Latest Post


श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील गोंधवणी रोडवरील दशमेश चौकामध्ये दररोज भरणारा रस्त्यावरील भाजीपाला बाजार हा मोठ्या अपघातास निमंत्रण ठरण्याची शक्यता असल्याने सदर बाजार दुसरीकडे हलविण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे . गेल्या काही दिवसापासून दशमेश चौकामध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व दुकानदारांनी आपली दुकाने थाटण्यात सुरुवात केली आहे . सुरुवातीला एक दोन असणारी दुकाने आता मोठ्या संख्येने वाढली असून चौकाच्या चार ही बाजूला सदर दुकानदार भररस्त्यावर बसतात .या संपूर्ण परिसरामध्ये भाजीमंडई नसल्याने व कोरोनामुळे नगरपालिकेने देखील येथे भाजी विकण्यास परवानगी दिली आहे . मात्र आता ही परवानगी जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे . राज्य मार्ग असलेला हा रस्ता वैजापूर, कोपरगाव, पुणतांबा,

खैरी निमगाव, गोंधवणी इत्यादी भागात जातो . त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतूक असते .या चौकातील चारही दिशांना  वाहनांची वर्दळ सतत सुरू असते . कॉलेज रोड, प्रांत व तहसील कार्यालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेत या चौकातून जावे लागते .पंजाबी कॉलनीतून येणारी वाहने तसेच काजी बाबा रोड वरून येणारी वाहने यांची देखील येथे सतत वर्दळ असते .भाजीपाला विकणारे दुकानदार रस्त्याच्या एकदम कडेला खूप पुढे येऊन बसतात . त्यामुळे चौकांमध्ये वळणाऱ्या गाड्यांसाठी सुद्धा मोठी अडचण निर्माण होत आहे . त्यातच भर म्हणून चौकामध्ये नगरपालिकेच्या बोरचे पाणी भरण्यासाठी सातत्याने पाण्याच्या गाड्या उभ्या असतात . त्यामुळे येथे पाण्यामुळे सतत रस्ता ओला असतो . या भागातील दुकानदार, बँकांचे एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांना भाजी बाजारातील लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील ही दुकाने वेळीच दखल न घेतल्यास मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकतात. तरी येथील भाजीबाजार हा मागच्या बाजूला खालच्या  काजी बाबा रोडवर हलविल्यास लोकांची सोय होईल आणि अपघाताचा धोका टळेल. तरी याबाबत नगरपालिकेने तातडीने दखल घेण्याची मागणी या परिसरातील दुकानदारांनी केली आहे .

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील सहायता एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे पुन्हा कोरोना जागरूकता अभियान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात मालेगाव येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे . शनिवार १७ व रविवार १८ ऑक्टोबर रोजी वार्ड नंबर २ मधील कुरेशी जमात खाना येथे तर सोमवार १९ व मंगळवार २० ऑक्टोबर रोजी बेलापूर येथे सदरचे शिबीर घेण्यात येणार आहे .तरी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेने या  आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती रिजवानुल हसन यांनी केले आहे . दररोज सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये सदरचे आरोग्य तपासणी शिबिर कुरेशी जमात खाना येथे आयोजित करण्यात आले आहे . या शिबिरामध्ये ताप,सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी आजारांबाबत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.गरजू रुग्णांना औषधे सुद्धा दिली जाणार आहेत.कोरोनाच्या काळामध्ये मालेगाव पॅटर्न कमालीचा यशस्वी झाला असून मालेगाव पॅटर्न मध्ये काम करणारे तज्ञ डॉक्टर्स हे आपल्या शहरात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुफ्ती रिजवानुल हसन व सहायता एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे .


श्रीरामपूरःभारतीय जनता पार्टी च्या वतीने राज्य भर पुकारलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून श्रीरामपूर भाजपाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर महिला आत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशशेठ राठी, जिल्हा उपाध्यक्ष सतीशभाऊ सैदागर,शहर अध्यक्ष मारूती भाऊ बिंगले श्रीरामपूर ,,भा ज पा जिल्हा अध्यक्ष (सांस्कृतिक सेल) बंडुकूमार शिंदे श्रीरामपूर ,,जिल्हा अध्यक्ष भा ज पा भटक्या जाती जमाती सेल विठठलराव राऊत, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशालभाऊ यादव, अक्षय वर्पे, आनंद बुधेकर, विशाल अंभोरे, ओमकार झिरेंगे,योगेश राऊत, बापूसाहेब पवार,धिरज बिंगले  भा ज पा अ.नगर सदस्य अनिताताई शर्मा ,अर्पणाताई अक्षय वर्पे , अंजली शिंदे, चंद्रकला मिसाळ,मीनाताई बिंगले संगीता रणनवरे, सपना शिंदे मेहबूब भाभी, ज्योतीताई बत्तीशे,अनुसया गजानन बत्तीशे   आदि उपस्थित होत्या.याप्रसंगी मारूती भाऊ बिंगले यांनी मनोगत व्यक्त केले व महिलांवरील अत्याचाक्षरांच्या संख्येत झालेल्या वाढिचे गांभिर्य पटवून दिले तसेच गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली व निषेध व्यक्त केला.प्रशासनाच्यावतीने तहसीलदार साहेब यांनी निवेदन स्विकारले.


बुलडाणा - 11 ऑक्टोबरबु

लडाणा येथून जवळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगांव रेंज मध्ये कार्यरत एका 54 वर्षीय वनमजूराने विष प्राशन केले होते व उपचारा दरम्यान रात्री त्यांचा मृत्यु झाल्याने वन्यजीव विभागात एकच खळबळ उडाली आहे.

      अरुण सरकटे रा.कोथळी ता.मोताळा असे मृतक वनमजूराचे नाव असून त्यांनी 4 ऑक्टोबरला कार्यालयीन त्रासाला कंटाळून जंगलाताच विष प्राशन केल्याची दबक्या आवाजात वन्यजीव विभागात जोरदार चर्चा सुरु आहे. बुलडाणा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा साठी अरुण सरकटे यांना ॲडमिट करण्यात आले जिथे उपचार सुरु असताना 10 ऑक्टोंबरच्या रात्री त्यांचा मृत्यु झाला आहे.त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृतकाला वन्यजीव विभागाच्या काही लोकांकडून त्रास दिलय जात असल्याची चर्चा आज दिवसभर नातेवाईक व गांवकऱ्यात सुरु होती.या बाबत बुलडाणा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

    या बाबत वन्यजीव विभाग खामगांव रेंजचे आरएफओ विकास धंदर यांच्याशी संपर्क साधुन घटने बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की,या घटनेबाबत पत्रा द्वारे वरिष्ठाना कळविले असून मी इथे अशातच जॉइंट झालो,या मागे घरगुती कारण आहे व जे कोणी दोषी असेल त्याला सोडणार नसल्याचे ही धंदर म्हणाले.


🔹कांग्रेस अल्पसंख्यांक विभागाची बैठक संपन्नबु

लडाणा - 11 ऑक्टोबर

सर्वसमाजाला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाने आपली धर्मनिरपेक्षता कायम ठेवली असून बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मजबूत करणार,असा विश्वास अल्पसंख्यक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जावेद कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.ते जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची 11 ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथील बचत भवन मध्ये दुपारी 12 वाजता आयोजित बैठकीला संबोधित करीत होते. या बैठकीला जिल्हाभरातून अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       बकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी रशीदखान जमादार होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये हाजी मुजम्मिल खान, बाबू जमादार, मोईन काजी, जाकीर कुरेशी ,इरफान पठाण, जमीर भाई, डॉक्टर सलीम, फिरोज खान, डॉ अनीस खान,अजगर  टेलर, असलम शेख , रियाज ठेकेदार, इम्रान खान, वाजीद पत्रकार ,जाकीर मेमन ,युसुफ खान,मनोहरराव पाटील, फिरोज खान ,जावेद शेख,अमीन टेलर,महेबुब भाई ,रऊफ सेठ ,जलील पहेलवान शकील कुरेशी, सादीक शेख उपस्थित होते.

       बैठकीत नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष अ‍ॅड.जावेद कुरेशी यांनी अल्पसंख्यक संघटन जिल्हाभरात मजबुत करण्यासाठी तालुका ,शहर स्थरावर निरीक्षक लवकरच जाहीर करण्यात येईल या सोबतच प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजना त्वरीत वाटप व्हावी या करीता जिल्ह्यायतील प्रत्येक तालुका स्थरावर अल्पसंख्यक विभागाकडुन निवेदन देण्यात यावे असे सूचित केले . अध्यक्षीय भाषणात हाजी रशीदखान जमादार यांनी अल्पसंख्याक समाजातील नवयुवकांनी काँग्रेस पक्षाची जुळुन आमचे नेते मुकुल वासनिक यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.राज शेख यांनी तर आभारप्रदर्षन तारीक नदीम यांनी केले.


श्रीरामपूर - ग्रामिण भागातील समस्थ ग्रामस्थांच्या समस्यांना समजून घेणे तथा त्यांच्या आडीआडचणींना शासन दरबारी पाठपूरावा करण्याकामी योग्य मार्गदर्शन करणे यासोबतच निरपेक्षतेने आपली शासकीय सेवा करणे आणि शासनाच्या सेवेला केवळ शासकीय सेवाच न समजता भक्ती म्हणून त्यात स्वतःस वाहून घेणे असे असे परोपकारी व्यक्तीमत्व असलेले तालूक्यातील सरला गोवर्धनपूर येथील आदर्श ग्रामसेवक श्री.रुबाब पटेल यांची श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याने जि.प.कर्मचार्यांबरोबर त्यांच्या मित्र परीवारांकडून देखील त्यांचयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,

 आज शुक्रवार दिनांक 08/10/2020रोजी पंचायत समिती श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.श्री.एकनाथराव ढाकणे यांचे हस्ते व अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनीलजी नांगरे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.त्यात सरला, गोवर्धनपूर ता.श्रीरामपूर येथील ग्रामसेवक श्री.रुबाब पटेल यांची श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली,

या निवडीबद्दल ग्रामसेवक रुबाब पटेल यांचा ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.एकनाथराव ढाकणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला तथा त्यांनी श्री.पटेल यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छाही दिल्या.


बुलडाणा - 9 ऑक्टोबर

बारावीनंतर सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 9 ऑक्टोबरच्या सकाळी 5 वाजेच्या सुमारास बुलडाणा शहरातील रामनगर भागात घडली आहे. या विद्यार्थ्याच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाला असून त्यात " थँक यु,,,,तुम्ही मला खुप छान मोठं केलं,, आता मला जगायचं नाही" अस लिहलेला होता.

     याबाबत बुलडाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा शहरातील रामनगर,पाळणाघर जवळ राहणारे विलास धायडे यांच्या घरी त्यांची बहिण व भाचा अनिकेत संतोष बोरकर (18 वर्ष) राहतात. अनिकेत 12 वी पास झाला व तो सेट परीक्षेची तयारी करत होता. 9 ऑक्टोबरच्या सकाळी 4 वाजेच्या सुमारास अनिकेत अभ्यासासाठी उठला व वरच्या रूम मध्ये गेला बराच वेळ उलटल्यानंतरही अनिकेत खाली आला नाही म्हणून त्याची आई पाहायला गेली असता आतून कडी लावलेली होती. आवाज दिल्यावर कोणताच प्रतिसाद येत नसल्याने घरातील इतरही लोक आले व आत पाहिलं तर अनिकेत गळफास घेऊन लटकलेला दिसला. याची माहिती शहर पोलिसाला देण्यात आली असता पीएसआय विनायक रामोड,इरफान पठाण व चालक गणेशे घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून झडती घेतली असता अनिकेतच्या खिशात सुसाईड नोट मिळून आली आहे. याप्रकरणी शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. अनिकेतने आत्महत्या का केली याचा तपास  पोलिस करीत आहे. अनिकेत हा एकुलता एक मुलगा होता त्याने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे घरातील कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget