Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- फ्रेंड्स फाँर एव्हर ग्रुप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानो के नाम हा उपक्रम राबविण्यात आला असुन आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज ऊर्फ आचार्य किशोरजी व्यास पत्रकार देविदास देसाई व बेलापुर पोलीसांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहीद जवान व कोरोना काळात शहीद झालेल्या कोरोना योद्ध्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली         फ्रेंड्स फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासुन पाडव्याच्या दिवशी एक पणती शहीद जवानो के नाम हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबविला जात आहे  या वर्षी महंत गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास पत्रकार देविदास देसाई बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके साईनाथ राशिनकर हरिष पानसंबळ रामेश्वर ढोकणे यांच्या हस्ते दिप पेटविण्यात आले या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे अजय डाकले पंडीत महेशजी व्यास खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळुंके  दिलीप दायमा उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक खंडागळे प्रफुल्ल काळे गोपाल जोशी मयुर साळुंके राजेश सुर्यवंशी योगेश जाधव सुभाष शेलार साईनाथ शिरसाठ शशिकांत तेलोरे महेश कुर्हे विष्णूकांत लखोटीया संदीप जाधव निशिकांत लखोटीया विजय कोठारी प्रभात कुर्हे प्रशांत मुंडलीक विकास खोसे सुरेश जाधव विशाल श्रीगोड विशाल वर्मा श्रीनिवास हिरवे गोरख कुमावत राम कुर्हे जयेंद्र खटोड रविंद्र कुर्हे वेणूगोपाल सोमाणी सुमीत सोमाणी महेश उंडे श्रीकांत भागवत रामेश्वर कोतकर आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

शिर्डी - राज्य सरकारने येत्या पाडव्याला, १६ नोव्हेंबर रोजी साईमंदीर उघडण्याचा निर्णय घेवुन जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. मंदीरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदीर व्यवस्थापनांची धावपळ होणार आहे.पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी केले. यावेळी डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे व मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी उपस्थीत होते.कोरोनामुळे १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता साईमंदीर बंद करण्यात आले होते. तब्बल २४२ दिवसांनी पाडव्याला साईमंदीर उघडणार आहे. सूरवातीला  सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन घेता येईल. हळुहळु ही संख्या वाढवण्यात येईल.६५ वर्षावरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ संस्थान रूग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोना बाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधुन किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येती विषयी फिडबॅक घेतला जाणार आहे.भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदीरात जावुन दर्शन घेता येईल मात्र चावडी आणि मारूती मंदीरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. समाधी दर्शनानंतर बॅरिगेटींग मधुन पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदीरात हार, प्रसाद आदी पुजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पुजा, ध्यानमंदीर, पारायण कक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीन मध्ये चहा-बिस्कीटे मिळणार नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होताच हळुहळु भाविकांना पुर्वी प्रमाणे दर्शन व अन्य सुविधा मिळतील. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे. भक्तनिवासात रोज एकाआड एक रूम देण्यात येणार आहे.  राज्य सरकारच्या निर्णयाचे साईनगरीत फटाके फोडून व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.

