Latest Post

श्रीरामपूर(प्रतिनिधी)येथील श्रीराम अँकेडमी सीबीएसई  विद्यालयातील कु. ऋतुजा सचिन घेरडे या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत 96 टक्के गुण मिळवून  शाळेत 2 रा क्रमांक व तालुक्यात देखील 2रा क्रमांक पटकावला  आहे.  व यश संपादन केले आहे.
तिला गणित विषयात पैकीचे पैकी 100 गुण मिळाले आहेत. या सुयशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष राम टेकावडे,प्राचार्या सौ. पोटघन, मार्गदर्शक अध्यापिका कश्यप यांच्यासह सर्व शिक्षक-सेवाकवृंदाने तिचे कौतुक केले आहे. ती श्रीरामपूर येथील  डॉ. सौ.सारिका घेरडे  व डॉ. सचिन घेरडे यांची ती सुकन्या आहे.

🟣घटनास्थळावरुन आरोपी गुटखा तस्कराला कोणी केलय फरार?
🟢बुलडाणा जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करी वाढली
बुलडाणा - 19 जुलै
अप्पर पोलिस अधीक्षक खामगांव यांच्या पथकाने एका गोदामात धाड टाकून अवैधरित्य साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा व रेशनचा तांदूळचा मोठा साठा पकडून चांगली कामगिरी केली मात्र सदर माफियावर गुन्हा दाखल करण्यासाठी दोन विभागात चाल ढकल चालली व तब्बल 72 तासाने
शेवटी पोलिसालाच फिर्याद द्यावी लागली.दरम्यान या धाडी नंतर घटनास्थळी हजर असलेल्या गुटखा तस्कराला कोणी पळवला हा प्रश्न उपस्थित होत असून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातील ही संपूर्ण कार्रवाई आता संशयाच्या भवऱ्यात आली असून याची वेगळ्या यंत्रणेकडून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी निष्पक्ष चौकशी लावली तर "दूध का दूध और पानी का पानी" समोर येईल.
      बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील कुंड या गावाच्या शिवारात एका गोडाऊन मधुन अवैधरित्या रेशन तांदूळ व प्रतिबंधित गुटख्याची तस्करी सुरु होती.याची माहिती मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या पथकाने 14 जुलै रोजी सायंकाळी छापा मारून मोठ्या प्रमाणात रेशन धान्य व राज्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू पकला.जप्तीची करवाई सुरु असतांना सदर माफिया घटनास्थळी हजर होता (याचा पोलीसाने बनवलेला विडिओ आहे). रेशन धान्य जप्त असल्यामुळे मलकापुर तहसिल विभागाने 16 जुलै रोजी मलकापुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे, मात्र 17 लाखाचा गुटखा पकडल्या नंतर राज्य शासनाने दिलेल्या अधिकारचा वापर करत पोलीसाने फिर्याद देऊन गुन्हा नोंदविला पाहिजे होता,मात्र उलट पोलीसाने 15 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग बुलडाणा यांना पत्र देऊन पुढील कार्रवाई करण्याचे सांगीतले होते.त्यानुसार अन्न व औषध विभागाचे अधिकारी मलकापुर ठाण्यात गेले व त्यांनी पंचनामा करण्यासाठी आरोपी मागितला मात्र आरोपी नसल्याचे पोलीसाने सांगितले म्हणून अन्न व औ.प्रशासन विभागाने काही कार्यवाही केली नाही व जो पर्यंत गुटखा मालक आमच्या समोर येत नाही तो पर्यंत आम्ही पुढील कार्यवाही करणार नाही असे म्हणत ते बुलडाणा माघारी परतले.अशा प्रकारे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात गुटखा माफिया वर गुन्हा दाखल करण्यासाठी या दोन विभागामध्ये चालढकल सुरु होती.शेवटी वरिष्ठा अधिकारी कडून कान टोचल्यावर जाग आली व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय खामगांव येथे कार्यरत  पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत दिलीपराव बोरसे यांची फिर्यादवर   आरोपी अतिकुर रहेमान शफीकुर रहेमान रा. पारपेठ मलकापुर यांच्या विरुद्ध भादवीची कलम 188,269,270,272,273,328,468 तसेच अन्न सुरक्षा मानके कलम 26 (2)(lV),59 तसेच आपत्ति व्यवस्थापन कायदा,साथरोग प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र कोविड नियंत्रण कायद्या प्रमाणे 17 जुलैच्या रात्री तब्बल 72 तासानंतर मलकापुर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात वाढलेली गुटखा तस्करीवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही.तसेच आरोपी अतीक ला घटनास्थळावारुन कोणी व कोणाच्या ईशाऱ्याने फरार करण्यात आले?हे तर ना समजणारे कोड़े आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- बेलापूर पोलीसांनी विना मास्क फिरणारे तसेच विनाकारण फिरणारे यांना आपला खाक्या दाखविण्यास सुरुवात केली असुन काल दोन जणावर कारवाई करण्यात आली तर काहींना जागेवरच शिक्षा देण्यात आली      बेलापूरात कोरोनाचा रुग्ण सापडताच ग्रामस्थांनी कडक धोरण अवलंबविले विना मास्क फिरणाराला दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला त्या नंतर ते रुग्ण घरी आल्यामुळे गावात सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच अनेक लोक विनाकारण टोळक्या टोळक्याने रस्त्यावर येवु लागले कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन जमु लागले या बाबतचे वृत्त प्रकाशित होताच पोलीस उपनिरीक्षक डी बी  उजे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर निखिल तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ यांनी गावात गस्त घालुन खुलेआम विनाकारण करणारांना चांगलेच फटकारले विना मास्क टिबल सीट मोटार सायकलवर जाणार्यांना चौकातच उठबशा काढावयास लावल्या त्यांनतर गावात अनेकांना दंडूक्याचा प्रसाद दिला सुनिल वैद्य हा विनाकारण  फिरताना आढळून आला या बाबतची फिर्याद पोलीसा काँन्स्टेबल निखील तमनर यांनी दिली तर पोलीस काँन्स्टेबल पोपट भोइटे यांच्या तक्रारी वरुन एकलहरे येथील विशाल अल्हाट याचे विरुध्द मा जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा आदेशाचे  नियमाचे उल्लघन केल्याबद्दल दोघा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीसांच्या या कारवाई मुळे मोकाट फिरणार्यांना आळा बसेल हे नक्कीच.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूरातील त्या रुग्णाची तातडीने रँपीड टेस्ट करण्यात आली असुन तो अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे बेलापूरकरांचा जिव भांड्यात पडला  बेलापूरातील त्या रुग्णाचा अहवाल तब्बल बारा दिवसा नंतर  पाँझीटीव्ह आला त्या अहवालावरुन वैद्यकीय अधीकारी पोलीस पाटील यांनी तो रुग्ण राहत असलेला दोनशे मीटरचा परिसर बंद केला हा परिसर सील केल्यामुळे ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले होते दरम्यान संबधीत रुग्णास श्रीरामपूर येथे नेण्यात आले असता त्याची रँपीड टेस्ट ही निगेटीव्ह आली त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्या अहवालावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे आता सील केलेला भाग खूला करणार का असा सवाल नागरीकामधुन विचारला जात आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूरातील आणखी एकाचा अहवाल पाँझीटीव्ह आल्यामुळे शासकीय नियमानुसार २०० मिटरचा भाग पुर्णपणे बंद करण्यात आला असुन संबधीत रुग्णाचा अहवाल तब्बल बारा दिवसा नंतर आल्यामुळे नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे. बेलापूरातील आणखी एका रुग्णाचा अहवाल पाँझीटीव्ह आला असुन तब्बल बारा दिवसापूर्वी संबधीत रुग्णाचा स्वँब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता  त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन तो व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल आल्यामुळे संपूर्ण  परिसर सिल करण्यात आला आहे संबधीत व्यक्ती कोरोंटाईन असताना त्याचा स्वँब घेवुन त्यास सोडून देण्यात आले होते त्या नंतर ती व्यक्ती गावात येवुन सर्वत्र खुली आम फिरत होती त्यामुळे गावात रुग्ण वाढल्यास त्यास प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सुनिल मुथा यांनी केला असुन त्या व्यक्तीचा अहवाल येण्यास बारा दिवसाचा कालावधी  का लागला त्यास अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन कराणे आवश्यक असताना त्यास कुणाच्या आदेशाने सोडले त्याच्या हातावर शिक्का का मारला नाही असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे या बाबत कुणावर कारवाई करणार असा सवाल मुथा यांनी केला असुन या प्रकारामुळे प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे प्रशासनाच्या चुकीचा परिणाम बेलापूराकरांना भोगावा लागत असुन बारा दिवासाच्या कालावधी नंतर अहवाल का आला याची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विवेक वाबळे यांनी केली आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूरातील आणखी एकाचा अहवाल पाँझीटीव्ह आल्यामुळे शासकीय नियमानुसार २०० मिटरचा भाग पुर्णपणे बंद करण्यात आला असुन संबधीत रुग्णाचा अहवाल तब्बल बारा दिवसा नंतर आल्यामुळे नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे. बेलापूरातील आणखी एका रुग्णाचा अहवाल पाँझीटीव्ह आला असुन तब्बल बारा दिवसापूर्वी संबधीत रुग्णाचा स्वँब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता  त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन तो व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल आल्यामुळे संपूर्ण  परिसर सिल करण्यात आला आहे संबधीत व्यक्ती कोरोंटाईन असताना त्याचा स्वँब घेवुन त्यास सोडून देण्यात आले होते त्या नंतर ती व्यक्ती गावात येवुन सर्वत्र खुली आम फिरत होती त्यामुळे गावात रुग्ण वाढल्यास त्यास प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सुनिल मुथा यांनी केला असुन त्या व्यक्तीचा अहवाल येण्यास बारा दिवसाचा कालावधी  का लागला त्यास अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन कराणे आवश्यक असताना त्यास कुणाच्या आदेशाने सोडले त्याच्या हातावर शिक्का का मारला नाही असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे या बाबत कुणावर कारवाई करणार असा सवाल मुथा यांनी केला असुन या प्रकारामुळे प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे प्रशासनाच्या चुकीचा परिणाम बेलापूराकरांना भोगावा लागत असुन बारा दिवासाच्या कालावधी नंतर अहवाल का आला याची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विवेक वाबळे यांनी केली आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-  बाजारपेठेत वावरताना नागरीकाकडून नियमांची पायमल्ली केली जात असुन सोशल डिस्टनचा नियम पायदळी तुडविला जात आहे  लोक मास्क शिवाय वावरताना दिसत आहे त्यामुळे बेलापूरकरांच्या मनातील कोरोनाची भिती कमी झाली की काय  अशी शंका उपस्थित केली जात आहे                बेलापूरात एक व्यक्ती कोरोना संशयीत आढळल्यामुळे गावकर्यांनी गाव बंद ठेवुन काही धाडसी निर्णय घेतले परंतु बंदिस्त खोलीत घेतलेले  हे निर्णय कागदावरच राहीले आहे अनेक जण गावात विनाकारण वावरताना दिसत आहे गावात कोरोना समीतीच्या बैठकीत मास्क न वापरणार्या व्यक्तींना शंभर रुपये दंड तसेच ठरलेल्या वेळेनतंरही दुकाने विक्री करणार्या व्यापार्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता परंतु हे सर्व निर्णय बंद खोलीत झालेल्या बैठकी पुरतेच मर्यादित राहीले आहे कोरोना कमीटीही सुस्त झाली असुन पोलीस प्रशासनही  ही बाब गांभिर्याने घेताना दिसत नाही बेलापूर ग्रामपंचायतीने नियम न पाळणार्या काही व्यापारी व नागरीकावर दंडात्मक कारवाई केली पावती फाडली परंतु दंडच वसुल केला नाही त्यामुळे नागरीकांना त्यातील गांभीर्य कमी झाले की काय रस्त्यावर लोक विनाकारण नियम न पाळता फिरताना दिसतात काही लोक टोळक्या टोळक्याने चौका चौकात गप्पा मारताना दिसत आहेत कोरोना समीतीने पुन्हा एकदा सक्रीय होवुन नियम काटेकोर पालन करण्याची गरज आहे नाही तर पुन्हा एखादा बाधीत झाल्यावर सर्व जण सावध व्हायचे बेलापूर पोलीसांनी देखील गस्त वाढवुन नियम न पाळणार्यांना धडा शिकवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget