बुलडाणा - 11 ऑगस्ट
तालुक्यातील पिंपळगाव सराई जवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे.सैलानी बाबा देशभरातील लाखो सर्वधर्मिय भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक लोक येथे उपचारासाठी येवून भाडयाने खोली करुण राहतात.सोमवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने सांडू खां जिन्नत खां यांच्या खोलीत राहणारे आई लेकी वर बाजुची भींत कोसळल्याने मलब्या खाली दबुन या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मृतक आईचे नाव सुगंदाबाई काजळे वय 55 वर्ष व त्यांची मुलगी कु ललिता काजळे वय 18 वर्ष दोघे रा बुटी खांडवा,ता खालवा जि खंडवा,मध्यप्रदेश येथील रहिवासी होते. मागील काही दिवसापासून ते उपचारासाठी शैलानी येथे आलेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना मिळाल्या नंतर सैलानी बीट जमादार यशवंत तायडे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवले आहे. या प्रकरणी रायपुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
Post a Comment