कोपरगाव|तालुका (प्रतिनिधी) -कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरूवारी सलग अकराव्या दिवशी करोनाचा विस्फोट पहावयास मिळाला. कोपरगाव शहर व तालुक्यात बुधवारी सापडलेल्या 30 रुग्णांच्या संपर्कातील 258 व्यक्तीची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यात 61 रुग्ण करोना बाधित आढळले तर खासगी लॅब मधील 82 वर्षीय पुरुष तसेच 10 महिन्यांचे बाळ व सकाळी सापडलेले 2 रुग्ण असे 65 व्यक्ती करोना बाधित आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.कोपरगाव शहरात प्रामुख्याने करोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. आता मात्र शहरासह तालुक्यातील छोट्या-छोट्या खेडे गावांसह वाड्या वस्त्यांवर करोनाची लागण होण्यास सुरुवात झाली असून मंजूर, पढेगाव, करंजी, सुरेगाव पाठोपाठ आता येसगाव व कोळपेवाडी, मळेगाव थडी, सोनारी, डाऊच खुर्द, अंचलगाव, आपेगाव, कारवाडी, देवगाव, सांगवीभुसार, चांदेकसारे, शिरसगाव, पोहेगावातही मोठ्या प्रमाणावर करोनाचे विषाणू पोहचले आहेत.आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये कोपरगाव शहर व उपनगरे मिळून एक स्त्री आणि 10 पुरुष रुग्ण आढळले आहेत. संजीवनी कारखाना परिसरात 7 स्रिया तर 11 पुरुष आढळले आहेत.शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत 4 स्रिया आणि 2 पुरुष आढळले आहेत.पोहेगाव येथे 2 स्त्रिया, सांगवी भुसार दोन पुरुष, ब्राम्हणगाव येथे दोन स्रिया आणि एक पुरुष, चांदेकसारे 1 पुरुष, येसगाव 2 पुरुष, शिरसगाव 1 पुरुष बाधित आढळला आहे. तर टाकळी आणि डाऊच बुद्रुक येथे प्रत्येकी दोन पुरुष आढळले आहेत. कोळगाव थडी, निमगाव, रवंदे, मंजूर, सोनारी, अंचलगाव, देर्डे कोर्हाळे, देर्डे चांदवड, आपेगाव, कोकमठाण, कारवाडी, देवगाव येथे प्रत्येकी एक पुरुष बाधित आढळला आहे.कोपरगाव तालुक्यात आज 6 ऑगस्ट पर्यंत एकूण 277 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 189 रुग्ण उपचार घेत आहेत तर आजपर्यंत एकूण 1 हजार 879 लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
Post a Comment