Latest Post

श्रीरामपूर |प्रतिनिधी| श्रीरामपुरात काल 44 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यात शहरातील 14 जण करोना बाधित आढळून आले आहेत. यात पालिकेचा एक अभियंता करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 473 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. काल केवळ 4 जण बरे होऊन घरी परतले आहेत.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये 44 जणांची तपासणी करण्यात आली. यात 14 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह तर 30 जण निगेटिव्ह आले आहेत.ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. वसंतराव जमधाडे प्रमुख असलेल्या संतलुक हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये 43 रुग्ण उपचार घेत आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 32 जण उपचार घेत आहेत.काल पॉझिटीव्ह आलेल्या 14 जणांमध्ये वॉर्ड नं. एकमध्ये 2, वॉर्ड नं. दोनमध्ये 1, वॉर्ड नं. तीनमध्ये 1, वॉर्ड नं. सातमध्ये 3, नरसाळी 1, गजानन वसाहत 2, म्हाडा 3, सुतगिरणी 1 रुग्णांचा समावेश आहे.श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 2303 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 453 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 1117 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. आजपर्यत 11 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.श्रीरामपूर नगरपरिषदेत करोनाने शिरकाव केल्यामुळे पालिकेत घबराहट निर्माण झाली आहे. पालिकेत या संसर्गाचा प्रसार होवू नये म्हणून स्वच्छता, पाणीपुरवठा, रुग्णालय या अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेचा सर्व कारभार पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.

बुलडाणा - 11 ऑगस्ट
तालुक्यातील पिंपळगाव सराई जवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे.सैलानी बाबा देशभरातील लाखो सर्वधर्मिय भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक लोक येथे उपचारासाठी येवून भाडयाने खोली करुण राहतात.सोमवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने सांडू खां जिन्नत खां यांच्या खोलीत राहणारे आई लेकी वर बाजुची भींत कोसळल्याने मलब्या खाली दबुन या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मृतक आईचे नाव सुगंदाबाई काजळे वय 55 वर्ष व त्यांची मुलगी कु ललिता काजळे वय 18 वर्ष दोघे रा बुटी खांडवा,ता खालवा जि खंडवा,मध्यप्रदेश येथील रहिवासी होते. मागील काही दिवसापासून ते उपचारासाठी शैलानी येथे आलेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना मिळाल्या नंतर सैलानी बीट जमादार यशवंत तायडे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवले आहे. या प्रकरणी रायपुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )- शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धान्य दुकानदारांना स्वतःचा अंगठा प्रमाणित करुनच  ग्राहकांना धान्य देण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष देविदास देसाई  यांनी केली आहे     जिल्हा संघटनेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात देसाई  यांनी  म्हटले आहे की सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे  माहे जुलै पर्यंत शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना स्वतःचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याची मुभा दिली होती त्या वेळी कोरोनाचे रुग्ण काही ठराविक भागातच सापडत होते परंतु सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ही साखळी तोडणे गरजेचे आहे आता  शहरी भागा बरोबरच ग्रामिण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढलेले आहे असे असताना शासनाने माहे आँगस्ट पासुन कार्डधारकांचा अंगठा प्रमाणित करुन धान्य  देण्याचा आदेश दिलेला आहे परंतु सध्या   कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता  कार्डधारकांचे अंगठे घेण्याची दुकानदारांना जास्त भिती वाटत आहे धान्य घेण्याकरीता दररोज शेकडो ग्राहक दुकानात येत असतात कार्डधारकाचा अंगठा हातात धरुनच तो पाँज मशीनवर ठेवावा लागतो त्यामुळे एखादा बाधीत रुग्ण आला तर दुकानदार बाधीत होईलच परंतु त्या नंतर येणारा प्रत्येक व्यक्ती बाधीत होवु शकतो हा धोका लक्षात  घेवून शासनाने  पाँज मशीनवर धान्य देताना  दुकानदारांचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याची परवानगी  देण्यात यावी अहमदनगर शहरा बरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत अनेक भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत झालेले आहेत अशा परिसरात दुकान चालू ठेवणे म्हणजे दुकानदारांच्या व सर्व कार्डधारकांच्या जिवाशी खेळण्या सारखे आहे त्यामुळे शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करुन धान्य दुकानदारांचे अंगठे प्रमाणीत करुन धान्य देण्यास परवानगी द्यावी अशीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे

मेहकर - 8 अगस्त (विषु दलवी)
बुलढाणा जिले के मेहकर शहर में आज 8 अगस्त को कोरोना के 6 पॉज़िटिव मरीज़ मिले है जिसमें मेहकर पुलीस स्टेशन के थानेदार व 3 कर्मियों का समावेश है. जिसके बाद पुलिस स्टेशन को सिनिटीइज़ कर यहां आने जाने पर प्रतिबंध लगा दिया गया है. मेहकर पुलीस स्टेशन का कामकाज अब जानेफल पुलीस स्टेशन से किया जाएगाह.शहर के शिवाजी नगर के एक डॉक्टर भी कोरोना पॉज़िटिव पाये जाने से उस परिसर को सील कर दिया है. साथ ही एक 70 साल की वृद्ध महिला को भी कोरोना का संक्रमण हुआ है.
    मेहकर तहसील क्षेत्र में गत सप्ताह से कोरोना संक्रमण बढ़ता जा रहा है,कल मेहकर में नगर निगम के पास एक ही परिवार के 5 लोग पॉज़िटिव पाये जिसके तुरंत बाद ही उस घऱ के परीसर को प्रतिबंधित कर दिया गया था.शहर की एक संक्रमित महिला प्रोफेसर की मौत से मेहकर में लोगों में अब डर का माहोल बना हुआ है.

बुलडाणा - 8 ऑगस्ट
येथून जवळ असलेल्या देऊळघाट येथील एका विवाहीतेला पतीने मोबाईलवर धमकी देवून गैर कायदेशीर 3 वेळा तलाक दिला असून पती सह 4 लोकां विरोधात बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         पोलीसाने दिलेली माहिती अशी की देऊळघाट येथील एका 22 वर्षाय महिलेचा औरंगाबाद येथील सै.साबीर सै. बशीर यांच्या सोबत 5 मार्च 2017 रोजी मुस्लीम धर्मानुसार औरंगाबाद येथे इस्तेमामध्ये विवाह झाला होता. त्यांना 2 वर्षाचा एक मुलगा आहे.परंतू लग्न झाल्यापासून पिडीत विवाहीतेला सासरची मंडळी त्रास देत होते, त्यामूळे 8 महीन्यापूर्वी पीडित माहेरी देऊळघाट राहायला आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या काळात पती किंवा सासरचे कुणी त्याला घ्यायला आले नाहीत. दरम्यान पतीने मोबाईलवर धमक्या देवून 3 वेळी तलाक दिलय,असेही तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीवरुन 8 ऑगस्ट रोजी आरोपी पती सै. साबीर सै. बशीर, सह सुल्ताना बी सै. बशीर,सै. बशीर सै. हीराजी व आयशा बी सै. बशीर सर्व रा.संजय नगर, बायजी पूरा,औरंगाबाद यांच्या विरुद्ध मुस्लिम महिला (विवाह हककांचे संरक्षण) वटहुकुम 2018 ची कलम 4 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार सुभाष चोपडे करीत आहे.

🔸मृतदेह जवळ काही जाळल्याचे खुना
🔹घातपाताची शक्यता
बुलडाणा - 8 ऑगस्ट - तालुक्यातील ग्राम चिखला जवळ घाटातील झुडपात 7 ऑगस्टला कुजलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून घातपाताची शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे.
       पोलिस सुत्रानुसार, बुलडाणा ग्रामीण ठाणे हद्दीत असलेल्या चिखला या गावातील समाधान वाघ यांनी मोबाईलवरून 7 ऑगस्टला पोलिस पाटील विवेकानंद सुभाष वाघा यांना माहिती दिली की रंजनाबाई सुधाकर वाघ यांच्या चिखला गावा जवळ बुलडाणा-धाड मार्गावरील घाटात गट नं.118 मधील पडीत जागेत सागाच्या झुडपात अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत पडून आहे. दरम्यान बुलडाणा ग्रामीण पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला व पंचनामा करण्यात आला.अंदाजे 40 ते 45 वर्षीय इसम 4-5 दिवस अगोदर मृत पावल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.रिंढे मॅडम यांनी घटनास्थळीच पोस्टमार्टम केले आहे.यावेळी ठाणेदार सारंग नवलकर, बिट जमादार राज़ीक शेख,गंगेश्वर पिंपळे,संदीप मिसाळ,पीएसआई सुनील दौड,नीलेश राऊत यांचेसह  बुलडाणा एलसीबीचे एपीआय मोरे,फोरेंसिक यूनिट,डॉग यूनिटने घटनास्थळाची पाहणी केली असून काही ठोस पुरावे सद्या मिळाले नसून मात्र त्या ठिकाणी काही तरी जाळल्याचे खुना दिसून आले आहे.या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद बुलडाणा ग्रामीण ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

बुलडाणा - 7 ऑगस्ट
बुलडाणा शहरात डमरू या नावाने ओळखल्या जाणारा रविंद्र देवीप्रसाद जयसवाल याला अवैध दारू प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शेवटी अटक केली असून 2 दिवसाचा पीसीआर संपल्या नंतर त्याला जळगाव खांदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक करून नेले आहे.बुलडाण्यात डमरू नावाने प्रसिद्ध हा आरोपी अवैध व बनावट दारुच्या दुनियेत  "बुलडॉग" या नावाने जळगाव,धुळे, औरंगाबाद सह गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे.
       या बाबत बुलडाणा शहर  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुलडाणा एलसीबीला गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिनांक 2 फेब्रुवारी रोजी बुलडाणा शहरातील स्टेट बँक चौकात एका पिकप वाहनाला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यात टॅंगो दारूचे 47 बॉक्स अवैधरीत्या वाहतूक करताना मिळून आले होते. याप्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात एलसीबीचे पीएसआई पांडुरंग इंगळे यांच्या तक्रारीवरून आरोपी दयाराम अभिमान शिरसाट वय 36 व सोमनाथ उर्फ नाना कोळी 23 दोघे राहणार खामखेडा ता. शिरपूर जि. धुळे ,यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाण्याचे पीएसआई अमित जाधव हे करीत असताना त्यांना चौकशीत असे निष्पन्न झाले की सदर दारू बुलडाणा येथील "बुलडॉग" नावाच्या एका व्यक्तीची होती. त्या अनुषंगाने त्या "बुलडॉग" चा मोबाईल नंबर काढून शोध घेतला असता तो व्यक्ती बुलडाणा येथील संगम चौकात राहणारा रवींद्र जयस्वाल उर्फ डमरू उर्फ बुलडॉग आहे असे निष्पन्न झाले.शेवटी 5 ऑगस्ट रोजी बुलडाणा शहर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 7 ऑगस्ट पर्यंत त्याची पोलिस कस्टडी मध्ये रवानगी करण्यात आली होती. आज कस्टडी संपल्याने त्याला कोर्टात हजर केले तेव्हा न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र आरोपी बुलडॉग विरुद्ध जळगाव खान्देश मध्ये सुद्धा गुन्हा दाखल असल्याने त्याला अटक करण्यासाठी जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एक पथक बुलडाणा येथे दाखल झालेला असून आरोपी बुलडॉग ला अटक करुण सोबत जळगाव घेऊन गेल्याची माहिती बुलडाणा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक शेवाळे यांनी दिली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget