वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्या अन्यथा; राज्यभर आंदोलन छेडण्याचा ग्रामीण पत्रकार संघाचा इशारा.

१ फेब्रुवारी २०२१ - श्रीरामपूर | शिर्डीत पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा हा लोकशाहीला काळिमा फासणारा असून, पत्रकारांच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारा आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा; राज्यभर तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. 

            ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे हे मनमानी भूमिका घेत आहेत.  दोन महिन्यापूर्वी साईबाबा मंदिर परिसरात एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या दोन प्रतिनिधींसह कॅमेरामन वर शासकीय कामात अडथळा आणणे, साथरोग नियमांचे उल्लंघनकेल्याचा ठपका ठेऊन  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानाच्या अधिकाऱ्यांनी २ महिन्यानंतर गुन्हा दाखल केल्याने यामागे सुडाची भावना असल्याचा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे. यावेळी  जयेश सावंत, दत्तात्रय खेमनर, अस्लम बिनसाद, स्वप्नील सोनार, अभिषेक सोनवणे, विठ्ठल गोराणे, 

राजेश बोरुडे, निलेश भालेराव, सुहास शेलार, सचिन उघडे, प्रभात शिंदे, वृषीकेश पोळ, अजहर शेख, अल्फाज जुनानी, कैफ मेमन, अफान कुरेशी, आकिब शेख, मोईज पठाण, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget