बेलापुर (प्रतिनिधी )-येथील एका तरुणास विजेचा शाँक बसला असुन त्यास अत्यवस्थ अवस्थेत श्रीरामपुर येथील साखर कामगार हाँस्पीटल मध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले बेलापुर येथील भाऊराव लक्ष्मण चव्हाण हे सायंकाळी घरुन निघुन रस्त्याने जात असताना जवळील विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे विजेचा जोरदार शाँक लागला त्यामुळे गंभीर अवस्थेत त्यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषीत केले त्याचे वय अवघे २६ वर्षाचे असुन त्यास तीन मुली असुन पत्नी गरोदर असल्यामुळे माहेरी गेली होती बेलापुर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तापास हवालदार अतुल लोटके हे करत आहे.
Post a Comment