Latest Post

कोपरगाव|तालुका (प्रतिनिधी) -कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरूवारी सलग अकराव्या दिवशी करोनाचा विस्फोट पहावयास मिळाला. कोपरगाव शहर व तालुक्यात बुधवारी सापडलेल्या 30 रुग्णांच्या संपर्कातील 258 व्यक्तीची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यात 61 रुग्ण करोना बाधित आढळले तर खासगी लॅब मधील 82 वर्षीय पुरुष तसेच 10 महिन्यांचे बाळ व सकाळी सापडलेले 2 रुग्ण असे 65 व्यक्ती करोना बाधित आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.कोपरगाव शहरात प्रामुख्याने करोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. आता मात्र शहरासह तालुक्यातील छोट्या-छोट्या खेडे गावांसह वाड्या वस्त्यांवर करोनाची लागण होण्यास सुरुवात झाली असून मंजूर, पढेगाव, करंजी, सुरेगाव पाठोपाठ आता येसगाव व कोळपेवाडी, मळेगाव थडी, सोनारी, डाऊच खुर्द, अंचलगाव, आपेगाव, कारवाडी, देवगाव, सांगवीभुसार, चांदेकसारे, शिरसगाव, पोहेगावातही मोठ्या प्रमाणावर करोनाचे विषाणू पोहचले आहेत.आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये कोपरगाव शहर व उपनगरे मिळून एक स्त्री आणि 10 पुरुष रुग्ण आढळले आहेत. संजीवनी कारखाना परिसरात 7 स्रिया तर 11 पुरुष आढळले आहेत.शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत 4 स्रिया आणि 2 पुरुष आढळले आहेत.पोहेगाव येथे 2 स्त्रिया, सांगवी भुसार दोन पुरुष, ब्राम्हणगाव येथे दोन स्रिया आणि एक पुरुष, चांदेकसारे 1 पुरुष, येसगाव 2 पुरुष, शिरसगाव 1 पुरुष बाधित आढळला आहे. तर टाकळी आणि डाऊच बुद्रुक येथे प्रत्येकी दोन पुरुष आढळले आहेत. कोळगाव थडी, निमगाव, रवंदे, मंजूर, सोनारी, अंचलगाव, देर्डे कोर्‍हाळे, देर्डे चांदवड, आपेगाव, कोकमठाण, कारवाडी, देवगाव येथे प्रत्येकी एक पुरुष बाधित आढळला आहे.कोपरगाव तालुक्यात आज 6 ऑगस्ट पर्यंत एकूण 277 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 189 रुग्ण उपचार घेत आहेत तर आजपर्यंत एकूण 1 हजार 879 लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी  )-तालुक्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असुन नागरीका बरोबरच प्राशासनही सुस्त पडल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतआहे तालुक्यात   आज करण्यात आलेल्या १०९ रॅपीड टेस्टमध्ये  २८ जणांचे कोरोना  अहवाल पॉझिटीव्ह तर ८१ जण निगेटीव्ह आले यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ३५९ वर जावून पोहोचली आहे.तर श्रीरामपूर तुरुंगातील १७ कैद्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे 
श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे श्रीरामपूर तुरुंगात विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या १७ कैद्याना कोरोनाची बाधा झाली असुन या कैद्यांना चोख बंदोबस्तात तातडीने नगर येथील पाठविण्यात आले आहे   
संतलूक हॉस्पिटलमध्ये एकुण  ४८कोरोना बाधीतावर  उपचार सुरु आहेत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात वार्ड नं ६ (२), वार्ड नं ३ (१), खंडाळा (२), नेवासा रोड (२), पढेगाव (१), सबजेल (१७) बेलापूर (३) रुग्णांचा समावेश आहे.
श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत १९९० जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३५९ वर जावून पोहोचली आहे. तर ९१६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

श्रीरामपूर |प्रतिनिधी| काल आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या 61 रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात 16 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका पोलिसांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या 298 वर जाऊन पोहोचली आहे.काल दुपारी रॅपीड टेस्ट तपासणीत 61 जणांची तपासणी करण्यात आली. 16 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या 298 वर जाऊन पोहोचले आहेत. तसेच करोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी 12 रुग्ण काल बरे होऊन घरी परतले आहेत.करोना पॉझिटिव्ह रुग्णात कारेगावात काल पुन्हा 6 रुग्ण आढळले आहेत तर खंडाळा-4, गोंधवणी 2, म्हाडा, वॉर्ड नं. 2, वडाळा महादेव, टाकळीभान प्रत्येकी 1 असे 16 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या संतलुक हॉस्पिटलमध्ये 44 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आंबेडकर वसतीगृहात 10 जणांना ठेवण्यात आले आहेत.श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 1216 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 298 वर जावून पोहोचली आहे. तर 696 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

रिझर्व्ह बँकेचा कर्जवसुलीस मनाई हुकूम असतानाही कर्जवसुली करणार्‍या बँक व फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी.करोना संकटामुळे बँक व फायनान्स कंपन्यांनी सहा महिने कोणत्याही कर्जदाराकडे हप्ते मागू नये, असे आदेश देऊनही नाशिक शहरातील फायनान्स कंपन्या हप्ते वसुलीसाठी तगादा लावत असून पैसे भरले नाहीत तर अतिरिक्त व्याज आकारण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नाशिक शहराच्या वतीने करण्यात आली असून त्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, करोना संकटामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेकांना दोन-तीन महिन्यांचे वेतनही मिळालेले नाही. अनेक मध्यमवर्गीयांनी कष्टकर्‍यांना मदतही केली आहे. पगार नाही, व्यवसाय बंद, कुठूनही पैसा येत नाही.त्यामुळे गृहकर्ज, गाडीचे कर्ज, व्यावसायिक कर्ज इ. कोणत्याही कारणासाठीचे कर्जाचे हप्ते भरण्याची क्षमता कोणत्याही सामान्य माणसाची राहिलेली नाही. शासनाने घर कर्जासह मायक्रो फायनान्सचे व सर्व कर्जाचे हप्ते भरण्यास तीन महिन्यांची सवलत दिली आहे.अर्थमंत्री व आरबीआय गव्हर्नर यांनी पुन्हा तीन महिने मुदतवाढ दिली आहे. मात्र नाशिक फायनान्स कंपन्यांची मुजोरी वाढली आहे.खात्यात पैसे नसल्याने ग्राहकास फायनान्स कंपनीने दंड लावला व बँकेतूनसुद्धा पैसे कट झाले. एक नाही तर एकाच दिवशी अनेकदा पैसे कट करण्यात आले. अशा प्रकाराने ग्राहक वैतागले आहेि. वसुली करणार्‍या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे यांनी केली आहे.यावेळी शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंखे, उपमहानगरप्रमुख अजय चौघुले, विभागप्रमुख सुयश पाटील, उपविभागप्रमुख लखन विश्वकर्मा, शाखाप्रमुख आकाश काळे उपस्थित होते.

बेलापूर  (प्रतिनिधी )- कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता गावातील नागरीकांची रक्षा करणार्या बेलापूर पोलीस दादांना फेस गार्ड सँनिटायझर मास्क देवुन बेलापूरातील महीलांनी रक्षा बंधन साण साजरा केला रक्षा बंधन हा सण बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण या दिवशी बहीण भावाला राखी बांधते बेलापूर पोलीस स्टेशनला दर वर्षी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई याच्या संकल्पनेतून रक्षा बंधन साजरा केला जातो या वर्षी कोरोना काळात अहोरात्र झटणार्या  आपल्या गावाचे दादा म्हणजे पोलीस दादा पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर हरिष पानसंबळ पोपट भोईटे निखील तमनर तसेच पोलीस पाटील आशोक प्रधान यांना फेस गार्ड सँनिटायझर मास्क देवून राखी बांधुन रक्षा बंधन साजरा करण्यात आला या वेळी माजी सरपंच भरत साळूंके बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले अकबर टिन मेकरवाले यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी सौ प्रतिभा देसाई सौ ज्योती भांड सौ संगीता देसाई  सौ सोनाली ओहोळ साक्षी ओहोळ अशोक गवते पाणी पुरवठा समीतीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप दायमा कैलास देसाई  अतिश देसर्डा किरण भांड प्रकाश जाजू महेश ओहोळ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर पोलीस नाईक यांनी आभार मानले

ईदुल अजहा (बकरी ईद ) 
भारतीय समाज जीवनात सामाजिक सलोख्यासाठी विविध भागांत विविध
सणांचे महत्व आहे .आपल्या पुर्वजांनी एकोपा निर्माण व्हावा यासाठी व सामाजिक , सांस्कृतिक व धार्मिक ऐकाता वाढविण्यासाठी निरनिराळ्या सणांचे महत्व काही औरच आहे . याची प्रामाणिक प्रयत्न केले गेले तर हे फक्त एक समाजापुरता न राहता ते कौमी एकतेचे प्रतिक बनते व ऐक सशक्त आणि निकोप सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व आर्थिक विकास होतो .
                आज आपण '"ईदुल -आजहा ""म्हणजेच सोपे भाषेत सांगायचे तर " बकरी ईद ""ईद म्हणजे आनंद लुटणे ,खुशी ,प्रसन्नता ,ई.
खरं तर "आजहा " हा मुळात फारशी शब्द आहे .याचा अर्थ हिंदी व उर्दू मधे" मावळतीचा चंद्र" असा होतो.सुर्यास्ताची कोवळी कोवळी सुखद क्षण ,किरणं ई.शब्दशा अर्थ निघतो.
ईदुल -आजहा हा सण इस्लामी कालगणनेनुसार किंवा calendar नुसार शेवटी " १२ वा महीना " जिलहिजजा "" हा आहे.याच महीन्यात १० व्या दिवशी येतो व तो जिलहिजजा ९.१०.११.१२ असा ४ दिवस सारखा चालतो .ईदुल -आजहा चा थेट संबंध  म्हणजेच " हाज''  चाच महीना ,
इस्लाम धर्म ज्या पाच (५) मुलभूतरित्या स्तंभावर उभा आहे त्या तील प्रमुख पाचवा( ५ )स्तंभ म्हणजेच " हाज "" 
ज्यांच्याकडे एवढा पैसा आहे की ,त्यांच्या स्वत:च्या व मुलाबाळांच्या सर्व खर्च भागवून ल सर्व मुलभूत गरजा भागवून शिल्लक राहिलेला पैशातुन " हाज" यात्रेला जाण्यासाठी एवढा शिल्लक आहे आशा धनीकांसाठी हाज यात्र आनिवार्य केलेले आहेत . ज्यांच्याकडे एवढं काही असून जात नाही ते अल्लाहाच्या नजरेतुन खुप मोठे दोषी आहेत ,कारण अल्लाहा सर्व ‌काही जाणतो.
आयुष्यातुन एकदा हाज आदा करणे अनिवार्य असते ,तसे म्हणाल तर तुमच्याकडे ऐवढा पैसा आहे की , तुम्ही तुमच्या गरजा भागवून दरवर्षी हाज यात्रेला जाण्यासाठी एवढा शिल्लक पैसा आहे तर तुम्ही दरवर्षी जावू शकतात , तुम्हाला काही ही बंधने घातली नाहीत . तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही ठरवू शकता.असो.
" हाज " यात्रा ही उर्दू महीण्यांतील १२वा महीना जिलहिजजा या महीण्याच्या ८,९,१०,१२,१३ यातारखेस असते .याला कोणी कोणी" हाज" चा महीना ही म्हणतात .हाज यात्रेकरू आपल्या ठिकाणाहुन तर कोणी पवित्र मक्का काबाशहरातुनच पुरूष हाजी अंगावर  पांढरे शुभ्र असे २.५ ते ३ मिटर चे लांबच -लांब पट्टी सारखापांढरे  शुभ्रवस्त्र  खांद्यावर घेवून , गुंडाळून , दुसरा खांदा मोकळा ,खुला सोडुन ,डोकं पुर्णतः उघडं , डोक्यावर काहीच नाही ,बाकीचे सर्व कापड संपूर्ण अंगाला गुंडाळून , लपेटून  सर्व पुरुष हाजी घेतात व स्रीया ,महीला हाजजन ह्या पांढरा शुभ्र असे पंजाबी ड्रेस सारखे परीधान करतात यालाच " ऐहराम "" असे म्हणतात हे जगातील जे जे येत असेल हाज यात्रेला ते सर्व बांधवांसाठी अनिवार्य करण्यात आलेले असते ,मग आपल्या शहरातील कितीही मोठा राजा,बादशहा, empire ,king , President , prime minister , कोणीही असो हाज यात्रेला अनिवार्य म्हणजे अनिवार्य .जसे आपण प्रेतासाठी अंत्यविधीसाठी कफन वापरतो अगदी तसेच ...यालाच " ऐहराम '"असे म्हणतात .
ऐहराम परीधान करून हिज्जाज -ऐ-कराम , " लब्बैक, अल्लाहुममा लब्बैक , लब्बैक अल्लाहुममा लब्बैक ," म्हणजेच " अल्लाह मी हाजर आहेत ,अल्लाह ,मी  हाजर आहे , फक्त आणि फक्त तुच या जगात मोठे आहेत ,जगात कायम स्वरूपी राहणारा फक्त आणि फक्त तुच आहेत‌""" गजर , निनाद, मंजूळ स्वरांत गात म्हणंत हाजी संपूर्ण काबा गाहा गजर २४तास क्षणं नं क्षणं आवाज गुजंत असतो , चोहीकडे आल्लाहा ,आल्लाहा  व अल्लाहचा ध्वनी , गजर , निनाद , गर्जना घुमत असते , आपल्या कानावर किती सुखद अनुभव,क्षण असेल कितीतरी पटीने अल्हाददायक वातावरणात अपण रमुन जात असेल ,हे फक्त आणि फक्त जे जे तेथे हाजीर असतील त्यांना च विचारून अनुभवावं ,मी म्हणतो किती पुण्यवान असतील ते सर्व ...  
अशाच प्रकारे निनाद , गर्जना करीत ते सर्व हिज्जाज-ऐ-कराम " लब्बैक_ अल्लाहुममा लब्बैक "म्हणतं म्हणत तेथूनच जवळ असलेल्या "पवित्र मीना"नावाच्या ठिकाणी पोहचतात व तेथुन १५-२० किलोमीटरवर असलेल्या पवित्र आशा " आराफत‌""  मैदानात कोणी कोणी पायी चालत तर कोणी जी सोयीचं वाटतं हाजमय वातावरणात पोहचतात.
काय क्षण असेल तो ,ज्यावेळी आल्लाहाचे प्रेषीत मुहम्मद स्व. हे स्वत: Historical FAREWELL PILGRIMAGE SPEECH ज्याला आपण""  हाजतुल विदाह का आखरी खुतबा " म्हणतो ते देत होते ,खुतबा ऐकणारे ,पाहणारे ,व प्रत्येक क्षणांचा सुखद अनुभव घेणारे किती भाग्यवान असतील त्यांचे अनुयायी सहाबा गण( रजि.) .तेथे जमलेल्या सर्व लोकांचा " लब्बैक अल्लाहुममा लब्बैक अल्लाहुममा लब्बैक ," चा ध्वनी ,गजर , निनांद संपूर्ण आराफात च्या मैदानावर गुंजत ,वह बहरलेला असेल .
नंतर ९ जिलहिजजच्या दिवशी ही पुन्हा हाजी आराफातच्या मैदानात सुर्यास्तापर्यंत थांबुन मगरीब ची नमाज अदा न करता येथुनच ७-१०किलोमिटरवर असलेल्या " मुसदलफा"" नावाच्या मैदानात सर्व हाजी ऐकत्र जमून " मगरीब ,व ईशा, " ची नमाज ऐकत्रीत रित्या आदा करून तेथेच रात्रभर " आल्लाहु अकबर ,आल्लाहु अकबर ला शरीका लक अल्लाहु अकबर आल्लाहु अकबर " चा मोठ्या संख्येने मोठ्या आवाजात मंजूळ स्वरांत गात ,म्हणंत रात्रभर काळ्याभोर उघड्या आकाशात आल्लाह जवळ आपण नकळत ,कळत केलेल्या पापांची क्षमा याचना करीत असतात व पुढे ही असं करणार नाही याची मनोमन इच्छा ,प्रार्थना करत असतात व परमपूज्य व परमपित्या आल्लाहाची स्तुती व वंदना , याचना करून आल्लाहाला राजी करून नंतर १० दहा जिलहिजजाला " जमरात " शैतान आहे तेथून बारिक बारीक गोटे ,दगड ,गोळा करून सुर्योदयानंतर पुन्हा ". मीना " च्या मैदानावर "जमरात " म्हणजेच शैतानाच्या स्तंभाला कंकरी (बारिक दगडांचे गोळे , तुकडे) मोठे शैतानाला ७-७च्या प्रमाणे कंकरी मारून नंतर कुर्बानी विधीवत करतात ,ते अनिवार्य आहेत,व नंतर पुरूष हाजी आपले केसांचे मुंडंन करतात ,व महीला हाजजन आपल्या बोटांत मावेल तेवढे केस घेवून एवढीशी बट कापून हाज ची विधीवत पुर्ण करुन १०,११,१२ जिलहिजजाची असर नमाज पर्यंत मककेच्या पवित्र स्थान ज्याला"  खाना-ऐ- काबा " ची जिरायत (दर्शन)करून ,
नंतर लगेच पुन्हा एकदा"  मिना "मधे येवून आप- आपल्या जागेवर येवून १२ जिलहिजजच्या ' असर ' नमाजपर्यंत थांबून त्या ३ तिन्ही सैतानाला ७-७-७ कंकरी मारून १२जिलहिजजच्या संध्याकाळी पुन्हा मक्का येथे आप-आपल्या ठिकाणी येवून हाजी मककेच्या खान-ऐ- काबाची जियारत व ७-७-७ फेऱ्यांची प्रदर्शना  करून , नंतर त्याबरोबर च '"" ‌‌ सफाह  व मरवाह "" या पहाडाचे ही ७-७-७ फेऱ्याची परीक्रमा , प्रदर्शना करून हाज चे सर्व विधीवत ज्याला आपण " आरकान "' पुर्ण करतात.
हि सर्व आरकान करून हाजी साहेब मदीनेस रवाना होतात व तेथे आल्लाहचे प्रेषीत हजरत मुहम्मद स्व.यांच्या पवित्र स्थानांला भेट देऊन 
आप आपल्या गांवी,देश ,शहरी रवाना होतात .
प्रत्येक हाजी साहेब पहिल्या प्रथम आपल्या शहरातील , गावातील आपल्या जवळच्या मस्जिद जी असेल ती किंवा जामा मस्जिद मधे जावुन दोन रकात नमाज आदा करून आल्लाह कडे आपल्या देशाची ,मित्रांची , शहरातील सर्व लोकांची , देशातील सर्व‌ नागरिकांची , आई-वडील , बहीण भाऊ , आपली मुलं , नातवंडे ,या सर्व लोकांची दिर्घआरोग्याची  ,सुखाची , समस्त शांतता ची , जगातील शांततेची कळकळीने  दुआ करून , सर्व लोकांची देशातील सर्व‌ नागरिकांची  भावी आयुष्यासाठी शुभेच्छा परमेश्वराजवळ मागून नंतर आपल्या घरी परतुन हाज ची पुर्णतः मंगलमय वातावरणात करतात....
शहरातील , गावातील,समाज बांधव ज्यांची हाजला,हाजसाठी जाण्याची इच्छा असुन जावू शकत नाही ,काही कारणांमुळे ,ते सर्व बांधव आप आपल्या शहरात , गावातील सर्व लोक , गावातील , शहरातील ईदगाह मैदानात जावून ईदुल -आजहा ची नमाज आदा करतात व हजरत इब्राहिम अलेहिससलाम व हजरत मुहम्मद स्व.व हजरत इस्माइल अले.ची सुन्न त नुसार कुर्बानी विधीवत करतात व ३ दिवस कुर्बानी विधीवत करून  त्यामधे ३ भाग करून हजरत प्रेषीतांनी व आल्लाहने सांगितलेल्या प्रमाणे तीन-३-३ भाग करून गोरगरीब जनतेसाठी व नातेवाईक मित्र ई.ना देवुन कारण ईदल आजहा च्या आनंदापासून कोणी ही वंचित राहू नये व राहणार हि नाही म्हणून आपल्या परीनै काळजीपूर्वक नियोजन करतात व ईदुल -आजहा साजरी करतात.....
लेखक डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा दवाखाना श्रीरामपूर 
९२७१६४००१४ ..

बेलापूर (प्रतिनिधी  )-५०० वर्षापासून आपल्या सर्वांच्या श्रध्देचा भाग असणार्या प्रभू  श्रीराम यांच्या मंदिराच्या कामास सुरुवात होत असुन बेलापूरकराच्या नव्हे अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने हा एक आनंदाचा क्षण आहे कारण आपल्या भूमिपुत्रास हा सन्मान मिळत आहे असे मत पंडीत महेश व्यास यांनी व्यक्त केले श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथे दि 5 आॅगष्ट रोजी मंदिर निर्माण कार्याचा शुभारंभ अखंड भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व बेलापुरचे भूमीपुत्र प पू स्वामी श्री गोविंददेवगिरीजी महाराज व देवगडचे महंत पू श्री भास्करगिरिजी महाराज यांच्या उपस्थितीत होत आहे भूमीपूजना साठी बिल्वतीर्थाचे पाणी व श्रीहरिहर केशव गोविंद ऊक्कलगाव बन व बेलापूर बु! अशा त्रिस्थळीची  माती पुणे येथे पाठविण्यात आली  बेलापूरातील कारसेवक श्री दिलीप काळे रामप्रसाद व्यास गजानन डावरे व नटवरलाल सोमाणी यांच्या हस्ते त्रीस्थळीचे तिर्थ व मातीचे पुजन करण्यात आले   त्याप्रसंगी पूजनीय श्री महेशजी व्यास जि प सदस्य शरद नवले उपसरपंच रविंद्र खटोड शहर भा ज प उपाध्यक्ष ओमप्रकाश व्यास रामनाथजी शिंदे शेखर डावरे मुन्ना खरात किराणा व्यापारी संघटनेचे प्रशांत लढ्ढा गोशाळा सचिव राजेंद्र शर्मा विशाल मेहेत्रे लक्ष्मण शिंदे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा विष्णुपंत डावरे  अतिश देसर्डा व सोमनाथ राशिनकर आदि उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget