बेलापुर (प्रतिनिधी )-खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बंगल्यात अनाधिकृतपणे प्रवेश करुन वाँचमन व खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरुन उदय लिप्टेसह चार अनोळखी व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबतची फिर्याद खासदार सदाशिव लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल विनोद वसंतराव उंडे यांनी बेलापुर पोलीस स्टेशनला दिली असुन उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव येथील साई खेमानंद फौंडेशन ट्रस्ट या ठिकाणी उदय शिवाजी लिप्टे व इतर चार इसम दोन मोटार सायकलवर आले त्यांनी लाथा मारुन बंगल्याचे गेट उघडले या बाबत तेथील वाँचमन निलेश शिंदे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली नंतर अनाधिकाराने आत प्रवेश करुन आतमध्ये असलेल्या गाड्याचे पान कापड फाडुन गाड्याचे व्ही डी ओ शुटींग केले नंतर खासदार लोखंडे याच्या निवासस्थानाकडे प्रवेश करत असताना खासदार लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल उंडे यांनी त्यांना मज्जाव केला असता त्यांनाही लिप्टे व त्यांच्या साथीदारांनी धक्काबुक्की केली पोलीस काँन्स्टेबल विनोद उंडे यांच्या तक्रारी वरुन पढेगाव येथील उदय शिवाजी लिप्टे व चार अनोळखी व्यक्ती विरुध्द भा .द .वि .कलम १४३,१४७,४५२,३५३,३३२, ५०४ ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हे करत आहे
Post a Comment