Latest Post

श्रीरामपूर -
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणी काल पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले.असून त्यात नाशिकच्या चार जणांचा समावेश आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या श्रीारामपूरच्या दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर काल त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे दि. 1 मार्च 2021 रोजी अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. सात दिवसानंतर त्यांचा मृतदेह वाकडी रोडवरील यशवंतबाबा रेल्वे चौकीजवळ आढळून आला. त्याचदिवशी पोलिसांनी बिट्टु वायकर व सागर गंगावणे यांना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. काल त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासाठी वेगवेगळी चार पथके पाठविण्यात आली होती. त्यात नाशिक येथील चार व अन्य ठिकाणचा एक़ अशा पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज (शनिवारी) त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.



अहमदनगर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  रोखण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे थेट रस्त्यावर उतरले. विनामास्क फिरणार्‍या आणि प्रवास करणार्‍या नागरिकांवर आणि शासकीय कार्यालयात विनामास्क

वावरणार्‍या कर्मचार्‍यांवर थेट दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.  शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत आहे. बेजबाबदार नागरिकांमुळे जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येत असून अशा नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात विनामास्क नागरिक आढळून येतील, अशा दुकानांवर महिनाभर बंदी घालण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील,  मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदींची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी थेट भिंगारवाला चौक गाठला. तेथील  दुकानांत तसेच रस्त्याने विनामास्क फिरणार्‍या नागरिकांना फटकारले आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. ज्या व्यक्ती विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.तेथून अचानक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख थेट पुण्याकडे जाणार्‍या बसेस थांबतात, त्या स्वस्तिक स्टॅन्ड येथे दाखल झाले. तेथे आलेल्या शिवशाही बसमध्ये असणार्‍या विनामास्क प्रवाशास इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्याबद्दल फटकारले आणि त्यांना दंड भरण्यास सांगितले. तेथे आलेल्या इतर बसेसचीही तपासणी करण्यात आली. नागरिकांनाही त्यांनी आवाहन करुन, कोरोना संसर्ग रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ दंड भरला म्हणजे जबाबदारी संपत नाही, तर प्रत्येकाने स्वताबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी. शासकीय कार्यालयात 'मास्क नाही-प्रवेश नाही' अशी मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आज अचानक त्यांनी पोलीस अधीक्षकांसह जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी तेथे विनामास्क आढळलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली.तेथून थेट त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि समोर असलेल्या इमारतीतील कार्यालयांना भेट दिली. यावेळी काही कर्मचारी विनामास्क आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला.सध्या कोरोना संसर्ग वाढत असून नागरिकांनी स्वताच्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर जिल्हावासियांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. शहरातील काही दुकानांत दुकानमालक तसेच कर्मचारी विनामास्क असल्याचे दिसतात. तर दुकानात जाणारे काही नागरिकही विनामास्क आढळून येत आहेत. यापुढे असे प्रकार घडल्यास संबंधित दुकान पुढील महिनाभर बंद ठेवण्याची कारवाई करण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कारण, केवळ दंड वसूल करणे हे उद्दिष्ट नसून वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख श्री. पाटील म्हणाले, पोलिसांनी ज्या ठिकाणी लग्न समारंभ होत आहेत, अशा मंगल कार्यालयांना भेटी देऊन ज्याठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे, अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील एका तरुणास विजेचा शाँक बसला असुन त्यास अत्यवस्थ अवस्थेत  श्रीरामपुर येथील साखर कामगार हाँस्पीटल मध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले          बेलापुर  येथील भाऊराव लक्ष्मण   चव्हाण हे सायंकाळी घरुन निघुन रस्त्याने जात असताना जवळील विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे विजेचा जोरदार शाँक  लागला त्यामुळे गंभीर अवस्थेत त्यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषीत केले त्याचे वय अवघे २६ वर्षाचे असुन त्यास तीन मुली असुन पत्नी गरोदर असल्यामुळे माहेरी गेली होती  बेलापुर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तापास हवालदार अतुल लोटके हे करत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील एका अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन तीला पळविण्याचा प्रयत्न मुलीच्या हुशारीमुळे फसला असला तरी या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.या बाबत समजलेली माहीती अशी की भागवत नगर बेलापुर येथे राहणारी मुलगी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान आपल्या आई सोबत घरी येत होती घरासमोर आल्यावर आई घराचा दरवाजा उघडत असतानाच एक मुलगा अचानक आला व त्याने आई समोरच मुलीचे तोंड दाबले मुलीने प्रसंगावधान राखुन तोंड दाबलेल्या हाताला कडकडून चावा घेतला त्यामुळे त्याने मुलीला सोडून पळ काढला ही घटना काल सायंकाळी  साडे सात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान घडली या बाबत बेलापुर पोलीसांना कळविण्यात आले आहे संशयीत ईसमाचा बेलापुर पोलीस शोध घेत आहे दरम्यान उपसरपंच अभिषेक खंडागळे शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार रमेश अमोलीक यांनी संबधीत कुटुंबीयांची भेट घेतली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त संत सावता महाराज मंदिर व बेलापुर ग्रामपंचायत येथे त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार र्अपण करुन अभिवादन करण्यात आले या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक

खंडागळे विलास मेहेत्रे प्रकाश कुर्हे जालींदर कुर्हे  पत्रकार देविदास देसाई  दिलीप दायमा सुहास शेलार मोहसीन सय्यद भास्कर वारे अर्जुन कुर्हे रमेश लगे सचिन नगरकर प्रभाकर कुर्हे गोरख कुताळ बबन मेहेत्रे बाळासाहेब टेकाडे संदिप कुर्हे महेश कुर्हे मधु अनाप रफीक शेख भाऊसाहेब कुताळ रमेश अमोलीक यादवा काळे विष्णूपंत डावरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण होवुन दहा दिवस झाले तसेच मृतदेह सापडून चार दिवस उलटले तरी खूनाच्या कारणा पर्यत पोलीस अजुनही पोहोचले नसल्याबद्दल सर्व सामान्य नागरीकाकडून संताप व्यक्त केला जात आहे                                    येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण व खूना संदर्भात पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली असली तरी अपहरण व खूना मागील नेमके कारण शोधण्यात पोलीसांना अपयश आलेले आहे हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांचा झटापटीत मृत्यू झालेला असावा शव विच्छेदन अहवालातही डोक्याला गभींर ईजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे असे असले तरी पकडलेल्या आरोपींनी हत्या का केली याचा उलगडा पोलीसांना अजुनही झालेला नाही गुन्हा अन्वेषन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी डोळ्यात तेल घालुन तपास करत आहे परंतु गुन्हा घडण्यामागील महत्वाचे कारण आजही गुलदस्त्यात आहे गौतम हिरण यांचा खरा मारेकरी व त्यांच्या अपहरणा मागील कारण पोलीस केव्हा शोधुन काढतात याकडे हिरण परिवारासह ग्रामस्थांचेही लक्ष लागले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील व्यापारी गौतम हिरण याचे अपहरण झालेल्या ठिकाणास विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्रचे प्रतापराव दिघावकर यांनी भेट देवुन घटनाक्रम जाणुन घेतला या वेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके या वेळी  उपस्थित होते                                 विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्रचे प्रतापराव दिघावकर यांनी हिरण यांचे गोदाम अपहरण झालेले ठिकाण याची पहाणी केली या घटनेत असणारे साक्षीदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली ज्या ठिकाणाहुन अपहरण झाले त्या ठिकाणाचीही पहाणी केली त्यानंतर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना तपासाबाबत सुचना केल्या या वेळी सरपंच महेंद्र साळवी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे भरत साळुंके देविदास देसाई  प्रशांत लढ्ढा अमोल गाढे विशाल आंबेकर आदि उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget