Latest Post

ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध एक जून 2021 पर्यंत अमलात राहणार.मुंबई, दि. 13 : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमीत करण्यात आला आहे.29 एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी हे निर्बंध दि.15 मे पर्यंत लागू करण्यात आले होते, तसेच नवीन मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आले होते. आता हे निर्बंध 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कायम असतील. साथरोग अधिनियम-1897,  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी अनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ‘ब्रेक दि चेन’ संबंधी 13 एप्रिल 2021, 21 एप्रिल 2021 व तद्‌नंतर 29 एप्रिल 2021 रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध 1 जून 2021 पर्यंत लागू राहतील. त्या व्यतिरिक्त पुढील निर्बंधही लागू करण्यात आले आहे.

* कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

*   यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

* मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्रच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
* स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याच्या निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
*  दुध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दुध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
*  कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील लोकांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
*  स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (‘एसडीएमए’) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- खा सदाशिव लोखंडे याच्याकडे अम्बुलन्स मागणे गैर नाही पण ती मागणी करताना चुकीची पद्धत वापरल्याने गुन्हा दाखल करावा लागला असल्याचे मत शिवसेनेचे मा .उपजिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील देवकर यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना व्यक्त केले 

काल सायंकाळी काही तरूणांनी  खासदार लोखंडे  साहेब बंगल्यात असताना अनाधिकृत पणे गेटला लाथा मारून आत प्रवेश केला तसेच वॉचमनला दमदाटी केली त्यांच्या अंगरक्षकाला शिवीगाळ करून अंगावर धाऊन गेले हे सर्व कशासाठी केले कुणाच्या सांगण्यावरून केले याची चौकशी झाली पाहिजे

त्यानी खा सदाशिव लोखंडे यांच्या कडे रितसर अम्बुलन्स ची मागणी करणे अपेक्षित होते परंतु दादागिरी करून अम्बुलन्सची मागणी गावकऱ्यांना देखील उचित  वाटते का ?  आणि अशी  मागणी करणाऱ्यानी  आधी गावासाठी काय केले ते सांगा असा सवाल देवकर केला आहे.

 खा सदाशिव लोखंडे  यांनी जीवाची पर्वा न करत मतदारसंघात कोव्हीड साठी फिरत आहेत पढेगाव येथील नुकत्याच चालू झालेल्या कोविड सेंटर ला खासदार लोखंडे यांनी बेड पीपीई किट आणि औषधांचा  साठा देऊन पढेगाव वाशीयांना मदत केलेली आहे, त्यावेळी हे बोंबा मारणारे कोठे होते  संबधीताने  कुठल्याही प्रकारे अम्ब्युलन्स ची मागणी केलेली नव्हती यामागे राजकीय हात गुंतलेले आहेत या पूर्वी  कधी अम्बुलन्स साठी या तरूणानी निवेदन दिले होते का ? अचानक प्रसिद्धीसाठी त्याच्या बंगल्यात अनाधिकृत पणे घुसून दादागिरी करून अम्बुलन्स मागणे यामध्ये केवळ राजकारण आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजेंद्र देवकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक याच्याकडे केली असुन