पुणे : वानवडीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार असलेल्या आरोपीकडून आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन  स्वारगेट पोलिसांनी ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे असा एकूण ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या आरोपींनी विकलेल्या दोन पिस्तुलांचा वापर वानवडी आणि वेल्हे येथील गोळीबाराच्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.बारक्या ऊर्फ प्रमोद श्रीकांत पारसे (वय १९, रा. आंबेगाव पठार), राजू अशोक जाधव (वय २०, रा. माणगाव, ता़ हवेली), बल्लुसिंग करतारसिंग शिकलीगर (वय ४९, रा.निमखेडी, जि़ बुलढाणा), लादेन ऊर्फ सोहेल मोदीन आसंगी (वय २४, रा. टेल्को कॉलनी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, उपायुक्त सागर पाटील यांनी माहिती दिली. वानवडी परिसरात काही दिवसांपूर्वी वाळु सप्लायरवर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला पिस्तुल पुरविणारा व सध्या फरार असलेल्या आरोपी बारक्या हा स्वारगेट येथील पीएमपी बसस्थानकावर मित्राची वाट पहात थांबला असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बारक्या याला पकडले. त्याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने राजू जाधव याला एकूण १३ गावठी पिस्तुल व काडतुसे विकण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार राजू जाधव याला पकडून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ काडतुसे जप्त करण्यात आली. प्रमोद व राजू यांनी त्याच्या ओळखीच्या लादेन याला ४ पिस्तुले विकल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी लादेन याला पकडून त्याच्याकडून ३ पिस्तुल व ८ काडतुसे जप्त केली. त्याने राजू जाधव याच्याबरोबर बुलढाणा येथे जाऊन बल्लुसिंग शिकलीगर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिकलीगर याला अटक केली़.लादेन याने त्यातील पिस्तुल संदीप धुमाळ याला विकल्याचे सांगितले़ धुमाळ याने वेल्ह्यामध्ये त्यामधून गोळीबार केला होता़ त्याला ग्रामीण पोलिसांनी पकडले असून पिस्तुल जप्त केले आहे़ राजू आणि बारक्या हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत़ राजू याचे नातेवाईक बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडा येथे राहणारे आहेत़ तेथे त्यांची शिकलीगर याच्याशी ओळख झाली होती़ त्यातून त्यांनी त्याच्याकडून पिस्तुले आणून येथे दुप्पट किमंतीला विकली होती़ ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरुण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश काटे, भूषण उंडे, बाबासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांनी केली़.

शहरातील गुन्हेगारांना धाक राहिल्या नसल्याने, यापूर्वी अनेक अवैध व्यवसाय शहरात राजरोसपणे सुरू होती, मात्र पोलीस उपविभागीय कार्यालयाचा पदभार डीवायएसपी संदीप मिटके ,तसेच शहर पोलीस ठाण्याचा पदभार प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घेतल्यानंतर, शहरात पोलीस कारवाई होतांना दिसू लागली आहे. ज्यात पंचशील लॉज येथील व्यवसाय, सिल्व्हर स्पून येथील अवैध दारू साठा, या पाठोपाठ रात्री ८: ३० वाजेच्या सुमारास शिवाजीरोड परिसरातील उच्चभृ वस्तीत, सुरू असलेल्या जुगार आड्डयावर पोलिसांचा छापा टाकत कारवाई केली,त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले जात आहे. सदरचा जुगार अड्डा यापूर्वी देखील सुरू असताना, पोलिसांशी असलेल्या हित संबंधामुळे याठिकाणी कारवाई होत नव्हती, परंतु शहराला लाभलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी , जुगार आड्डयावर छापा टाकल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था चांगल्या हातात असल्याचे बोलले जात आहे, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शहरातील जुगार आड्डयावर पोलिसांचा छापा टाकला, ज्यात ६ प्रतिष्ठित घरातील लोकांना जुगार खेळतांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून त्यांच्या कडून, २१ हजार ४९० रुपयांच्या रोख रक्कमेसह तसेच, मोबाईल गाड्या असा एकूण १ लाख ९६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय, सदरची कारवाई डीवायएसपी संदीप मिटके ,IPS पोलीस अधिकारी आयुष नोपाणी तसेच पोलीस कर्मचारी जोसेफ साळवी,गणेश ठोकळ, प्रशांत बारसे, अमोल गायकवाड, शरद आहिरे आदींनी यशस्वी केलीय, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये सिंधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्ट च्या वतीने श्री साई झुलेलाल भव्य दिव्य अशा मंदिराचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे, या कार्यक्रमाला शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच दक्षिण नगर चे खासदार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे, त्याचप्रमाणे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी व माजी राज्यमंत्री डॉक्टर

गुर्मुखदास जगवाणी त्याचप्रमाणे शिर्डीचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व सिंधी समाज बांधवांचे राज्यातील प्रतिष्ठित नेते व शिर्डीतील इतर पक्षांचेही सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या शिर्डी येथील श्री साई झुलेलाल  भव्य दिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे, येथिल  सिंधी समाज साई झुलेलाल ट्रस्ट यांच्या मार्फत हे श्री साई झुलेलाल मंदिर भव्य दिव्य शिर्डीत बनवण्यात येणार आहे व त्याचे भूमिपूजन गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे ,अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये श्री साई झुलेलाल मंदिर होत असल्यामुळे राज्यातील व इतर राज्यातील सिंधी बांधवांमध्ये मोठा आनंद आहे, कोरोनामुळे हा भूमिपूजनाचा कार्यक्रम कोरोनाच्या अटी व शर्ती ठेवून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, सिंधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे  संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी छत्तुमल ईश्वरदास केशवनी यांच्या प्रेरणेने हे श्री साई झुलेलाल मंदिराचे भूमिपूजन होत  असल्याची माहिती श्री सिधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम परसवानी, उपाध्यक्ष गोपीचंद फुंदवाणी, यांनी एका पत्रकाद्वारे दिली असून हा कार्यक्रम शिवाजीनगर शिर्डी येथे संपन्न होणार आहे, या कार्यक्रमासाठी श्री सिधीं समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे गोविंद गरुर, खूपचंद फतणानी, सुरेश केशवानी ,रमेश प्रेमानी ,ओम प्रकाश प्रेमानी गिरीश मेवानी, नरेश दादावानी, श्याम थावानी, वासुदेव रोहरा, विजय ग्वालानी, आदी सदस्य व पदाधिकारी हे या भूमिपूजन कार्यक्रमाच्या तयारीसाठी परिश्रम घेत आहेत, या भव्य दिव्य श्री साई झुलेलाल मंदिरामुळे शिर्डी शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे,

 

बेलापुर(वार्ताहर)कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण बांधील असुन आपल्या आसापास  अवैध धंदे सूरू असल्यास किंवा कुणाचे कोणत्याही प्रकारे दबाव आणुन  शोषण होत असल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीरामपूर शहराचे  प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी केले आहे.*

*बेलापुर येथील पोलीस चौकीत  स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी  नोपाणी यांनी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.*

*ते पुढे म्हणाले की,छोट्या छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोठमोठे गुन्हे घडतात त्यामुळे पोलिसात आलेल्या सर्व तक्रारी गांभीर्याने नोंदविण्यात याव्यात अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील मोठी गुन्हेगारी रोखता येईल. लोकांनी पोलिसांशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास बिनधास्पतणे आपणाशी भ्रमणध्वनी क्रमांक 8459864520 वर संपर्क साधावा त्याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल.वाळू मटका जुगार वा अन्य काही अवैध व्यवसाय सुरु असल्यास पोलीस स्टेशनशी अथवा माझ्याशी संपर्क करावा असेही नोपाणी यांनी स्पष्ट केले.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे यावेळी उपस्थित होते.*

यावेळी झालेल्या चर्चेत माजी सरपंच भरत साळुंके यांनी झेंडा चौकात ट्रॅफिक पोलीस नियुक्त करण्याची मागणी केली. तसेच अन्य काही मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत सर्वश्री.टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथा,पत्रकार देविदास देसाई, प्रा. ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ,बाजार समितीचे संचालक सुधीर नवले,अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे, अशोक गवते,अशोक पवार, अजय डाकले, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कु-हे ,पोलीस पाटील अशोक प्रधान, ,अकबर सय्यद आदींनी सहभाग नोंदविला.*

*यावेळी सर्वश्री व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रशांत लड्डा व शांतीलाल हिरण ,प्रसाद खरात ,पत्रकार दिलीप दायमा, सुहास शेलार,अशोक शेलार, किशोर कदम आदी उपस्थित होते.*

*बेलापुर पत्रकार संघ ,ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने यावेळी नोपाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस हवालदार अतुल लोटके, पो. नाईक. रामेश्वर ढोकणे,पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे, हरिश पानसंबळ, निखिल तमनर,साईनाथ राशीनकर आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली   उपविभागीय अधिकारी संदिप मिटके भापोसे आयुष नोपाणी  यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पंचशील सिल्वर स्पून  या हॉटेलवर छापा टाकून  विस हजार रुपयांची दारू जप्त केलेली आहे  त्याचप्रमाणे दोन आरोपी ताब्यात घेतले असून एक फरार असल्याची माहिती आयपीएस अधिकारी आयुष नोपानी  यांनी दिली आहे.  या कारवाईमुळे शहरात अवैधरित्या  धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे या दोन कारवाईमुळे श्रीरामपुर शहरातील नागरिकांकडून  पोलीस प्रशासनाचे मोठे कौतुक केले जात आहे, धडाकेबाज कारवाई करत विस हजाराची बेकायदेशीर दारु जप्त करुन दोन जणांना अटक केली आहे. 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget