श्रीरामपूर (प्रतिनिधी)-शहरातील प्रवरा डाव्या कालव्यातून एका तरुणाचा मृतदेह वाहून जात असताना नागरिकांनी पाहिले असता
त्याचा मृतदेह पोलिसांच्या मदतीने वॉर्ड नं. 7 मधील अक्षय कॉर्नरच्या परिसरात अडवून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काल सकाळच्या दरम्यान एका तरुणाचा मृतदेह पाटातून वाहून जात असताना नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलीस तात्काळ कॅनालच्या कडेला पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह अक्षय कार्नर परिसरात कालव्यातून बाहेर काढला.
त्यावेळी त्याचे खिसे तपासले असता त्याच्या खिशात मतदान ओळखपत्र आढळून आले. त्यानुसार हा तरुणाचे नाव जुनेद झाकिर पटेल (वय 30, रा. मिल्लतनगर) असे असल्याचे पोलिसांनी कळाले. काल सकाळी अक्षय कार्नर परिसरात काही नागरिकांनी कालव्यातील पाण्यात एक मृतदेह वाहत येताना पहाताच हा मृतदेह पहाण्यासाठी गर्दी केली होती. मयत तरुणाच्या खिश्यात मतदान कार्ड, मोबाईलसह काही पैसे मिळाल्याचे आढळून आल्याचे समजते.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुपारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जुनेद यांच्या मागे आईवडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
Post a Comment