 खा सदाशिव लोखंडे याचे ऑफिस व घर 24 तास मतदारसंघातील जनतेसाठी खूले असल्याचेही देवकर यांनी म्हटले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सर्व मंत्री खासदार आमदार हे कोरोना महामारीत लोकांना आधार देत असतानाच शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अँम्बुलन्स मागण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल करुन काय साध्य केले असा सवाल पढेगाव भेर्डापुर उंबरगाव बेलापुर व परिसरातील नागरीकांनी विचारला आहे                                      पढेगाव येथील सामाजिक कार्यक्रम उदय लिप्टे हे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे रुग्णाना ने आण करण्याकरीता अँम्बुलन्सची मागणी करण्यासाठी गेले गेले त्या वेळी तेथे दोन गाड्या उभ्या असल्याचे लीप्टे यांच्या लक्षात आले त्यांनी त्या गाड्याजवळ उभे राहुन फोटो काढले त्याचा राग आल्यामुळे लिप्टे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आपल्या कामा बाबतच्या अडचणी आमदार खासदार यांच्याकडे नाही मांडायच्या तर कुणाकडे असा संतप्त सवाल प्रवरा परिसरातील नागरीकांनी केला असुन खासदारांच्या दबावाला बळी पडून पोलीसांनी खोटा गुन्हा दाखल करुन काही नागरीकांना विनाकारण पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते रात्री बेलापुर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमला होता आम्हा सर्वांना अटक करा अशी मागणी पढेगाव ग्रामस्थांनी घेताच पोलीसांनी इतर कार्यकर्त्यांना सोडून दिले या पुर्वीही मी काही सरपंच नाही मी खासदार आहे आशी मुक्ताफळे खासदार लोखंडे यांनी उधळली होती जिल्ह्यात आमदार लंके खासदार सुजय विखे सारखी नेते मंडळी दिवस रांत्र समाजाची सेवा करत असताना दुसरीकडे केवळ अँम्बुलन्सची मागणी करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल केला असुन या पुढील काळात जनतेने यांच्याकडे कामे घेवुन जायचे की नाही असा सवालही  प्रवरा परिसरातील नागरीकांनी केला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बंगल्यात अनाधिकृतपणे प्रवेश करुन वाँचमन व खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरुन उदय लिप्टेसह चार अनोळखी व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                        या बाबतची फिर्याद खासदार सदाशिव लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल विनोद वसंतराव उंडे यांनी बेलापुर पोलीस स्टेशनला दिली असुन उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव येथील साई खेमानंद फौंडेशन ट्रस्ट या ठिकाणी उदय शिवाजी लिप्टे व इतर चार इसम दोन मोटार सायकलवर  आले त्यांनी लाथा मारुन बंगल्याचे गेट उघडले या बाबत तेथील वाँचमन निलेश शिंदे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली नंतर अनाधिकाराने आत प्रवेश करुन आतमध्ये असलेल्या गाड्याचे पान कापड फाडुन गाड्याचे व्ही डी ओ शुटींग केले नंतर खासदार लोखंडे याच्या निवासस्थानाकडे प्रवेश करत असताना खासदार लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल उंडे यांनी  त्यांना मज्जाव केला असता त्यांनाही लिप्टे व त्यांच्या साथीदारांनी धक्काबुक्की  केली पोलीस काँन्स्टेबल विनोद उंडे यांच्या तक्रारी वरुन पढेगाव येथील उदय शिवाजी लिप्टे व चार अनोळखी व्यक्ती विरुध्द भा .द .वि .कलम १४३,१४७,४५२,३५३,३३२, ५०४ ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक  संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हे करत आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील कोवीड केअर सेंटर मध्ये १०स्कोअर असलेला रुग्ण ठणठणीत बरा होवुन घरी गेला असुन त्या रुग्णाने डाँक्टर  व कोवीड सेंटरच्या स्वंयसेवकाचे आभार मानले आहे                                               बेलापुर येथील संस्कृती मंगल कार्यालय येथे कै मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या व साई खेमानंद ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातुन वरद विनायक कोवीड सेंटर सुरु करण्यात आले होते ५० बेड असलेल्या या कोवीड केअर सेंटरमध्ये असलम शेख हे ५ मे रोजी दाखल झाले होते हा रुग्ण दाखल झाला त्या वेळेस त्याचा एच आर सी टी स्कोअर १० होता तसेच त्याचा कोरोना रिपोर्टही पाँजिटीव्ह आला होता अशा रुग्णास डाँक्टर  रामेश्वर राशिनकर व डाँक्टर  शैलेश पवार यांनी कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करुन त्याचेवर उपचार सुरु केले केवळ औषधा व गोळ्यावर असा रुग्ण बरा करणे हे दोन्ही डाँक्टरापुढे एक अव्हानच होते परंतु  डाँक्टर पवार व डाँक्टर  राशिनकर यांनी ते अव्हान लिलया पेलले रुग्णाचा आत्मविश्वास व डाँक्टरांचे प्रयत्न यामुळे हा रुग्ण ठणठणीत बरा होवुन घरी गेला आहे या कोवीड केअर सेंटरमधील डाँक्टर याच्या आयुर्वेदीक व अँलोपँथीक औषधाने तसेच स्वयंसेवकांच्या उत्सहामुळे मला पुढील उपचारासाठी कुठेही जाण्याची गरजच भासली नाही   त्यांच्या अनमोल सहाकार्यामुळे  मी  फार मोठ्या मानसिक व आर्थिक संकटातुन वाचलो हे वरद विनायक कोवीड सेंटर माझ्यासाठी वरदानच ठरले असल्याची प्रतिक्रिया असलम शेख यांनी दिली आहे या कोवीड केअर सेंटरमध्ये आत्तापर्यत १२५ ते १५० रुग्ण दाखल होवुन बरेच रुग्ण बरे होवुन सुखरुप घरी गेले असल्याचेही डाँक्टर राशिनकर व डाँक्टर  पवार यांनी सांगितले.

श्रीरामपूर नगर परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी,नागरिक यांची सोमवार दिनांक 10 मे रोजी शंभर जणांची कोरोना तपासणी शिबिर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण नगरसेवक श्री राजेश अलघ,कामगार नेते श्री दीपक चरणदादा चव्हाण यांच्या ऊपस्थिती मध्ये  संपन्न झाले या प्रसंगी  नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण यांनी लेखी पत्रा द्वारे दिलेल्या निवेदनात 

श्रीरामपूर नगर परिषदेच्या सर्वच कर्मचारी यांच्यात जीवघेणा कोरोना आजाराचा वाढता पादुर्भाव आणि मृत्यदर बघता श्रीरामपूर नगर परिषदने त्वरित सर्वच कायम आणि  रोजंदारी कामगार यांचे प्राधान्याने लसीकरण,आरोग्य विमा, आणि कोरोना तपासणी करावी जेणे करून या संसर्गजन्य आजाराने कर्मचारी पिडीत होणार नाही ,काही कायम कर्मचारी यांचे लसीकरणाचा पहिला,दुसरा डोस लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण झालेले नाही ज्या प्रमाणे 10 टक्के औषध साठा शासकीय कर्मचारी यांच्या करीता राखीव आहे त्याच धर्तीवर कोरोना लस ही 20 टक्के राखीव ठेवण्यात यावी व तसेच घनकचरा 251 कामगार,औषधे फवारणी12, अतिक्रमण 14,पाणी पुरवठा 61, बांधकाम 51,वसुली 7कामगार आणि इ विभागातील 68 एकुणो 464 रोजंदारी कामगार यांचेही गत 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी पासुन आरोग्य विमा उतरवण्यात आलेला नाही. जबाबदारी असतानाही संबधीत ठेकेदार लाॅकडाऊन असतानाही यांनी आरोग्य विमा ,गणवेश,थकीत वेतन,ओळख पत्र कामगारांना दिलेले नाही आणि नगर परिषद प्रशासन तर्फे नेहमी प्रमाणे त्या बाबतीत गांभिर्याने  काळजी घेतली गेलेली नाही, 

त्या सोबतच रूग्ण वाहीका,स्वर्ग रथ,शववाहीका,अग्णीशामक,अंत्यविधी दहन कर्मचारी, पाण्याचे टॅंकर वरील चालक, मदतणीस कर्मचारी यांनाही आरोग्य विमा ,PPE कीट,ऊपलब्ध करून देण्यात यावे, आणि या सर्व कामगारांचे साप्ताहिक कोरोना चाचणी करण्यात यावी जेणे करुन पुढील हाणी टाळता येवु शकेल तसेच नगर परिषद कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांना देखील अहमदनगर महानगरपालिका यांनी घेतलेल्या निर्णय नुसार आरोग्य विमा आणि लसीकरण ऊपलब्ध करावे. 

त्या सोबतच सातत्याने आम्ही केलेल्या पाठपुराव्या मुळे श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांनी एकुण कायम व रोजंदारी 945 कामगारांना पैकी 247 कायम कामगार यांचा 4 लक्ष 56 हजार रूपये खर्च करून प्रत्येकी दोन लक्ष रूपये चा आरोग्य विमा ऊतरवण्यात आला या बद्दल अभिनंदन त्या सोबतच शासकीय कोरोना तपासणी शिबिरास नगर परिषदचे वैद्यकीय अधिकारी डॉ पर्हे, परिचारिका यांचे सहकार्य लाभले त्यामुळे राष्ट्रवादी सफाई कामगार सेलच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष श्री दीपक चरणदादा चव्हाण यांनी त्यांचे  आभार व्यक्त केले.

श्रीरामपूर शहरातील रेणुकानगर,एमआयडीसी भागात एका तडीपार गुन्हेगारासह ०२ जणांना शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असुन आरोपींच्या ताब्यातील होंडा डिओ गाडीच्या डिक्कीमध्ये एक पिस्टल व ०१ जिवंत राऊंड  पोलीसांना मिळाला आहे. यामध्ये तडीपार आरोपी आनंदा यशवंत काळे -३९ वर्षे याच्या सह,सनी विजय भोसले,वय-२३ व अमित प्रभाकर कुमावत,वय-३० यांचा सामावेश आहे. पो. शि.सुनिल दिघे यांच्या फिर्यादीवरुन काल श्रीरामपूर पो.ठाण्यात गुरनं.२८६/२०२१ भा.हत्यार कायदा कलम ३,४ ,७/१५ व मुंबई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पो.उप.निरीक्षक सुरवडे हे पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक डॅा.दिपाली  काळे,डीवायएसपी.श्री.मिटके ,श्रीरामपूर शहर पो.ठाण्याचे पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी केली आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget