बेलापुर (प्रतिनिधी )-सर्व मंत्री खासदार आमदार हे कोरोना महामारीत लोकांना आधार देत असतानाच शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अँम्बुलन्स मागण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल करुन काय साध्य केले असा सवाल पढेगाव भेर्डापुर उंबरगाव बेलापुर व परिसरातील नागरीकांनी विचारला आहे पढेगाव येथील सामाजिक कार्यक्रम उदय लिप्टे हे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे रुग्णाना ने आण करण्याकरीता अँम्बुलन्सची मागणी करण्यासाठी गेले गेले त्या वेळी तेथे दोन गाड्या उभ्या असल्याचे लीप्टे यांच्या लक्षात आले त्यांनी त्या गाड्याजवळ उभे राहुन फोटो काढले त्याचा राग आल्यामुळे लिप्टे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आपल्या कामा बाबतच्या अडचणी आमदार खासदार यांच्याकडे नाही मांडायच्या तर कुणाकडे असा संतप्त सवाल प्रवरा परिसरातील नागरीकांनी केला असुन खासदारांच्या दबावाला बळी पडून पोलीसांनी खोटा गुन्हा दाखल करुन काही नागरीकांना विनाकारण पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते रात्री बेलापुर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमला होता आम्हा सर्वांना अटक करा अशी मागणी पढेगाव ग्रामस्थांनी घेताच पोलीसांनी इतर कार्यकर्त्यांना सोडून दिले या पुर्वीही मी काही सरपंच नाही मी खासदार आहे आशी मुक्ताफळे खासदार लोखंडे यांनी उधळली होती जिल्ह्यात आमदार लंके खासदार सुजय विखे सारखी नेते मंडळी दिवस रांत्र समाजाची सेवा करत असताना दुसरीकडे केवळ अँम्बुलन्सची मागणी करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल केला असुन या पुढील काळात जनतेने यांच्याकडे कामे घेवुन जायचे की नाही असा सवालही प्रवरा परिसरातील नागरीकांनी केला आहे.
Post a Comment