बारा दिवसानंतर आला अहवाल पाँझीटीव्ह तो भाग सील प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूरातील आणखी एकाचा अहवाल पाँझीटीव्ह आल्यामुळे शासकीय नियमानुसार २०० मिटरचा भाग पुर्णपणे बंद करण्यात आला असुन संबधीत रुग्णाचा अहवाल तब्बल बारा दिवसा नंतर आल्यामुळे नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे. बेलापूरातील आणखी एका रुग्णाचा अहवाल पाँझीटीव्ह आला असुन तब्बल बारा दिवसापूर्वी संबधीत रुग्णाचा स्वँब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता  त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन तो व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल आल्यामुळे संपूर्ण  परिसर सिल करण्यात आला आहे संबधीत व्यक्ती कोरोंटाईन असताना त्याचा स्वँब घेवुन त्यास सोडून देण्यात आले होते त्या नंतर ती व्यक्ती गावात येवुन सर्वत्र खुली आम फिरत होती त्यामुळे गावात रुग्ण वाढल्यास त्यास प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सुनिल मुथा यांनी केला असुन त्या व्यक्तीचा अहवाल येण्यास बारा दिवसाचा कालावधी  का लागला त्यास अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन कराणे आवश्यक असताना त्यास कुणाच्या आदेशाने सोडले त्याच्या हातावर शिक्का का मारला नाही असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे या बाबत कुणावर कारवाई करणार असा सवाल मुथा यांनी केला असुन या प्रकारामुळे प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे प्रशासनाच्या चुकीचा परिणाम बेलापूराकरांना भोगावा लागत असुन बारा दिवासाच्या कालावधी नंतर अहवाल का आला याची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विवेक वाबळे यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget