🔹कांग्रेस अल्पसंख्यांक विभागाची बैठक संपन्नबु
लडाणा - 11 ऑक्टोबर
सर्वसमाजाला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाने आपली धर्मनिरपेक्षता कायम ठेवली असून बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मजबूत करणार,असा विश्वास अल्पसंख्यक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.जावेद कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.ते जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची 11 ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथील बचत भवन मध्ये दुपारी 12 वाजता आयोजित बैठकीला संबोधित करीत होते. या बैठकीला जिल्हाभरातून अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी रशीदखान जमादार होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये हाजी मुजम्मिल खान, बाबू जमादार, मोईन काजी, जाकीर कुरेशी ,इरफान पठाण, जमीर भाई, डॉक्टर सलीम, फिरोज खान, डॉ अनीस खान,अजगर टेलर, असलम शेख , रियाज ठेकेदार, इम्रान खान, वाजीद पत्रकार ,जाकीर मेमन ,युसुफ खान,मनोहरराव पाटील, फिरोज खान ,जावेद शेख,अमीन टेलर,महेबुब भाई ,रऊफ सेठ ,जलील पहेलवान शकील कुरेशी, सादीक शेख उपस्थित होते.
बैठकीत नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष अॅड.जावेद कुरेशी यांनी अल्पसंख्यक संघटन जिल्हाभरात मजबुत करण्यासाठी तालुका ,शहर स्थरावर निरीक्षक लवकरच जाहीर करण्यात येईल या सोबतच प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजना त्वरीत वाटप व्हावी या करीता जिल्ह्यायतील प्रत्येक तालुका स्थरावर अल्पसंख्यक विभागाकडुन निवेदन देण्यात यावे असे सूचित केले . अध्यक्षीय भाषणात हाजी रशीदखान जमादार यांनी अल्पसंख्याक समाजातील नवयुवकांनी काँग्रेस पक्षाची जुळुन आमचे नेते मुकुल वासनिक यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.राज शेख यांनी तर आभारप्रदर्षन तारीक नदीम यांनी केले.
Post a Comment