बुलडाणा - 7 ऑगस्ट
बुलडाणा शहरात डमरू या नावाने ओळखल्या जाणारा रविंद्र देवीप्रसाद जयसवाल याला अवैध दारू प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शेवटी अटक केली असून 2 दिवसाचा पीसीआर संपल्या नंतर त्याला जळगाव खांदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक करून नेले आहे.बुलडाण्यात डमरू नावाने प्रसिद्ध हा आरोपी अवैध व बनावट दारुच्या दुनियेत "बुलडॉग" या नावाने जळगाव,धुळे, औरंगाबाद सह गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे.
या बाबत बुलडाणा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुलडाणा एलसीबीला गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिनांक 2 फेब्रुवारी रोजी बुलडाणा शहरातील स्टेट बँक चौकात एका पिकप वाहनाला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यात टॅंगो दारूचे 47 बॉक्स अवैधरीत्या वाहतूक करताना मिळून आले होते. याप्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात एलसीबीचे पीएसआई पांडुरंग इंगळे यांच्या तक्रारीवरून आरोपी दयाराम अभिमान शिरसाट वय 36 व सोमनाथ उर्फ नाना कोळी 23 दोघे राहणार खामखेडा ता. शिरपूर जि. धुळे ,यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाण्याचे पीएसआई अमित जाधव हे करीत असताना त्यांना चौकशीत असे निष्पन्न झाले की सदर दारू बुलडाणा येथील "बुलडॉग" नावाच्या एका व्यक्तीची होती. त्या अनुषंगाने त्या "बुलडॉग" चा मोबाईल नंबर काढून शोध घेतला असता तो व्यक्ती बुलडाणा येथील संगम चौकात राहणारा रवींद्र जयस्वाल उर्फ डमरू उर्फ बुलडॉग आहे असे निष्पन्न झाले.शेवटी 5 ऑगस्ट रोजी बुलडाणा शहर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 7 ऑगस्ट पर्यंत त्याची पोलिस कस्टडी मध्ये रवानगी करण्यात आली होती. आज कस्टडी संपल्याने त्याला कोर्टात हजर केले तेव्हा न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र आरोपी बुलडॉग विरुद्ध जळगाव खान्देश मध्ये सुद्धा गुन्हा दाखल असल्याने त्याला अटक करण्यासाठी जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एक पथक बुलडाणा येथे दाखल झालेला असून आरोपी बुलडॉग ला अटक करुण सोबत जळगाव घेऊन गेल्याची माहिती बुलडाणा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक शेवाळे यांनी दिली आहे.
Post a Comment