
पाटणबोरी- जनता हायस्कूल पाटणबोरी येथे भव्य मैदानात अक्षय तोटावार मित्र क्रीडा मंडळ पाटणबोरी यांच्या वतीने देशाच्या संरक्षण निधिकरिता स्वतःक्रिकेट खेळणारे भारतातील एकमेव मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा.सा. कन्नमवार यांच्या स्मरणार्थ कन्नमवार चषक - २०२० आयोजन करण्यात आले. १९६२ ला भारत चीन युद्ध परिस्थितीत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा. सा. यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांनी सोपविली आणि ते केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले. नुकतेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळत दादासाहेबांनी युद्धमय परिस्थितीत राष्ट्रीय संरक्षणनिधी करिता भरभक्कम आघाडी उभारली. प्रत्येक मंत्री- उपमंत्र्याकडे जिल्हाची जबाबदारी विभागून दिली. केंद्राकडून तसेच आपल्या राष्ट्रीय नेत्याकडून येणारा प्रत्येक आदेश कार्यान्वित करून *कोट्यावधी रुपयांचा निधी व सोने गोळा केले. त्याकरीता त्यांनी तुफानी दौरे केले.* तसेच विविध कार्यक्रम घेतले.त्यापैकी मुख्य 1) जनसंपर्कातून प्रचंड निधी, 2) सहामाही कार्यक्रम, 3) क्रिकेट मॅच , 4) श्रमदान सप्ताह, 5) " हमारा हिमालय प्रदर्शन", 6) व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम इत्यादी होत. त्यांनी केलेल्या कार्याचा स्मरण व्हावा याकरिता अक्षय तोटावार पाटणबोरी येथे कन्नमवार चषक क्रिकेट स्पर्धा दि. 11 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत आयोजित केलेला होता. जवळपास 50 संघ सहभागी होते, महाराष्ट्रात सर्वप्रथम कन्नमवार चषक ची सुरुवात अक्षय तोटावार यांच्या संकल्पनेतून सुरू झाला. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी केलेले कार्य जनमानसात पोहचावा हा उद्देश ठेवून कन्नमवार चषक आयोजित केलेला होता, त्यांच्या या संकल्पनेला संपुर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून स्तुती करण्यात आली.
अंतिम सामना पाटणबोरी व सतपल्ली वठोली या संघा दरम्यान झाला . अंतिम सामन्यात सतपल्ली वठोली संघाने एकतर्फे विजय मिळवत कन्नमवार चषक - 2020 चा मानकरी ठरला. याबक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश्वर गोंड्रावार,सभापती पं.स.झरीजामनी हे होते, प्रमुख पाहुणे ऍड.किष्टांन्ना मुत्यलवार, जिल्हाध्यक्ष युवा बेलदार समाज संघटना, यवतमाळ, हनमंतु कायपेल्लीवार,सरपंच कोपामांडवी, हनमंतु रजनलवार, सेवानिवृत्त तहसीलदार, विनोद बोरतवार, उपाध्यक्ष युवा बेलदार समाज संघटना, यवतमाळ, गजानन चंदावार,कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र,रोहित माडेवार,नागपूर,संदिप मुत्यलवार, वणी बेलदार समाज शहर अध्यक्ष, अनिल कर्लावार, अध्यक्ष युवा बेलदार समाज संघटना शाखा, पाटणबोरी, श्री.अशोक गंड्रतवार,सचिव यु.बे.स.स.शाखा पाटणबोरी श्री.रमेश बनपेल्लीवार सर, श्री.विनोद कनाके, श्री.सचिन पत्रकार ( MCN NEWS ) श्री.सुबोध जंगम, श्री. विकास कांबळे , श्री.गणेश बोनपेल्लीवार , रामुलू अडपावार, माधव बोलचेट्टीवार, शंकर पत्तीवार सर, मधुसूदन अडपावार, दत्तात्रय देवलवार सर, रमेश तोटावार, राजू बोलचेट्टीवार, राकेश अडपावार आदी उपस्थित होते . प्रथम पारितोषिक राजेश्वर गोड्रावार,सभापती पं.स.झरीजमणी व राजू पसलावार, सदस्य पं.स.सदस्य पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने सतपल्ली वठोली संघाला देण्यात आला.द्वितीय पारितोषिक शिनुअण्णा नालमवार,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव अक्षय तोटावार मित्र क्रीडा मंडळ , पाटणबोरी संघाला देण्यात आला. परंतु हा संघ बक्षीस स्वतःजवळ न ठेवता सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण करत आहे या विध्यार्थ्यांकरिता दिले.तृतीय पारितोषिक गजानन बेजंकिवार, सदस्य जि.प.यवतमाळ व सभापती कृ.उ.बाजार समिती पांढरकवडा जाणता राजा पाटणबोरी संघाला देण्यात आला.
वैयक्तिक पारितोषिक मध्ये उत्कृष्ट खेडाळू करीता प्रदीप बोनगीरवार सर याचे कडून निखिल गिज्जेवार, व अनिल मोहिजे, उत्कृष्ट संघ रोहित माडेवार यांच्या तर्फे सतपल्ली वठोलीसंघ, मॅन ऑफ दि सिरीज अँड.किष्टना मुत्यलवार यांचे कडून गणेश कांदसवार , बेस्ट बॅट्समन,हनमंतु कायपेल्लीवार यांचे कडून प्रवीण गिज्जेवार , बेस्ट विकेट, संदिप मुत्यलवार वणी यांचे कडून राहुल डोंगुरवार, मॅन ऑफ दि मँच, अनिल कर्लावार यांचे कडून राहून मोहिजे, बेस्ट बॉलर,अशोक गंड्रतवार यांचे कडून राहुल मोहिजे , बेस्ट कॅच म्हणून दत्तात्रय देवलवार यांचे कडून प्रतीक आईटवार, बेस्ट 3/4 म्हणून संदिप केमेकार यांचे कडून निखिल लक्षट्टीवार ,बेस्ट विकेट किपर - श्री.गणेश बोनपेल्लीवार यांचे कडून आयसन शेख , मॅन ऑफ दि टुर्नामेंट प्रवीण गिज्जेवार ला देण्यात आले. अशा प्रकारे कन्नमवार चषक यशस्वितेकरिता पाटणबोरी व कोपमांडवी, वणी, नागपूर , मांडवी, इ .भागातून देणगी दात्यांनी आर्थिक मदत केली ही.
क्रीडा सामन्याच्या यशस्वीत्याकरीता अक्षय तोटावार मित्र क्रीडा मंडळ , पाटणबोरी व बेलदार समाज बांधव , पाटणबोरी वाशीयांनी तन-मन-धना ने सहकार्य केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राकेश मंदीकुटावार सर यांनी व आभार प्रदर्शन श्री.शंकर पत्तीवार सर यांनी केले.