Latest Post

श्रीरामपूर - शहरातील मिल्लत नगर भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी नगरपालिकेची असून आगामी काळामध्ये मिल्लत नगरचा सर्वांगीण विकास करून या उपनगराला शहरामध्ये आदर्श बनवू. येथील ओपन स्पेस मध्ये थत्ते ग्राउंड प्रमाणे जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाक, वृक्षारोपण व इतर सुविधा लवकरच निर्माण करून देऊ असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.

शहरातील मिल्लतनगर भागातील सेक्टर २ व ३ मध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच सेक्टर १ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी नगरपालिकेचे ज्येष्ठ नग


रसेवक बाळासाहेब गांगड, ताराचंद रणदिवे, मुक्तार शहा, रईस जागीरदार, प्रकाश ढोकणे, कलीमभाई कुरेशी, सय्यद असलमभाई तसेच या भागातील प्रमुख कार्यकर्ते शेख अकील सुन्नाभाई,शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, हाजी सय्यद युसूफभाई, गुलाब वायरमेन,अकबर पठाण, हाजी अमीन शेख, मुन्ना खान, असलम बिनसाद,तोफिक शेख, समीरखान पठाण, राजू जहागीरदार, अफरोज शहा,सलीम पटेल, युसुफ लाखानी, बाबुभाई वेल्डर, आरीफ दारूवाला,फारूक तांबोळी आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक पुढे म्हणाल्या कि सुरुवातीची दोन वर्ष नगरपालिकेपुढं निधीच्या खूप अडचणी होत्या. मागील वर्ष कोरोणामुळे वाया गेले. आता पालिकेला आपले सरकार असल्याने शासनाकडून बर्‍यापैकी निधी प्राप्त होत आहे. शहरातील अनेक कामे आम्ही मंजूर करून ठेवली आहेत. आता त्या कामांना सुरुवात झाली आहे. मिल्लत नगर मधील सर्व प्रश्नांची मला जाण आहे. नजिकच्या काळामध्ये सर्व प्रश्न सोडविले जातील. मिल्लत नगर मधील ड्रेनेजचा प्रश्न खूप मोठा आहे. महिना दीड महिन्यांमध्ये तो मार्गी लागेल.ज्या रस्त्याच्या कामाचा आज शुभारंभ होत आहे त्याचे काम रमजान महिना सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे असे आदेश त्यांनी नगरपालिकेचे नगर अभियंता यादव आणि संबंधित ठेकेदारांना दिले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी मिल्लत नगर मध्ये विकास झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. परंतु मिस्टर नगरसेवक अल्तमश पटेल यांनी आता लक्ष घातल्याने अनेक कामे मार्गी लागली आहेत. दोनच महिन्यांमध्ये पाईपलाईनच्या कामाला रितसर मंजुरी घेऊन ते काम आता होत आले आहे असे सांगून मिल्लत नगर मधील प्रमुख समस्या विशद केल्या. केला जाणारा रस्ता हा छोटा असून त्यामुळे अतिक्रमण वाढण्याची भीती असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार चार फुटापर्यंत पेविंग ब्लॉक बसविण्याची मागणी त्यांनी केली. ती नगराध्यक्षांनी तात्काळ मंजूर केली.

यावेळी  नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपस्थित सर्व नगरसेवक व या भागातील प्रमुख नागरिक

शेख अकिल सुन्नाभाई,

सलीमखान पठाण,हाजी युसूफभाई सय्यद, युवानेते अल्तमश अन्सार पटेल, बाबुखान पठाण (वेल्डर),

आरीफभाई दारुवाला, हाजी अमीन शेख,युसूफ लाखाणी,

शकिल बागवान,शौकतभाई शेख,गुलाबभाई वायरमेन,

 सलीम रसूल पटेल,फिरोज पिंजारी, अकबर पठाण, रहमान शाह,अफरोज शाह, टायगर सरयांच्या हस्ते रस्त्याचे व पाईपलाईनच्या कामाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

