श्रीरामपूर :-(प्रतिनिधी )-तालुक्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असुन नागरीका बरोबरच प्राशासनही सुस्त पडल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतआहे तालुक्यात आज करण्यात आलेल्या १०९ रॅपीड टेस्टमध्ये २८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह तर ८१ जण निगेटीव्ह आले यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ३५९ वर जावून पोहोचली आहे.तर श्रीरामपूर तुरुंगातील १७ कैद्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे
श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे श्रीरामपूर तुरुंगात विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या १७ कैद्याना कोरोनाची बाधा झाली असुन या कैद्यांना चोख बंदोबस्तात तातडीने नगर येथील पाठविण्यात आले आहे
संतलूक हॉस्पिटलमध्ये एकुण ४८कोरोना बाधीतावर उपचार सुरु आहेत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात वार्ड नं ६ (२), वार्ड नं ३ (१), खंडाळा (२), नेवासा रोड (२), पढेगाव (१), सबजेल (१७) बेलापूर (३) रुग्णांचा समावेश आहे.
श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत १९९० जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३५९ वर जावून पोहोचली आहे. तर ९१६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.
Post a Comment