डोंगरखंडाळा शिवारात पोलिसांनी उद्ध्वस्त केली दारूची अवैध हात भट्टी
याबाबत अधिक माहिती अशी की बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम डोंगरखंडाळा लगतच्या जंगलात अवैधरीत्या दारूच्या हातभट्ट्या उभारुन गावखेड्यात दारू विक्री केली जात आहे.मागील 28 सप्टेंबर रोजी ज्ञानगंगा अभयारण्य लगतच्या जंगलात जाऊन 3 ठिकाणच्या दारू भट्ट्या ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केले होते.आज 4 ऑक्टोबरला सुद्धा बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआई सुनील दौड,एएसआई बनसोडे, बीटजमादार जनार्दन इंगळे व दीपक डोळे यांनी डोंगरखंडाळा जवळ असलेल्या जंगलात धाड टाकून अवैद्य दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून त्याच्या साहित्याची तोडफोड केली आहे. याप्रकरणी आरोपी गणेश उत्तमराव पवार यांच्याविरोधात बुलढाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या कडून 3 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त कण्यात आला आहे.