बेलापुर (प्रतिनिधी )- फ्रेंड्स फाँर एव्हर ग्रुप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानो के नाम हा उपक्रम राबविण्यात आला असुन आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज ऊर्फ आचार्य किशोरजी व्यास पत्रकार देविदास देसाई व बेलापुर पोलीसांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहीद जवान व कोरोना काळात शहीद झालेल्या कोरोना योद्ध्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली फ्रेंड्स फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासुन पाडव्याच्या दिवशी एक पणती शहीद जवानो के नाम हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबविला जात आहे या वर्षी महंत गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास पत्रकार देविदास देसाई बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके साईनाथ राशिनकर हरिष पानसंबळ रामेश्वर ढोकणे यांच्या हस्ते दिप पेटविण्यात आले या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे अजय डाकले पंडीत महेशजी व्यास खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळुंके दिलीप दायमा उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक खंडागळे प्रफुल्ल काळे गोपाल जोशी मयुर साळुंके राजेश सुर्यवंशी योगेश जाधव सुभाष शेलार साईनाथ शिरसाठ शशिकांत तेलोरे महेश कुर्हे विष्णूकांत लखोटीया संदीप जाधव निशिकांत लखोटीया विजय कोठारी प्रभात कुर्हे प्रशांत मुंडलीक विकास खोसे सुरेश जाधव विशाल श्रीगोड विशाल वर्मा श्रीनिवास हिरवे गोरख कुमावत राम कुर्हे जयेंद्र खटोड रविंद्र कुर्हे वेणूगोपाल सोमाणी सुमीत सोमाणी महेश उंडे श्रीकांत भागवत रामेश्वर कोतकर आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment