्रण आणि त्या जाहिरातीचे रितसर बिल दिले असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे,वाबळे याला जाहिरातीचे पेमेंट देण्याचे जीवावर आल्याने शुध्डबुध्दीने हा गुन्हा दाखल केला असल्याने मी त्याच दिवशी शिर्डी पोलीस स्टेशनलावाबळे यांच्या विरोधात भादंवि कलम ४९९,५००,१८२,२११ प्रमाणे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे, माझे काम प्रामाणिक असून गेल्या दहा,अकरा वर्षांत कोणीही असा आरोप केला नाही की कोणी तक्रार दिली नाही, आणि माझे लिखाण गुन्हेगारी व जेथे काही गैरकारभार झाला व चालु आहे तर याविरुद्ध मी निर्पेक्षतेने लिखाण करीत असतो तथा करीत राहाणारच असे कितीही खोटे गुन्हे दाखल करुन पत्रकारीतेचा खरा आवाज दाबणे कोणासही शक्य नाही, त्यामुळे काहीही झाले तरी माझे या गैरकारभाऱ्या आणि  भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध लिखाण हे सुरु राहणारच आहे,.........................माहिती अधिकारात माहिती मागीतल्याचा राग आल्याने, सरपंचाकरवी खंडणीची खोटी फिर्याद 


जितेश लोकचंदानी हे नेहमी

आमचे गांवाच्या ग्रामपंचयात कार्यालयात येवून विनाकारण कोणतीही उलटसुलट माहीती विचारत असतात.त्यांचे दैनिक साईदर्शन हे सांयदैनिक म्हणुन

प्रसिद्ध केले जाते तसेच saidarshan.com.in या संकेत स्थळावर देखील प्रसिद्ध केले जाते, दिनांक  09/04/2021 रोजी 12/00 वाजेच्या सुमारास रुई ग्रामपंचायतीमध्ये आले असता ग्रामपंचायतीमध्ये मी सरपंच,,,,, तसेच उपसरपंच सिताराम चंद्रसेन कडू, सदस्य ज्ञाननेश्वर वाबळे, ग्रामविकास अधिकारी सांगळे, गावकरी बाळकृष्ण सुराळे,अनिल कोळपे असे उपस्थित होतो . त्यावेळी तेथे जितेश मनोहरलाल लोकचंदानी हे आले व माझे सोबत चर्चा करु लागले, तेव्हा चर्चा करताना ते म्हणाले की माझे दैनिक साईदर्शन या वृत्तपत्राचा वर्धापनदिन आहे, आणि मी तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयाच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहे. त्यासाठी

तुम्ही मला तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयातर्फे 10,000/- (रुपये दहा हजार) द्या असे म्हणाले, तेव्हा मी त्यांना सांगितले की तुमचे आणि आमचे ग्रामपंचयात

कार्यालयाचा काही एक संबंध नाही, आम्ही तुम्हाला बातम्या देण्याचे कधी सांगितले नाही, त्यामुळे आमचे ग्रामपंचयात कार्यालयाकडून तुम्हाला पैसे

मिळणार नाही असे सांगितले, तेव्हा तो मला जोराच्या आवाजात म्हणाला सरपंच हे तुम्हाला खुप महाग पडेल, मी तुमचे ग्रामपंचयात कार्यालयाचे

मागे लागेल, माहीती अधिकारात माहीती विचारुन त्रास देईल, तुमचा सर्व भ्रष्टाचार बाहेर काढील अशी धमकी देवुन तो निघुन गेला, त्यानंतर जितेश

मनोहरलाल लोकचंदानी यांनी त्यांचे मो नं 8329480310 वरुन माझे मो. नं 8888000800 वर दिनांक 08/04/2021 रोजी पासुन दिनांक 25/04/2021 रोजी

पावेतो, वेळोवेळी मला नेहमी फोन करुन त्यांचे दैनिक साईदर्शन या वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमीत्त 10,000/- दहा हजार रुपयाची खंडणीसाठी त्रास दिला आहे, त्यानंतर दिनांक 27/04/2021 रोजी मी सरपंच,,,, तसेच उपसरपंच , सदस्य, गावकरी व ग्रामविकास अधिकारी सांगळे , लिपीक स्वप्निल दुर्शीग असे रुई

ग्रामपंचयात कार्यालयात असताना त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सर्वासमक्ष मला 10,000/- दहा हजार रुपयांची खंडणी मागितली तेव्हा मी त्यांना पैसे देण्यास

नकार दिला, त्यांना त्याचा राग आल्याने तो मला म्हणाला तुम्ही मला पैसे द्या नाहीतर मी तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयाच्या खोट्या बातम्या छापुन बदनामी करील अशी धमकी देवुन माहीती अधिकारात अर्ज देवुन रागाने तेथुन निघुन गेला, त्यानंतर त्याने दि 06/05/2021 रोजी त्यांच्या

दैनिक साईदर्शन या वृत्तपत्रामध्ये भरपेट गैरकारभार करुन पाउला शासनाच्या तिजोरीला खड्डा, रुई ग्रामपंचयात झाला की काय गैरकारभा-यांचा अड्डा ?

अशी मोठ्या अक्षरात बातमी देवुन रुई ग्रामपंचयात कार्यालयाअंतर्गत मागील काही वर्षापासुन करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाचे झाले असुन या कामांचा सर्व निधी ठेकेदारांशी संगनमत करुन ग्रामपंचयात कार्यालयाचे कारभारी यांनी त्यांचे खिशात भरला जात असले बाबत बातमी करुन आमचे कई ग्रामपंचयात कार्यालयाची बदनामी केली आहे.असे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे,

माहिती अधिकारात माहिती मागीतल्याचा राग येवून तथा माहिती दिल्याने आपल्या ग्रामपंचाय कार्यालयातील गैरकारभार उघड होऊन भ्रष्टाचार चव्हाट्यावर येईल ?, म्हणून संबंधित सरपंच यांच्याकरवी लोकचंदानी यांनी खंडणी मागीतल्याचा खोटा गुन्हा दाखल करणेकामी कुठलीही शाहनिशा न करता शिर्डी पोलिसांत खोटी फिर्याद दाखल केली आहे.


ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध एक जून 2021 पर्यंत अमलात राहणार.मुंबई, दि. 13 : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमीत करण्यात आला आहे.29 एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी हे निर्बंध दि.15 मे पर्यंत लागू करण्यात आले होते, तसेच नवीन मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आले होते. आता हे निर्बंध 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कायम असतील. साथरोग अधिनियम-1897,  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी अनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ‘ब्रेक दि चेन’ संबंधी 13 एप्रिल 2021, 21 एप्रिल 2021 व तद्‌नंतर 29 एप्रिल 2021 रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध 1 जून 2021 पर्यंत लागू राहतील. त्या व्यतिरिक्त पुढील निर्बंधही लागू करण्यात आले आहे.

* कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

*   यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

* मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्रच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
* स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याच्या निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
*  दुध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दुध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
*  कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील लोकांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
*  स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (‘एसडीएमए’) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- खा सदाशिव लोखंडे याच्याकडे अम्बुलन्स मागणे गैर नाही पण ती मागणी करताना चुकीची पद्धत वापरल्याने गुन्हा दाखल करावा लागला असल्याचे मत शिवसेनेचे मा .उपजिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील देवकर यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना व्यक्त केले 

काल सायंकाळी काही तरूणांनी  खासदार लोखंडे  साहेब बंगल्यात असताना अनाधिकृत पणे गेटला लाथा मारून आत प्रवेश केला तसेच वॉचमनला दमदाटी केली त्यांच्या अंगरक्षकाला शिवीगाळ करून अंगावर धाऊन गेले हे सर्व कशासाठी केले कुणाच्या सांगण्यावरून केले याची चौकशी झाली पाहिजे

त्यानी खा सदाशिव लोखंडे यांच्या कडे रितसर अम्बुलन्स ची मागणी करणे अपेक्षित होते परंतु दादागिरी करून अम्बुलन्सची मागणी गावकऱ्यांना देखील उचित  वाटते का ?  आणि अशी  मागणी करणाऱ्यानी  आधी गावासाठी काय केले ते सांगा असा सवाल देवकर केला आहे.

 खा सदाशिव लोखंडे  यांनी जीवाची पर्वा न करत मतदारसंघात कोव्हीड साठी फिरत आहेत पढेगाव येथील नुकत्याच चालू झालेल्या कोविड सेंटर ला खासदार लोखंडे यांनी बेड पीपीई किट आणि औषधांचा  साठा देऊन पढेगाव वाशीयांना मदत केलेली आहे, त्यावेळी हे बोंबा मारणारे कोठे होते  संबधीताने  कुठल्याही प्रकारे अम्ब्युलन्स ची मागणी केलेली नव्हती यामागे राजकीय हात गुंतलेले आहेत या पूर्वी  कधी अम्बुलन्स साठी या तरूणानी निवेदन दिले होते का ? अचानक प्रसिद्धीसाठी त्याच्या बंगल्यात अनाधिकृत पणे घुसून दादागिरी करून अम्बुलन्स मागणे यामध्ये केवळ राजकारण आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजेंद्र देवकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक याच्याकडे केली असुन

 खा सदाशिव लोखंडे याचे ऑफिस व घर 24 तास मतदारसंघातील जनतेसाठी खूले असल्याचेही देवकर यांनी म्हटले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सर्व मंत्री खासदार आमदार हे कोरोना महामारीत लोकांना आधार देत असतानाच शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अँम्बुलन्स मागण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल करुन काय साध्य केले असा सवाल पढेगाव भेर्डापुर उंबरगाव बेलापुर व परिसरातील नागरीकांनी विचारला आहे                                      पढेगाव येथील सामाजिक कार्यक्रम उदय लिप्टे हे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे रुग्णाना ने आण करण्याकरीता अँम्बुलन्सची मागणी करण्यासाठी गेले गेले त्या वेळी तेथे दोन गाड्या उभ्या असल्याचे लीप्टे यांच्या लक्षात आले त्यांनी त्या गाड्याजवळ उभे राहुन फोटो काढले त्याचा राग आल्यामुळे लिप्टे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आपल्या कामा बाबतच्या अडचणी आमदार खासदार यांच्याकडे नाही मांडायच्या तर कुणाकडे असा संतप्त सवाल प्रवरा परिसरातील नागरीकांनी केला असुन खासदारांच्या दबावाला बळी पडून पोलीसांनी खोटा गुन्हा दाखल करुन काही नागरीकांना विनाकारण पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते रात्री बेलापुर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमला होता आम्हा सर्वांना अटक करा अशी मागणी पढेगाव ग्रामस्थांनी घेताच पोलीसांनी इतर कार्यकर्त्यांना सोडून दिले या पुर्वीही मी काही सरपंच नाही मी खासदार आहे आशी मुक्ताफळे खासदार लोखंडे यांनी उधळली होती जिल्ह्यात आमदार लंके खासदार सुजय विखे सारखी नेते मंडळी दिवस रांत्र समाजाची सेवा करत असताना दुसरीकडे केवळ अँम्बुलन्सची मागणी करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल केला असुन या पुढील काळात जनतेने यांच्याकडे कामे घेवुन जायचे की नाही असा सवालही  प्रवरा परिसरातील नागरीकांनी केला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बंगल्यात अनाधिकृतपणे प्रवेश करुन वाँचमन व खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरुन उदय लिप्टेसह चार अनोळखी व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                        या बाबतची फिर्याद खासदार सदाशिव लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल विनोद वसंतराव उंडे यांनी बेलापुर पोलीस स्टेशनला दिली असुन उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव येथील साई खेमानंद फौंडेशन ट्रस्ट या ठिकाणी उदय शिवाजी लिप्टे व इतर चार इसम दोन मोटार सायकलवर  आले त्यांनी लाथा मारुन बंगल्याचे गेट उघडले या बाबत तेथील वाँचमन निलेश शिंदे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली नंतर अनाधिकाराने आत प्रवेश करुन आतमध्ये असलेल्या गाड्याचे पान कापड फाडुन गाड्याचे व्ही डी ओ शुटींग केले नंतर खासदार लोखंडे याच्या निवासस्थानाकडे प्रवेश करत असताना खासदार लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल उंडे यांनी  त्यांना मज्जाव केला असता त्यांनाही लिप्टे व त्यांच्या साथीदारांनी धक्काबुक्की  केली पोलीस काँन्स्टेबल विनोद उंडे यांच्या तक्रारी वरुन पढेगाव येथील उदय शिवाजी लिप्टे व चार अनोळखी व्यक्ती विरुध्द भा .द .वि .कलम १४३,१४७,४५२,३५३,३३२, ५०४ ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक  संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हे करत आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील कोवीड केअर सेंटर मध्ये १०स्कोअर असलेला रुग्ण ठणठणीत बरा होवुन घरी गेला असुन त्या रुग्णाने डाँक्टर  व कोवीड सेंटरच्या स्वंयसेवकाचे आभार मानले आहे                                               बेलापुर येथील संस्कृती मंगल कार्यालय येथे कै मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या व साई खेमानंद ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातुन वरद विनायक कोवीड सेंटर सुरु करण्यात आले होते ५० बेड असलेल्या या कोवीड केअर सेंटरमध्ये असलम शेख हे ५ मे रोजी दाखल झाले होते हा रुग्ण दाखल झाला त्या वेळेस त्याचा एच आर सी टी स्कोअर १० होता तसेच त्याचा कोरोना रिपोर्टही पाँजिटीव्ह आला होता अशा रुग्णास डाँक्टर  रामेश्वर राशिनकर व डाँक्टर  शैलेश पवार यांनी कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करुन त्याचेवर उपचार सुरु केले केवळ औषधा व गोळ्यावर असा रुग्ण बरा करणे हे दोन्ही डाँक्टरापुढे एक अव्हानच होते परंतु  डाँक्टर पवार व डाँक्टर  राशिनकर यांनी ते अव्हान लिलया पेलले रुग्णाचा आत्मविश्वास व डाँक्टरांचे प्रयत्न यामुळे हा रुग्ण ठणठणीत बरा होवुन घरी गेला आहे या कोवीड केअर सेंटरमधील डाँक्टर याच्या आयुर्वेदीक व अँलोपँथीक औषधाने तसेच स्वयंसेवकांच्या उत्सहामुळे मला पुढील उपचारासाठी कुठेही जाण्याची गरजच भासली नाही   त्यांच्या अनमोल सहाकार्यामुळे  मी  फार मोठ्या मानसिक व आर्थिक संकटातुन वाचलो हे वरद विनायक कोवीड सेंटर माझ्यासाठी वरदानच ठरले असल्याची प्रतिक्रिया असलम शेख यांनी दिली आहे या कोवीड केअर सेंटरमध्ये आत्तापर्यत १२५ ते १५० रुग्ण दाखल होवुन बरेच रुग्ण बरे होवुन सुखरुप घरी गेले असल्याचेही डाँक्टर राशिनकर व डाँक्टर  पवार यांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget