Latest Post

राहुरी प्रतिनिधी मिनाष पटेकर-दिनांक १६ फेब्रुवारी रोजी राहुरी कृषी मंडळ अधिनस्त मौजे आरडगाव व पाथरे खुर्द येथे जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील शास्रज्ञ डॉ अनिल दुरगुडे उपस्थित होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की आजच्या परिस्थितीत जमीनीच्या आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीपरिक्षण करून खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. यावेळी भरमसाठ खतांचा वापर केल्याने होणारे नुकसान यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकरी बांधवांच्या शंकांचे निरसन केले. मातीपरिक्षण करण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन व मदत केली जाईल असे तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी सांगितले.

कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी मंडळ  कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, सहाय्यक  कृषी अधिकारी बाळासाहेब सूळ,आकाश गोरे,बिरू केसकर, शिवप्रसाद कोहोकडे, कैलास मकासरे, मंगेश बनकर व भिमराज गडधे यांनी विशेष परिश्रम घेतले. मौजे आरडगाव येथे सुनील मोरे, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर काळे, कुशाबापू ढेरे, मच्छिंद्र भुसारे,अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब म्हसे, योगेश वाघ,संजय म्हसे, चिमाजी डोईफोडे व सूर्यभान म्हसे तसेच पाथरे खुर्द येथे गिताराम घारकर,रखमाजी जाधव, नारायण टेकाळे,बाळासाहेब जाधव,शिवाजी टेकाळे, हरिभाऊ जाधव,वामन पवार, नानासाहेब पवार, दीपक जाधव, विजय जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.



श्रीरामपूर -श्रीरामपुर तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रीया पार पडली असून खर्च सादर करण्याची मुदत संपूनही अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा अन्यथा असे उमेदवार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार निर्रह ठरविण्यात पात्र राहतील, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रीया पार पडली. ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे विवरण एक महिन्याच्या आत दाखल करणे आवश्यक होते. त्यांनी एकत्रित खर्चाचे विवरणपत्र मुदतीत दि. 17 फेब्रुवारी 2021 पुर्वी सादर करणे आवश्यक होते.मुदत संपूनही निवडणूक खर्चाचे विवरण सादर न करणार्‍या उमेदवारांनी केलेल्या कालमर्यादेत निवडणूक खर्चाची विवरणे सादर करण्यात कसुर करतील, त्यांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी निर्रह ठरविण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला प्रदान करण्यात आलेला आहे.तरी अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा अन्यथा असे उमेदवार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 1 4-ब(1) अन्वये निर्रह ठरविण्यात पात्र राहतील, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

नगराध्यक्षा आदिकांकडे नगरसेवक अंजुम शेख यांची मागणी.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता रेल्वे रुळाच्या पलिकडील भागात हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानची गरज असूनमिल्लतनगरजवळ याबाबत विकास योजनेत आरक्षण मंजूर आहे. सदर हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानच्या जागा संपादनाची प्रक्रिया श्रीरामपूर नगरपालिकेने तातडीने सुरू करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक अंजुम शेख यांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अंजुम शेख यांनी नगराध्यक्षा आदिकांना हे निवेदन दिले. त्याप्रसंगी नगरसेवक ताराचंद रणदिवे, राजेंद्र पवार, रज्जाकभाई पठाण, अस्लमभाई सय्यद, एस. के. खान आदी उपस्थित होते.श्रीरामपूर शहरातील रेल्वेलाईनच्या उत्तरेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती झालेल्या आहेत. नागरिकांच्यादृष्टीने मुलभूत सुविधा या वसाहतींच्या जवळच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध व्हाव्यात म्हणून नगरपरिषदेने विकास योजना मंजूर केलेल्या असून विषयांकीत आरक्षणे ठेवलेली आहेत. सदर स्मशानभूमीसाठी आरक्षण क्र. 40 हे 0.72 हेक्टरवर तर मुस्लिम कब्रस्तानसाठी आरक्षण क्र. 41 हे 0.68 हेक्टरवर असून त्याचा सिटी सर्व्हे नंबर 2176 आहे. सदर क्षेत्र हे मिल्लतनगर येथील साठवण तलावाच्या शेजारी आहे.कॉलेज रोडला जी मुस्लिम समाजासाठी दफनभूमी आहे. वाढती लोकसंख्या पाहता नवीन दफनभूमीची निश्चित गरज आहे. त्याचप्रमाणे हिंदू स्मशानभूमीचे शहरातील अंतर पाहता याच भागात नवीन स्मशानभूमीची गरज आहे. शिवाय या दोन्हीही विषयांसाठी जागेचे आरक्षण मंजूर असल्याने तातडीने पालिकेने जर या दोन्ही कामांसाठी जागा संपादनाची प्रक्रिया सुरू केल्यास नागरिकांच्यादृष्टीने हे मोठे काम होणार आहे.कारण भविष्यात जर जागांचे भाव वाढले तर जागेच्याही किंमती वाढतील आणि नगरपालिकेला या जागा अधिग्रहीत करणे कदाचित खर्चिकही होईल. त्यापेक्षा तातडीने सदर दोन्ही कामांसाठी पालिकेने अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केल्यास आणि सर्वसाधारण सभेत यावर निर्णय घेतल्यास पुढील दोन-पाच वर्षात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन नागरिकांसाठी ही गरजेची सुविधा होईल म्हणून आपण लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी या पत्रकात अंजुम शेख यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अंजुम शेख यांनी सांगितले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-शहरातील प्रवरा डाव्या कालव्यातून एका तरुणाचा मृतदेह वाहून जात असताना नागरिकांनी पाहिले असता

त्याचा मृतदेह पोलिसांच्या मदतीने वॉर्ड नं. 7 मधील अक्षय कॉर्नरच्या परिसरात अडवून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काल सकाळच्या दरम्यान एका तरुणाचा मृतदेह पाटातून वाहून जात असताना नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलीस तात्काळ कॅनालच्या कडेला पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह अक्षय कार्नर परिसरात कालव्यातून बाहेर काढला.
त्यावेळी त्याचे खिसे तपासले असता त्याच्या खिशात मतदान ओळखपत्र आढळून आले. त्यानुसार हा तरुणाचे नाव जुनेद झाकिर पटेल (वय 30, रा. मिल्लतनगर) असे असल्याचे पोलिसांनी कळाले. काल सकाळी अक्षय कार्नर परिसरात काही नागरिकांनी कालव्यातील पाण्यात एक मृतदेह वाहत येताना पहाताच हा मृतदेह पहाण्यासाठी गर्दी केली होती. मयत तरुणाच्या खिश्यात मतदान कार्ड, मोबाईलसह काही पैसे मिळाल्याचे आढळून आल्याचे समजते.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुपारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जुनेद यांच्या मागे आईवडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-राजकीय दृष्ट्या महत्वाची समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी महेंद्र जगन्नाथ साळवी यांची बिनविरोध तर अभिषेक खंडागळे हे अकरा विरुध्द सहा मतानी विजयी घोषीत  करण्यात आली साळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गोसावी यांनी सरपंच पदी साळवी व उपसरपंच पदी खंडागळे   यांच्या नावाची घोषणा केली           

राजकीय महत्वाची समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायत १७ जागेकरीता झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाला ११ तर जनता विकासा अघाडीला सहाच जागा मिळाल्या होत्या सरपंच निवडीत काही गडबड होणार नाही याची गावकरी मंडळाने पुरेपुर खबरदारी घेवुन सर्व सदस्यांना सहलीला पाठविले होते त्या नंतर भास्करराव खंडागळे यांच्या निवासस्थानी  पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक झाली गावकरी मंडळाचे श्रेष्ठी जि प सदस्य शरद नवले भाजपाचे  सुनिल मुथा भास्करराव खंडागळे भाजपा ओबीसी प्रांत उपाध्यक्ष प्रकाश चित्ते आर पी आय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात उपसभापती बाळासाहेब तोरणे रणजीत श्रीगोड लोकसेवा विकास अघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश भाकरे  प्रकाश पा नाईक जालींदर कुर्हे रावसाहेब अमोलीक हाजी ईस्माईल शेख साहेबराव वाबळे आदिंनी चर्चा करुन राखीव जागेकरीता निवडून आलेल्या महेंद्र साळवी रमेश अमोलीक स्वाती अमोलीक मीना साळवी या चारही जणांना पंधरा महीने सरपंच पद देण्याचे सर्वानुमते ठरले त्या नुसार महेंद्र साळवी यांनी सरपंच पदाकरीता अर्ज दाखल केला सरपंच पदाकरीता एकच अर्ज आल्याने त्याना  सरपंच      म्हणून बिनविरोध घोषीत करण्यात आले उपसरपंच पदाकरीता अभिषेक खंडागळे व खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड याचे अर्ज दाखल झाल्याने निवडूक घेण्यात आली त्यात अभिषेक खंडागळे यांना अकरा मते मिळाली खटोड यांना सहा मते मिळाली   गावकरी मंडळाने बोलविलेल्या बैठकीस प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे अकबर टिन मेकरवाले विशाल आंबेकर भास्कर बंगाळ मोहसीन सय्यद सुधाकर खंडागळे संजय गोरे सुभाष अमोलीक बाळासाहेब दाणी अनवर सय्यद अजीज शेख नवाब सय्यद बबलु कुर्हे जिना शेख जाकीर शेख उमर शेख सुभाष अमोलीक सुरेश अमोलीक सचिन वाघ शशीकांत तेलोरे  सागर ढवळे रत्नेश गुलदागड रमेश काळे यादव  काळे हेमत मुथा  आदी  उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाबासाहेब गोसावी यांनी काम पाहीले त्यांना ग्रामसेवक राजेश तगरे व कामगार तलाठी कैलास खाडे यांनी सहाकार्य केले  या वेळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके पोपट भोईटे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

राहुरी |प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दि.1 फेब्रुवारी रोजी घडली असून.

याबाबत राहुरी पोलिसांत अज्ञात इसमा विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीचे राहुरी फॅक्टरीहून रिक्षातून अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना घडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. अपहरण झालेल्या मुलीचे वय 17 वर्षे 5 महिने असून ती गुंजाळे येथे आपल्या कुटुंबाबरोबर राहते. दि. 1 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजे दरम्यान अज्ञात इसमाने त्या मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुध्द भादंवि. कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुशांत दिवटे करीत आहेत.

१ फेब्रुवारी २०२१ - श्रीरामपूर | शिर्डीत पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा हा लोकशाहीला काळिमा फासणारा असून, पत्रकारांच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारा आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा; राज्यभर तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. 

            ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे हे मनमानी भूमिका घेत आहेत.  दोन महिन्यापूर्वी साईबाबा मंदिर परिसरात एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या दोन प्रतिनिधींसह कॅमेरामन वर शासकीय कामात अडथळा आणणे, साथरोग नियमांचे उल्लंघनकेल्याचा ठपका ठेऊन  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानाच्या अधिकाऱ्यांनी २ महिन्यानंतर गुन्हा दाखल केल्याने यामागे सुडाची भावना असल्याचा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे. यावेळी  जयेश सावंत, दत्तात्रय खेमनर, अस्लम बिनसाद, स्वप्नील सोनार, अभिषेक सोनवणे, विठ्ठल गोराणे, 

राजेश बोरुडे, निलेश भालेराव, सुहास शेलार, सचिन उघडे, प्रभात शिंदे, वृषीकेश पोळ, अजहर शेख, अल्फाज जुनानी, कैफ मेमन, अफान कुरेशी, आकिब शेख, मोईज पठाण, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget