घरगुती वादातून डोंगरखंडाळा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या.
बुलडाणा - 16 ऑगस्ट
तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे एका 27 वर्षीय युवकाने घरासमोरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री समोर आली आहे.
बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम डोंगरखंडाळा येथील राहणारे 27 वर्षीय संदीप गोविंदा पवार यांनी काल 15 ऑगस्टच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील शेवग्याचा झाडावर दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी संदीपला फासावर लटकलेला अवस्थेतून खाली काढले व तात्काळ वरवंड येथील प्रा.आरोग्य केंद्रात नेले तेव्हां तो श्वास घेत होता मात्र अधिक उपचारची गरज होती म्हणून बुलडाण्यात जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. याबाबत बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. घरगुती वादातून संदीपने ही टोकाची भुमिका घेतल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रमेश बंसोड व जनार्धन इंगळे करीत आहे.