प्रभागातील जनतेच्या वतीने नगराध्यक्षा आदिक यांचा आमेना गुलाब शेख व नूरजहान शेख यांनी तर अल्तमश पटेल यांचा अकिल सुन्नाभाई यांनी सत्कार केला .कार्यक्रमानंतर मिल्लत

नगरच्या मागील भागातील ड्रेनेज सिस्टीम ची नगराध्यक्षांनी पाहणी केली. यावेळी तेथील महिलांनी त्यांची गा-हाणी नगराध्यक्षांपुढे मांडली. त्या भागातील एकूण विदारक परिस्थिती पाहून नगराध्यक्षांनी खूपच नाराजी व्यक्त करीत नगर अभियंता यादव यांना तातडीने ड्रेनेज सिस्टिमचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले.

मिल्लत नगर मध्ये कामे होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना यापूर्वी होती. परंतु अल्तमश पटेल यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर पटापट कामे मंजूर होऊन कामांना सुरुवात देखील झाली आहे. मिल्लत नगर मशिदी समोर बसवलेल्या पेव्हिंग्ज ब्लॉकची  देखील त्यांनी पाहणी केली व झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्तमश पटेल,  निरंजन भोसले, गुलाब वायरमेन, मुन्नाभाई, अन्वर भाई यांनी विशेष परिश्रम घेतले. रमजान महिना लवकरच सुरु होणार असल्याने ही कामे लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपूर शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असुन गुन्हेगारांचा फास आवळणारे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके आल्यानंतर अवैध धंदे बंद होतील अशी आशा नागरीकांना होती परंतु सध्याची परिस्थिती पहाता नागरीकांचा भ्रम निरास झाला असुन दारु मटका,गुटका,क्लब त्याच बरोबर अवैध मार्गाने गौण खजिन

लुटणार्याचा देखील सुळसुळाट झाला आहे.श्रीरामपुर शहर व तालुक्यात अवैध धंद्याना उत आला असून हे सर्व धंदे सर्रासपणे चालविणाऱ्या लोकांना जणू पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे प्रथमतः दिसून येत आहे.मुख्यतः शहरातील बाजारपेठ परिसरातील भर रस्त्यात व लहान लहान गल्लीबोळात सर्रासपणे मटका आकड्याचे  दुकाने सुरु आहेत.याकडे मात्र पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी केलेले दुर्लक्ष बरेच काही सांगून जाते.मध्यंतरी पोलीसांनी फार मोठा गुटखा पकडला त्याचा तितकाच गवगवाही झाला अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाला अंधारात ठेवुन ही मोठी कारवाई पार पडली त्या नंतर गुटखा विक्री बंद होणे आवश्यक होते पण आज छोट्या व्यवसायीका

पासुन ते मोठ्या व्यापार्या पर्यत सर्वाकडे गुटखा मिळतो ते ही अव्वाच्या सव्वा किमतीला त्यामुळे शासनाने केलेला गुटखा बंदी दारु बंदी मटका बंदी हे सर्व कायदे कागदावरच राहातात की काय अशी शंका सुजाण निगरीकांना येत आहे. 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सन २०१५ मध्ये धोकादायक पाण्याच्या टाकी पाडण्याबाबत पत्र आले होते परंतु त्या पुर्वीच २०१४ मध्ये खास बाब म्हणून  चार कोटी सतरा लाख रुपये किमतीच्या पाणी योजनेस जि प सदस्य शरद नवले यांनीच खोडा घातला असल्याचे पत्रक पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व माजी उपसरपंच रविंद्र खटोड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नाईक नवले व खटोड यांनी पुढे म्हटले आहे की गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी धोकादायक झाल्याचे लक्षात येताच सव्वा चार कोटीची पाणी पुरवठा योजना तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री रणजित कांबळे यांच्याकडून मंजुर करुन आणली होती त्याची सर्व पूर्तता पुर्ण झाली होती परंतु ग्रामपंचायत निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन जि प सदस्य शरद नवले यांनी वाड्या वस्त्यावर पाणी पुरवठा करणे गरजेचे असुन फेर इस्टिमेट करावे असे लेखी पत्रच कार्यकारी अभियंता यांना दिल्यामुळे ते पाण्याच्या टाकीचे काम होवु शकले नाही हे सत्य लपवुन आपल्या बेजबाबदार पणाचे खापर दुसर्यावर फोडत आहे खरे तर गावासाठी पुर्णतः नविन योजना बनविने गरजेचे असताना पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे वापरुन काय साध्य होणार आहे पाण्याच्या नविन टाकी बरोबरच नविन साठवण तलाव वाँटर फिल्टर प्लँन सप्लाय फिल्टर प्लँन वाड्यावस्त्यावरील पाईप लाईन हे सर्व  नविन योजनेत समाविष्ट होणे आवश्यक आहे हे सर्व सोडून जि प सदस्य आपली जबाबदारी झटकून आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहे या गावाला जि प सदस्य नवले यांनी किती निधी दिला ते तरी जाहीर करावे  पाण्याची टाकी धोकादायक असल्याचे  पत्र जिल्हा परिषदेने दिले मग ही बाब सदस्याला समजली नाही का मग ते पाच वर्ष शांत का बसले त्या पुर्वी सन २००८ मध्ये एक कोटी ४६ लाख खर्चाची पाणी योजना शरद नवले सरपंच असताना केली त्यात २३ लाख खर्चाचा फिल्टर प्लँंट होता तो कुठे गायब झाला आज गावाला खराब पाणी पुरवठा होतोय हे पाप कुणाचे आहे लोकांना खोटी अश्वासने देवुन सत्तेत आलात आता लोकांची कामे करा आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेवुन लढणे बंद करा असेही नवले नाईक खटोड यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.


बेलापुर (प्रतिनिधी  )--श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची  टाकी धोकादायक असुन ती पाडण्याची सुचना सन २०१५ ला करुन देखील त्या काळातील पुढाऱ्यांनी तो अहवाल लपवुन ठेवला असुन दुर्दैवाने काही अघटीत घडले तर त्यास जबाबदार कोण असा सवाल सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केला आहे.          बेलापुर गावाला पाणी पुरवठा करणारी एकमेव टाकी असुन ती जवळपास १९७० काळात बांधली गेलेली आहे या उंच पाण्याच्या टाकीचे प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांचे मार्फत स्टूक्यरल आँडीट करण्यात आले होते त्या

वेळी ही टाकी धोकादायक असुन पाडण्यात यावी असा अहवाल देण्यात आला असताना तो त्या वेळच्या सत्ताधार्यांनी दाबुन ठेवला या बाबतची माहीती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी पत्रकारांना माहीती देताना सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे  यांनी त्या पत्राच्या प्रतिच पत्रकाराच्या हातात ठेवल्या या वेळी सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख उपस्थित होते    येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ असणाऱ्या पाच लाख लिटर क्षमतेची पाणी साठवण टाकीची मुदत संपल्याने ती उंच टाकी पाडण्याची कार्यवाही करावी अन्यथा भविष्यात उदभवणाऱ्या परिस्थितीस ग्रामपंचायत जबाबदार राहील असे पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा उपविभागाने १० जुलै २0१५ रोजी दिले होते. मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.ही टाकी अतिशय धोकादायक झाली असून ती केंव्हा कोसळेल याचा नेम नाही.तसे झाल्यास गावाला पाणी पुरवठा होणार नाही याला सर्वस्वी जबाबदार त्या काळचे पदाधिकरी राहतील असा खुलासा सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केला आहे.

          

यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले, जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाच लाख लिटरची पाणी साठवण व पाणी पुरवठा टाकी असून याच टाकीतून सध्या गावाला पाणी पुरवठा होत आहे.तिची मुदत संपल्याने व तिची पडझड झाल्याने तिचे प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या मार्फत स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यांनी १ जुलै २०१५ रोजी आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाला सादर केला होता.त्यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ही टाकी तात्काळ पाडण्यात यावी असे पत्र ग्रामपंचायतीला दिले होते.मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.ही टाकी इतकी धोकादायक आहे की ती जोराच्या वाऱ्याने सुद्धा कोसळू शकते.असा काही अनर्थ झाला तर गावाला पाणी पुरवठा करता येणार नाही.नवीन टाकी उभारण्यासाठी कोरोनामुळे तात्काळ निधी उपलब्ध होणार नाही.तरीपण २०२१-२२ या आर्थिक वर्षात १५ व्या वित्तआयोगातून १० लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी तरतूद केली जाईल.१५ व्या वित्त आयोगाच्या निधी मधून जास्तीस जास्त निधी नवीन पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी द्यावा लागणार असल्याने गावातील इतर विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे गावातील रस्ते, गटारी या कामासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती यांच्या कडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मागील काळात 4 कोटी खर्चाची पाणीपुरवठा प्रस्तावित केल्याचे तत्कालीन सत्ताधरी मंडळी सांगतात पण ह्या योजनेत वाड्या वस्त्यांचा समावेश नव्हता व नवीन पाण्याची टाकी देखील प्रस्तावित केलेली नाही.

टाकी बांधण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून निधी दिला जाईल परंतु टाकी बांधण्यास दिड वर्षाचा कालावधी लागु शकतो या काळात काही घटना घडल्यास गावाच्या पाणी पुरवठ्याचे काय असा सवालही साळवी व खंडागळे  यांनी केला आहे. मागील काळात पाणी साठवण तलावात साठलेला गाळ,शेवाळ आदी काढले नसल्याने खराब पाणी येत होते.त्याची कार्यवाही पण आम्ही सुरू केले आहे.नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेती महामंडळाकडून जागाही प्राप्त करून घेण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे  साळवी व खंडागळे यांनी सांगितले.कै .भागवतराव खंडागळे पा सरपंच असताना ही पाण्याची टाकी  बांधलेली होती आता  त्यांचा नातु अभिषेक खंडागळे उपसरपंच असताना त्याने नविन दहा लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला आहे हा योगायोगच म्हणावा लागेल.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण अपहरण व खुन प्रकरणाचा तपास केवळ सी सी टी व्ही मुळे लागला असुन सी सी टी व्ही असणार्या त्या शाळेचा सन्मान जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण  करुन खुन करण्यात आला या घटनेबाबत बेलापुर ग्रामस्थांनी एकजुट दाखवत गाव बंद ठेवण्याचा ईशारा दिला होता हा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत उचलुन धरला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी दिवस रात्र एक करुन आरोपी शोधण्याचा प्रयत्न करत होते घटनेला आठ दिवस उलटुनही हिरण यांच्या खुन्याचा तपास लागत नव्हता सर्व पोलीस यंत्रणा ज्या ठिकाणाहून हिरण यांचे अपहरण झाले तेथुनच पुढे तपास करत होती श्रीरामपुर पोलीस गुन्हे अन्वेषणची टिम कठोर मेहनत घेवुनही  हाती काहीच लागत नव्हते त्यामुळे आरोपी येताना कोणत्या तरी रस्त्याने आले असतील हा विचार एल सी बी च्या अधिकाऱ्यांना आला अन त्या दिशेने तपास सुरु झाला बेलापुरला येणारे सर्व रस्ते रस्त्याच्या कडेला असणारे सी सी टी व्ही तपासण्याचे काम एल सी बी ने हाती घेतले हे करत असताना उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथील न्यू इंग्लिश स्कूल व रावसाहेब बाळाजी पा थोरात कला कनिष्ट महाविद्यालय येथील शाळेत सी सी टी व्ही असल्याचे एल सी बी पथकाला समजले त्यांनी तातडीने उक्कलगाव येथील सामाजिक कार्येकर्ते दिलीप थोरात यांना बोलावले व शाळेतील कँमेरे तपासावयाचे आहेत असे सांगितले दिलीप थोरात यांनी ताताडीने महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपीक गुलाब गाडेकर यांना शाळेत बोलावले व पोलीसांना सहकार्य करत कँमेरे तपासण्यास परवानगी दिली अन चार वाजेच्या दरम्यान एक गाडी रस्त्याने जाताना दिसली त्या गाडीची नंबर प्लेट ओझरती दिसली एल सी बी च्या पथकाने आपले सर्वस्व पणाला लावून त्या नंबरशी मिळत्या जुळत्या ३० ते ३५ गाड्या शोधुन काढल्या अन अखेर आरोपींनी वापरलेली गाडी पोलीसांच्या ताब्यात आली अन खरे आरोपी जेरबंद झाले आरोपींच्या मुसक्या आवळताच पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला  हे केवळ शाळेने लावलेला एक कँमेरा रस्त्याच्या दिशेन असल्यामुळे शक्य झाले   त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी उक्कलगाव येथील शाळेचे कनिष्ठ लिपीक गुलाब गाडेकर  व सामाजिक कार्येकर्ते दिलीप थोरात यांना बोलावून त्यांचा सन्मानपत्र देवुन  गौरव केला.


शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे शुक्रवारी ऐन उन्हाळ्यात श्रीमती रतनबाई अप्पासाहेब मुद्गुले,गणेश अप्पासाहेब मुद्गुले,सुरेश अप्पासाहेब मुद्गुले यांच्या मालकीच्या  शिरसगाव हद्दीतील गट क्रमांक १३ मधील ४ एकर उसाचे ५ लाख रु.व ठिबक सिंचनचे २ लाख रु.असे एकूण रु ७ लाखाचे नुकसान सकाळी ११.३० वाजेदरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे झाले आहे.उसाला लागलेल्या आगीला विझविण्यासाठी अशोक सहकारी साखर कारखाना व श्रीरामपूर नगरपालिकेकडून अग्निशामक गाड्या आल्या होत्या फार प्रयत्न करण्यात आले परंतु उन्हाळा व वाऱ्यामुळे लागलेली आग पसरत गेली.व शेवटी चार एकर उस जळीत झाले.घटनास्थळी शिरसगाव तलाठी यांनी पंचनामा केला.महावितरणचे अधिकारी,व वायरमन यांनी तातडीने भेट दिली.उन्हाळ्यात नेहमी विजेच्या शोर्टसर्कीटने आगी लागत असतात.त्याचे मुख्य कारण म्हणजे महावितरणचा हलगर्जीपणा नेहमी दिसतो.कारण या भागात विजेच्या तारा खाली लोंबकळत असतात,वाऱ्याने एकमेकांना घासतात.त्याच प्रमाणे विजेचे आकडे टाकण्यात येतात.या सर्व प्रकाराने कोणाचे ना कोणाचे अतोनात नुकसान होत असते.तरी महावितरणच्या अधिकारी कर्मचारी यांनी सर्व तारा ताणून घ्याव्यात म्हणजे उसाला आगी लागण्याचे प्रमाण कमी होईल.अथवा आळा बसेल एक दोन दिवसात या भागातील विजेच्या तारा सुरळीत करून द्याव्यात.अशी अपेक्षा शिरसगाव नागरिक करीत आहेत.

श्रीरामपूर /प्रतिनिधी-वॉर्ड नं-2 मधील नई दिल्ली परीसर, जैनब नगर परिसर व अत्तरी मस्जिद परिसर या भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या कॅनॉल वरील पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, या करिता भागातील युवक कार्यकर्ते अल्प संख्याक काँग्रेसचे जिल्हा समन्वयक जफर शाह यांनी आ.लहुजी कानडे यांचे कडेस निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले,याकामी परीसरातील नागरीकांनी वेळोवेळी निवेदने देऊन या प्रश्नावर लक्ष वेधले होते आ.कानडे साहेबांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तात्काळ सदर पुलास मंजुरी देऊन लवकरच काम सुरू होईल याबाबत खात्री दिल्याने भागातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सदर पुलासाठी भागातील सामाजिक कार्येकर्ते जाफर शाह यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यामुळे पुलास मंजुरी मिळाली आहे, असे अनेक कामे जे लोकप्रतिनिधी मार्फत होत नाही त्या कामास तडीस नेण्याचे कार्य जाफर शाह यांनी केले असे भागातील जनतेत बोललं जातंय. याचीच पोच पावती म्हणून पक्षाने या भागातून जाफर शाह यांना नगरसेवक पदाची उमेदवारी द्यावी असेही लोकांची मागणी आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget