Latest Post

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथून इंदूरची महिला  तीन वर्षापूर्वी बेपत्ता झाली होती ती इंदूर येथे आता सापडली आहे, मात्र ही महिला शिर्डीतून बेपत्ता झाली होती, मात्र तिच्या पतीने या महिलेचे अपहरण झाल्याची मोठी चर्चा केली होती, शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्यासंदर्भात मिसिंग  गुन्हा दाखल झाला असला तरी  हे प्रकरण खंडपीठा पर्यंत गेले होते ,त्यामुळे ते संपूर्ण राज्यात गाजले होते ,मात्र ही महिला इंदूरची व ती तीन वर्षांनी परत इंदूरमध्येच सापडली, ही महिला सध्या काही सांगत नाही ,असं तिचा पती मनोज सोनी  म्हणतो, मात्र इंदूरची महिला इंदूरमध्ये सापडते ती शिर्डीतून बेपत्ता झाली तीन वर्ष गायब होती आणि आता परत इंदूरला सापडते या पाठीमागे काहीतरी गौडबंगाल आहे ,मात्र त्यामुळे शिर्डीचे नाव बदनाम होत आहे, विनाकारण शिर्डी चे नाव त्यामध्ये बदनाम होत असून शिर्डीतून महिलांचे अपहरण होते याची चर्चा देश-विदेशात झाली त्यामुळे शिर्डीचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाला याला कारणीभूत मनोज सोनी व दीप्ती सोनी हेच आहेत, त्यामुळे या दोघांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे,

  जितेश लोकचंदानी यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या या मागणी पत्र पुढे म्हटले आहे की, इंदौर येथील सोनी परिवार शिर्डीला साई दर्शनासाठी आला होता ,दि, १० /८/२०१७रोजी पती व लहान मुलगा व मुली समावेत शिर्डी शहरात साई दर्शन झाल्यानंतर  प्रसादासाठी भोजनालयात हे कुटुंब गेले असता व नंतर बाहेर आल्यानंतर अचानक रहस्यमय दीप्ती मनोज सोनी ही महीला बेपत्ता झाली होती, तसा मिसिगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, शिर्डी पोलिसांनी विविध प्रकाराने तपास करुनही मिळुन आली नाही , हे मिसीगचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे ,असे असताना ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात तिच्या बहीणीला  तीन वर्षानंतर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे , 

      याबाबत बेपत्ता महिलेचा पती मनोज सोनी यांनी सांगितले की शिर्डी  पोलिसांनी मेडिकल तपासणी केली असुन सोमवारी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगुन   १७तारखेला ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात मोठ्या बहिणीला सापडली आहे ओळख वगैरे पटली आहे ,या बाबत ती इतकी वर्षे कोठे होती तीला कोणी आधार दिला ती इंदौर येथे कशी पोहचली  या बाबत मी चौकशी चा प्रयत्न केला आहे मात्र ती फार काही सांगण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याने यांचा देखील शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास केला पाहिजे असे सांगितले शिर्डी  विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी देखील शोध घेण्यासाठी  मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता मनोज सोनी यांनी माहितीच्या अधिकारात किती लोक बेपत्ता झाली आहे ,याची माहिती. प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती, शिर्डी शहरात मानवी तस्करी होते ,याबाबत मोठा गाजावाजा झाला होता , शिर्डीतून महिलांच्या पोरं होते अशी मोठी चर्चा राज्य झाली होती त्यामुळे शिर्डी चे नाव मोठे बदनाम झाले होते त्यामुळे आर्थिक उलाढालीवर शिर्डीत फटका बसला होता ,आता दिप्ती सोनी हि महीला जरी सापडली असली तरी या प्रकरणाची कठोर चौकशी होऊन सत्य जनतेसमोर. आणण्यासाठी शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास करुन सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज आहे, त्याचप्रमाणे दीप्ती मनोज सोनी व तिचा पती मनोज सोनी या दोघांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे ,हे खरे बोलतात की खोटे बोलतात, हे संपूर्ण नागरिकांना, साईभक्तांना कळणे गरजेचे आहे ,ही महिला बेपत्ता होते व इंदोर मध्ये स्वतःच्या शहरात सापडते, या पाठीमागे कोण आहे, याचाही शोध घेणे गरजेचे आहे, विनाकारण शिर्डीचे नाव महिलांचे अपहरण होते म्हणून बदनाम केल्यामुळे मनोज सोनी व ,दिप्ती सोनी यांच्यावरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे ,अशी मागणी साई भक्तांच्या वतीने जितेश मनोहरलाल लोकचंदनी यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केली असून या दोघांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे,


श्रीरामपूर प्रतिनिधी :-महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने जानेवारी 2021 मध्ये आयोजित कै. वसंतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ पत्रकार संघाचे श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात रविवार दिनांक 20- 12-2020 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय मिडीया फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र वाघ हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीरदार, उपाध्यक्ष बी.के.सौदागर, महासचिव शेख फकीर मोहम्मद, शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जाद भाई पठाण, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, पत्रकार संघाचे कायदेविषयक सल्लागार अँड.हाजी मसूरभाई जहागीरदार, प्रदेश महासचिव फकीर महंमद शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मंन्सूरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाबखान,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजमोहंमद शेख यांनी केले या बैठकीत स्नेहमेळावा कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली याच बरोबर कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम पार पाडणे करीता कार्यक्रम समितीची निवड करण्यात आली. या समितीवर अब्दुल्ला भाई चौधरी,अमीरभाई जागीरदार, मन्सूरभाई पठाण, रियाज खान, अस्लम बिनसाद, वहाब खान, विजय खरात,सज्जादभाई पठाण, राजमोहंमद शेख, मिलिंद शेंडगे,आदींची निवड करण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय मिडीया फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी भारतीय मीडिया फाउंडेशन इतर पत्रकार संघांना बरोबर घेऊन काम करण्याची दानत ठेवून लघु वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांच्या अडचणी सोडविणे करिता प्रयत्नशील आहे पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा बिंदुसार जी यांनी पत्रकारांना किमान वेतन द्यावे त्यांच्या विमा पॉलिसी बद्दल हमी घ्यावी पत्रकारांच्या मुला-मुलींना शैक्षणिक सवलती द्याव्यात पत्रकारांना निवास्थान देण्यात यावी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना त्यांना पुढील आयुष्य साधारणपणे जगता येईल अशी भरीव मदत द्यावी पत्रकार संरक्षण कायद्यात किमान तीन वर्षे पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना समाविष्ट करून घेण्यात यावे अशाप्रकारे पत्रकारांच्या विकासाबद्दलचा विचार करता अनेक मागण्या केंद्र शासनाकडे केलेल्या आहेत. या मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावे याकरिता मीडिया फाउंडेशन च्या वतीने दिल्ली येथील रामलीला मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख बरकत अली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकाराला जात नसते जनसेवा करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करणे हीच खरी पत्रकारिता ठरते सध्या पत्रकारितेला व पत्रकार संघांना जातीय स्वरूप दिले जात आहे आशा पत्रकार संघापासून पत्रकारांनी दूर रहावे व देशातील एकात्मता जोपासावी आपण याच उद्देशाने गेली पस्तीस वर्ष लघु वृत्तपत्रांच्या पत्रकारांना सोबत घेऊन लिखाणाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्याचे व त्यांच्यावरील अत्याचार दूर करण्याचे कार्य करीत आहे. पत्रकार बांधवांवर झालेल्या अत्याचारास पत्रकार संघाकडून  त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही केलेला आहे. ज्यावेळेस पत्रकारांवर व त्यांच्या लेखणीवर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले अशा वेळेस आम्ही पत्रकार संघाच्या वतीने त्या पत्रकारांना त्या खोट्या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. हा पत्रकार संघ सर्वसामान्य जनता व पत्रकारांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. बैठकीस प्रा. त्रिभूवन सर,दस्तगिर शाह, गरीबी निर्मुलन समितीच्या शबाना भाबी, मोहंमद इलियास,साजिद शाह,गुलाब भाई वायरमन, अरुण बागूल, अक्रम कुरेशी, शब्बीर कुरेशी, प्रतापसिंग  राठोड, मुअज्जम शेख,जिशान काझी,सलीम गोसावी,अफजल खान,अकबर भाई शेख, सुभाषराव गायकवाड, मोहन जाधव, संजय शेलार, रमेश शिरसाठ,अमोल शिरसाठ,आदी पत्रकार उपस्थित होते. फकीर मोहंमद शेख यांनी शेवटी आभार शेवटी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.


 
बेलापूर ः-(प्रतिनिधी )-बेलापूर गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची प्रक्रिया  सर्व कायदेशीर बाबींचे पालन करुन कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जाणार आहे.त्यामुळे यासंदर्भात कोणतीही शंका  बाळगण्याचे कारण नाही.अखेर निवडणुक बिनविरोध करायची की नाही हे अंतिमतः सर्वपक्षिय नेत्यांच्या व ग्रामस्थांच्याच भुमिकेवरच अवलंबून असेल असा खुलासा बेलापूर पञकार संघाकडून करण्यात आला आहे.

              यासंदर्भात बेलापूर पञकार संघाने प्रसिध्दिसाठी दिलेल्या पञकात म्हटले आहे की,. राजकीय कटुता टाळावी तसेच निवडणुकीवर होणारा अनावश्यक अफाट खर्च गावाच्या विकासाचे कारणी लागावा यासाठी निवडणूक बिनविरोधी व्हावी अशी बेलापुर पत्रकार संघाची अपेक्षा  आहे 

या बाबत अनेक ग्रामस्थांनी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशा भावना पत्रकार संघाकडे व्यक्त केल्या          ग्रामस्थांच्या या भावनांना प्रतिसाद म्हणून बेलापूर पञकार संघाने निवडाणूक बिनविरोध व्हावी यासाठी पुढाकार घेतला.यासाठी गावातील सर्वपक्षियांची बैठक बोलविण्यात आली.या बैठकीस सर्वपक्षिय  नेते,विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.या बैठकीत सर्वांशी चर्चा करुन सर्वसंमतीने प्रस्ताव ठरविण्यात आला.

          यानुसार ज्यांना उमेदवारी करावयाची आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरावेत.त्यानंतर ज्यांना बिनविरोध निवडणुकीसाठी नावे द्यायची आहेत त्यांनी आपली नावे  यासंदर्भात नियुक्त समितीकडे द्यावीत.बिनविरोध निवडणुकीसाठी पञकार संघाचे कोणीही सदस्य उमेदवारी करणार नाही त्यानंतर ग्रामस्थांची बैठक घेवून आलेल्या नावांतून वार्डनिहाय व प्रवर्गानुसार कायदेशीर प्रक्रिया पार पाडून  सतरा उमेदवार निश्चित केले जातील.बिनविरोध निवडणुक वा उमेदवारी करणे याबाबत कोणासही कोणतीही सक्ती नसून केवळ गावाच्या हितासाठी पञकार संघाने पुढाकार घेतला आहे..याउपर ज्यांना उमेदवारी करावयाचीच असेल तर मग रितसर निवडणूक होईल.अशावेळी काय भुमिका घ्यावयाची ते ग्रामस्थ व  पञकार संघ ठरवतील .असा बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव असून तो नीटपणे समजून घ्यावा.अखेर बिनविरोध निवडणूक  प्रस्तावाबाबत काय करायचे हे सर्वपक्षिय नेते व ग्रामस्थांनी ठरवायचे आहे असे बेलापुर पञकार संघाने स्पष्ट केले आहे.

जामखेड-जामखेड पोलिस ठाण्यात चोरीलूट प्रकरणी दि. 10 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील चोरीस गेलाला माल हा प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे याच्याकडे असल्याने त्याला उस्मानाबाद जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अहमदनगर एलसीबी पथकाने केली. याबाबत समजलेली माहिती अशी की, खर्डा ते जामखेड रस्त्याने दुचाकीवर येत असताना पाठीमागून येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा केला. या दरम्यान दुचाकीला चोरट्यांनी त्यांची दुचाकी आडवी लावली. फिर्यादी व पतीस यांना ढकलून देऊन चाकूचा धाक दाखवून गळ्यातील कानातील दागिने, मोबाइल व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी झुलेखा चंदुलाल पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात लूट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या दाखल गुन्ह्यातील

आरोपी प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे (रा. पिंपळगाव फाटा ता. वाशी जि. उस्मानाबाद) यांच्याकडे असल्याची माहिती पो. नि. अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार श्री कटके यांनी त्यांच्या पथकाला त्यांनी दिल्या. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन आरोपी प्रकाश शिंदे याचा शोध घेऊन त्याला मुद्दामालासह ताब्यात घेतले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनील कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकाॅ विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, रणजित जाधव, रोहिदास नवगिरे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, चापोना कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

गावाच्या सर्वांगीन विकासाची बांधीलकी असणाऱ्यांनाच निवडून द्या - देविदास देसाई

बेलापूर : - ( प्रतिनिधी ) गटातटाचे राजकारण व व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या मनोवृत्तीला कायमचा पायबंद घालून गावाचा विकास साधण्यासाठी या निवडणुकीत गावच्या विकासाची बांधीलकी असणाऱ्या व्यक्तिंचीच निवड करा असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार देविदास देसाई यांनी केले आहे. 

       प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की , बेलापूर ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली तशी नेते मंडळीची धावपळ सुरु झाली नेत्या बरोबरच कार्यकर्तेही पहाटे पासुनच कामाला लागले आहेत. कोण कुठे बसतो , कुणाकडे जातो , कोण कोणत्या गृपला मदत करणार , याची टेहळणी सुरु झालेली आहे. गुप्त बैठकांना ऊत आलाय. प्रत्येक जण गुडघ्याला बांशिग बांधुन तयार आहे. जुन्या पेक्षा नविनच लई जोरात आहेत ! निवडणूक सुरु झाली की बैठका पार्ट्यावर उधळपट्टी होणारच ! मग निवडणूकीत ओतलेला नव्हे गुतंवणूक केलेले भांडवल वसुलीसाठी वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जातील , त्या करीता मतदारांनो जागे व्हा ! आजची संधी पुन्हा पाच वर्षा नंतरच ! त्यामुळे गाव कारभारी निवडताना योग्य व्यक्तीची निवड करा , जो गावाची आजची दशा बदलुन गावाला योग्या दिशा देवू शकेल नाही तर काही लोक निवडून येतात , परंतु त्यांना गावासाठी वेळच नसतो ! साधे ग्रामसभेलाही त्या सदस्यांना उपस्थित राहण्यास वेळ नसतो ! 

     आपल्या वार्डातील सदस्याने आपल्या वार्डातील समस्या पोटतिडकीने सोडविल्या पाहीजे असा सदस्य निवडा.पाच वर्ष आपल्या अडचणी सुटेल असेच सदस्य निवडा सर्व नेते मंडळींना व गाव पुढार्यांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र बसुन गावाच्या विकासा करीता एक होवून ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी मनापासुन प्रयत्न  करा. असे आवाहनही पत्रकार देसाई यांनी केले आहे.


दोन  पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व  दोनआरोपी ताब्यात.

आज दि.  16/ 12/2020 रोजी मा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सो अहमदनगर यांना  बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग  येथे मालक  नामे प्रवीण बाळासाहेब पानसंबळ  हा   महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे    मा.श्री. मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा.  डॉक्टर दिपाली काळे  अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे Dy.s.pसंदिप मिटके   Dy.s.p  संजय सातव, श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर , श्री अभिनव त्यागी, स.पो.नि. समाधान पाटील व कर्मचारी यांचे पथक तयार करुन हॉटेल  यमुना लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी क्रं,1) प्रवीण बाळासाहेब पानसंबळ   रा निर्मळ पिंपरी ता राहता 2) अरबाज मोहमद शेख रा बाभलेश्र्वर यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द  लोणी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे भा. द. वि. कलम 370 सह  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Dy.s.p.संदिप मिटके,Dy.s.p  संजय सातव,आयुष नोपाणी, अभिनव त्यागी प्रशिक्षणार्थी आयपीएस API समाधान पाटील यांच्या पथकाची कारवाई.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर गावात एम आय एमची शाखा सुरु करण्यात आली असुन बेलापुर शहराध्यक्ष म्हणून मोहसीन ख्वाजा शेख यांची तर उपाध्यक्ष पदी निसार शाह यांची निवड करण्यात आली             एम आय एमचे तालुकाध्यक्ष शकील शेख श्रीरामपुर शहराध्यक्ष युनुस शेख  मोहसीन सय्यद जावेद शेख  आरपीआयचे शहराध्यक्ष रमेश आमोलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पत्रकार देविदास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  ही निवड करण्यात आली नुतन अध्यक्ष मोहसीन शेख यांनी या पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन दिले या वेळी मान्यवरांच्या हस्ते एम आय एम संघटनेच्या फलकाचेही अनावरण करण्यात आले  बेलापुर कार्यकारीणी सदस्य म्हणून जुबेर तांबोळी कलीम सय्यद मोईन शेख शब्बीर शाह अझरोद्दीन शेख आरिफ शेख मन्सुर शेख समीर शेख हाजी मोईन शेख आयाज सय्यद यांचा समावेश करण्यात आला या वेळी अमोल रुपटक्के किरण बोधक शाकीर शेख ख्वाजा भाई शाहरुख सय्यद तौफीक शेख टिनमेकरवाले आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक मन्सुर हाजी यांनी केले सूत्रसंचलन आयाज सय्यद यांनी केले तर मोहसीन ख्वाजा शेख यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget