Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-नगर परिषदेने सुरु केलेल्या कोवीड सेंटर मधील वैद्यकीय अधिकारी नर्स यांनी रुग्णांची चांगली काळजी घेतल्यामुळे बरेच रुग्ण ठणठणीत बरे झाले असुन नागरीकांनी स्वतंःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे. श्रीरामपुर नगरपरिषदेच्या वतीने नगरी प्राथमिक आरोग्य कोवीड सेंटर सुरु करण्यात आले होते या कोवीड सेंटरमध्ये दाखल झालेले १२ रुग्ण ठणठणीत बरे होवुन घरी सोडण्यात आले त्या वेळी नगराध्यक्षा अनुराधा अदिक व नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे यांनी गुलाब पुष्प देवुन अभिनंदन केले व घरीच रहा सुरक्षित रहा असा सल्ला दिला या वेळी बोलताना नगराध्यक्षा अनुराधा आदिक पुढे म्हणाल्या की या कोवीड सेंटरमध्ये दाखल झालेली बारा जणांची पहीली बँच घरी सुखरुप जात आहे या रुग्णांची डाँक्टर परे डाँक्टर मुंदडा तसेच रुग्णांच्या सेवेत असणार्या सिस्टर यांनी योग्य सेवा व औषधोपचार दिल्यामुळे हे सर्व जण बरे होवुन घरी जात आहे हा आनंदाचा क्षण आहे नागरीकांच्या आमच्या प्रति काही अपेक्षा आहेत तशा आमच्याही नागरीकाप्रती अपेक्षा आहे नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये बाहेर पडताना मास्कचा वापर करा आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असेही त्या म्हणाल्या या वेळी बोलताना नगरपालीकेचे सी ओ गणेश शिंदे म्हणाले की आपला आजार अंगावर काढु नका वेळेवर उपचार घ्या कोरोनाची लक्षणे वाटल्यास घरी न राहाता कोवीड सेंटरमध्ये दाखल व्हा कोवीड सेंटरमध्ये योग्य उपचार केल्यामुळे रुग्ण लवकर बरा होवुन घरी जातो त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या कोरोनाचा प्रसार होवु नये याची खबरदारी घ्या असेही शिंदे म्हणाले या वेळी अनेक रुग्णांनी या ठिकाणी चांगली सेवा मिळाल्यामुळे लवकर बरे झाल्याचे सांगितले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-  सध्याच्या कोरोणा काळात गोरगरीब, रोजंदारीवर काम करणारे, फेरीवाले छोटे मोठे व्यावसाईक अशा ब-याच लोकांचे रोजगार बंद असल्याने श्रीरामपुरातील राष्ट्रीय मन्सुरी समाज व श्रीरामपुर पिंजारी मन्सुरी विकास सेवा संस्था श्रीरामपुर यांच्या वतीने अशा गरजु लोकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले...या कार्यास खालील लोकांचे सहकार्य लाभले.

राष्ट्रीय मन्सुरी समाज श्रीरामपुर तालुका अध्यक्ष अशपाक पिंजारी, श्रीरामपुर पिंजारी विकास सेवा संस्था के अध्यक्ष हाजी सलिम भाई, उपध्यक्ष नजीर पिंजारी,  शहर अध्यक्ष राष्ट्रीय मन्सुरी समाज जावेद पिंजारी, अफजल पिंजारी, मोबिन पिंजारी, हाजी आमिन भाई, शाहीन नदाफ सर, गणी सर ,अनवर पिंजारी, 

समीर टेलर मोसिन भाई चांद भाई, बाबा भाई,   जमीर शेख,जलील भाई , रशिद भाई ,हसन भाई, हनिप भाई,चांद भाई ,इस्माईल भाई, फिरोज भाई, रमजान भाई, नजीर भाई, जमीर पिंजारी, शाहरुख शेख,शाहरुख पिंजारी, तोफीक पिंजारी, जावेद भाई, असलम  पिंजारी, आमिन भाई, रहीम भाई, समीर भाई, ल्याकत भाई, शाहनवाज भाई,अब्बु भाई, असिप भाई , समिर शेख,तोफीक भाई, फारुक भाई.


बेलापुर (प्रतिनिधी  )- कै .मुरलीधर खटोड यांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत आपल्याला असेच सुरु ठेवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून गावात सर्वांच्या सहकार्याने कोवीड सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहीती माजी सरपंच भरत साळुंके  यांनी दिली                                                 बेलापुरगावाचे सलग २२ वर्ष सरपंचपद भूषविणारे कै मुरलीधर खटोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपस्थित होते            आपल्या भाषणात पं स सदस्य अरुण पा .नाईक म्हणाले की कै ,मुरलीधर खटोड यांचा सत्कार्याचा वसा ग्रामस्थांनी पुढे चालु ठेवला दर वर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमीत्त काहीना काही समाज उपयोगी कार्यक्रम राबवीले जातात कोरोना महामारीच्या काळात भरत साळुंके रविंद्र खटोड व त्यांच्या सर्व टिमने कोविड केअर सेंटर सुरु करुन एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे या वेळी केशव गोविंद बनाचे ट्रस्टी बापुसाहेब पुजारी म्हणाले की कोविड सेंटर ही गरज ओळखुन गावात कोवीड सेंटर सुरु करण्यात आले या ठिकाणी जागा अपुरी पडल्यास आपण केशव गोविंद बनात देखील व्यवस्था करण्यास तयार असल्याचे सांगितले दिपक क्षत्रीय यांनी समाजसेवक कै मुरलीधर खटोड यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करुन एखादे भव्य असे हाँस्पीटल या परिसरात उभे करावे अशी सुचना केली त्यास व्यापारी असोसिएशनचे प्रशांत लढ्ढा यांनी अनुमोदन दिले या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी बेलापुर ग्रामपंचायतीत काम करणार्या सर्व ६० कर्मचाऱ्यांचा विमा उतरुन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच कोवीड सेंटर चालविणारे कार्येकर्ते स्वयसेवक कर्मचारी पोलीस पाटील अशोक प्रधान व विजय दुशींग यांचा देखील विमा उतरविण्यात आल्याची माहीती भरत साळुंके  यांनी दिली तसेच कोवीड सेंटरला मदत करणार्या असख्य दाते संस्था संघटना तसेच सेवा देणारे डाँक्टर राशिनकर डाँक्टर शैलेश पवार यांचेही अभिनंदन करण्यात आले   या वेळी विलास मेहेत्रे अनिल पवार राम पोळ दिवाकर कोळसे दादासाहेब जाधव रामनाथ शिंदे प्रसाद खरात अशोक प्रधान शिवाजी वाबळे पप्पु कुलथे रमेश कुटे सचिन कडेकर हरीभाऊ वावळे किशोर राऊत संजय नागले सचिन मेहेत्रे गणेश साळुंके आनंद दायमा अकबर टिन मेकरवाले शाकीर बागवान विजय शेलार बद्रिनारायण शर्मा अशोक पवार दिलीप दायमा अरविंद शहाणे प्रशांत बिहाणी मनोज दायमा  किशोर कदम  प्रकाश कुर्हे कांतीलाला मुथा आदि उपस्थित होते कार्याक्रमाचे सूत्रसंचलन अभिजित राका यांनी केले तर रविंद्र खटोड यांनी आभार मानले       [कै मुरलीधर खटोड यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपल्या जिवाची काळजी न करता समाजात अहोरात्र झटणार्या पत्रकाराचा विमा उतरविण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड व भरत साळुंके यांनी केली असुन कोरोना काळात पत्राकारांचा विमा उतरविणारी कै मुरलीधर खटोड पतसंस्था ही जिल्ह्यातील पहीली संस्था ठरली आहे .

देवळाली प्रवरा - २७ एप्रिल - देवळाली प्रवरा व लगतच्या बत्तीस गावांसह संपुर्ण राहुरी तालुक्यात नवीन रेशन कार्ड धारक नागरिक प्राधान्य कुटुंब योजनेत नसल्याने रेशन दुकानातील मोफत व स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असल्याने तातडीची उपाययोजना करणे कामी आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब, राज्यमंत्री प्रजक्तदादा तनपुरे, आमदार लहुजी कानडे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, प्रांत डॉ दयानंद जगताप व राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन दिले आहे. ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना लॉकडाउनमुळे बहुतेक नागरिकांच्या हाताला काम नसल्याने या नवीन रेशन  कुपन धारकांची सर्व भिस्त स्वस्त धान्य दुकानातील धान्यावर अवलंबून आहे. तथापि प्राधान्य कुटुंब योजनेपासून हे सर्व नवीन रेशन कुपन धारक कुटुंबे वंचित असल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळत नाही. म्हणून आज लॉकडाउन काळात त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. राहुरी तालुक्याचा इष्टांक शिल्लक नाही, नवीन इष्टांक वाढवून मिळेपर्यंत या नवीन कुपन धारकांना स्वस्त धान्य दुकानात धान्य उपलब्ध करून देता येत नाही अशी माहिती मिळत आहे.      राहुरी तालुक्यात अजूनही प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेपासून कित्येक कुटुंबे वंचित असल्याने कृपया या योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून लाभ मिळणेसाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी व उपासमारीपासून या कुटुंबांना वाचवावे अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी निवेदनात विनंती केली आहे.


राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr. no. 286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर  गुन्हा Dysp. संदीप मिटके यांचेकडे वर्ग होताच गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे  वय 46  यास नगर औरंगाबाद  जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त  येथून  अटक केली होती परंतु अक्षय कुलथे हा फरार होता. Dyspसंदीप मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत *आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता.  बीनंदनकी  जिल्हा  फत्तेपूर  उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक करून additional civil judge/ Judicial magistrate court no 4 Fatehpur Uttar Pradesh यांच्या समक्ष हजर केले असता आरोपीस 72 तासांची Transit remand custody देण्यात आली आहे*

 आरोपी अक्षय कुलथे वर यागोदर पुढीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत 

1) राहुरी पो.स्टे. गु.र .नं.321/2016 भा द वी क 324, प्रमाणे          2)439/2017 भा द वी क 457,380,34 प्रमाणे

3) 54/2017  मुं.पो.का.122 प्रमाणे

4)124/2017 मुं.पो.का. 122 प्रमाणे

5)886/2019 मुं.पो.का 122 प्रमाणे

6)286/2021मुं.पो.का 122 प्रमाणे

7) राहाता पोलीस स्टेशन गु. र. नं.266/2020  भादवि क.399,402 प्रमाणे

8) कोपरगाव शहर पो.स्टे.गु. र. नं.170/2020  भादवि क.395 प्रमाणे

9)कोपरगाव शहर पो.स्टे.गु. र. नं.171/2020  भादवि क.394 प्रमाणे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली  DySP   संदीप मिटके , PI नंदकुमार दुधाळ, PSI शेळके,  PSI निलेश कुमार वाघ, PSI  नीरज बोकील, PSI. मधुकर शिंदे,ASI  राजेंद्रअरोळे, HC सुरेश  औटी, PN फुरकान शेख,PN शिवाजी खरात, PC रवींद्र मेढे, विकास गुंजाळ, सुनील शिंदे, नितीन शिरसाठ,  आजिनाथ पाखरे आदींनी केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- काळाची गरज ओळखुन बेलापुर ग्रामपंचायतीने विनामुल्य कोविड सेंटर सुरु केले तसेच अल्पदरात आणखीही एक सेंटर सुरु झालेले आहे त्या बद्दल बेलापुरकर निश्चितच कौतुकास पात्र आहेत असे गौरद्गार उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी  काढले  येथील वरद गजानन कोविड केअर सेंटर व बेलापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थ  यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या बेलापूर कोविड सेंटर या दोनही कोवीड सेंटरला श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भेट देवुन समाधान

व्यक्त केले.या वेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की कोवीड रुग्णांच्या नातेवाईकांना विलगीकरण  कक्षात ठेवणे गरजेचे आहे असे केल्याने कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात होईल.संस्कृती मंगल कार्यालय येथे सुरु असलेल्या वरद गजानन कोवीड केअर सेंटरला उपविभागीय अधिकारी अनिल पवार तसेच श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भेट दिली या वेळी मंगल कार्यालयाची जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल शासनाच्या वतीने माजी सरपंच व मंगल कार्यालयाचे मालक भरत साळुंके व रत्नेश राठी यांना धन्यवाद दिले तसेच बेलापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने मराठी शाळेत सुरु केलेल्या कोविड सेंटरलाही त्यांनी भेट दिली व रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल समाधान व्यक्त केले.या वेळी रुग्णाजवळ जाताना खबरदारी बाळगा मला काही होत नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगु नका मास्क व सँनिटायझरचा वेळोवेळी वापर करा रुग्णांना चहा नाश्ता जेवण देताना विशेष काळजी घ्या दोन्ही सेंटरला असलेल्या डाँक्टरांचेही त्यांनी विशेष आभार मानले गावाने पुढाकार घेवुन गावातच दोन कोवीड सेंटर सुरु केल्यामुळे तालुक्यातील यंत्रणेवर येणारा ताण बराचसा कमी होईल असा विश्वासही उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी व्यक्त केला या वेळी वरद गजानन कोवीड सेंटर येथे भरत साळुंके रविंद्र खटोड राम पोळ अशोक पवार अनिल पवार प्रसाद खरात डाँ शैलेश पवार डाँ राशिनकर दिनेश मोडके सुभाष मोहीते तर बेलापुर ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या कोविड सेंटर येथे जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी पोलीस पाटील अशोक प्रधान डाँ. देविदास चोखर विशाल आंबेकर सचिन वाघ महेश कुर्हे  गोपी दाणी रफीक शेख सुनिल साळुंके मिलींद दुधाळ आदि उपस्थित होते

श्रीरामपुर /बेलापुर  (प्रतिनिधी  )- कोरोना रुग्णाकरीता नातेवाईकांची बेड मिळविण्यासाठी  होणारी धावपळ थांबविण्यासाठी श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या देखरेखीखाली  श्रीरामपुर तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला असुन ही सेवा नागरीकासाठी २४ तास सुरु राहणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे रुग्णालयातील सर्व खाटा पुर्ण भरलेल्या आहेत अशा अवस्थेत रुग्णांना या दवाखान्यातुन त्या दवाखान्यात नेताना नातेवाईकाची फरफट होत असल्याचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध व्हावा या करीता तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला असुन या कक्षात नायब तहसीलदार श्रीमती छाया चौधरी मोबाईल नंबर ९९६०२६४६११ , अमोल ऐडके अ. का .संगायो मोबाईल  नंबर ९८९०६८१६८५ ,शिवशंकर श्रीनाथ महसुल सहाय्यक मोबाईल  नंबर ८९७५२६६७७७ ,नवनाथ मंडलीक शिपाई मोबाईल नंबर ८७९३४४४१८० यांची नियुक्ती केली आहे . श्रीरामपुर तहसील कार्यालयाचा दुरध्वनी ०२४२२२२२२५० असुन नागरीकासाठी हे अधिकारी व कर्मचारी  २४ तास उपलब्ध असेल या कक्षातील अधिकारी कर्मचारी यांनी तालुक्यातील शासकीय /खाजगी रुग्णालयातील केंद्राची यादी तसेच दर दोन तासाला उपलब्ध बेड आँक्सिजन व जनरल बेड यांची संख्या प्राप्त करुन घ्यावयाची आहे कोवीड रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय /खाजगी केंद्राशी समन्वय ठेवुन उपलब्ध असणार्या बेड बाबत नागरीकांनाअचुक माहीती द्यावयाची आहे त्यामुळे गरजुंना कोणत्या दवाखान्यात बेड उपलब्ध आहे हे तातडीने समजणार आहे  रुग्णाची व नातेवाईकांची धावापळ कमी होण्यास मदत होणार आहे हे काम जबाबदारीने करण्याच्या सुचनाही उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिल्या असुन यात कसुन करणार्या अधिकारी कर्मचारी यांचेवर कारवाई देखील करण्याचा ईशारा उपविभागीय अधिकारी पवार यांनी दिला आहे  उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी स्थापन केलेल्या या कक्षातुन कोणत्या दवाखान्यात किती  बेड उपलब्ध आहे याची अचुक माहीती नातेवाईकंना मिळणार आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळही वाया जाणार नाही तसेच काही ठिकाणी बेड उपलब्ध असतानाही जागाच शिल्लक नाही असे सांगितले जात होते परंतु  आता केंद्रांना योग्य व अचुक माहीती द्यावी लागणार आहे त्यामुळे नागरीकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget