🟣घटनास्थळावरुन आरोपी गुटखा तस्कराला कोणी केलय फरार?
🟢बुलडाणा जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करी वाढली
बुलडाणा - 19 जुलै
अप्पर पोलिस अधीक्षक खामगांव यांच्या पथकाने एका गोदामात धाड टाकून अवैधरित्य साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा व रेशनचा तांदूळचा मोठा साठा पकडून चांगली कामगिरी केली मात्र सदर माफियावर गुन्हा दाखल करण्यासाठी दोन विभागात चाल ढकल चालली व तब्बल 72 तासाने
शेवटी पोलिसालाच फिर्याद द्यावी लागली.दरम्यान या धाडी नंतर घटनास्थळी हजर असलेल्या गुटखा तस्कराला कोणी पळवला हा प्रश्न उपस्थित होत असून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातील ही संपूर्ण कार्रवाई आता संशयाच्या भवऱ्यात आली असून याची वेगळ्या यंत्रणेकडून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी निष्पक्ष चौकशी लावली तर "दूध का दूध और पानी का पानी" समोर येईल.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील कुंड या गावाच्या शिवारात एका गोडाऊन मधुन अवैधरित्या रेशन तांदूळ व प्रतिबंधित गुटख्याची तस्करी सुरु होती.याची माहिती मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या पथकाने 14 जुलै रोजी सायंकाळी छापा मारून मोठ्या प्रमाणात रेशन धान्य व राज्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू पकला.जप्तीची करवाई सुरु असतांना सदर माफिया घटनास्थळी हजर होता (याचा पोलीसाने बनवलेला विडिओ आहे). रेशन धान्य जप्त असल्यामुळे मलकापुर तहसिल विभागाने 16 जुलै रोजी मलकापुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे, मात्र 17 लाखाचा गुटखा पकडल्या नंतर राज्य शासनाने दिलेल्या अधिकारचा वापर करत पोलीसाने फिर्याद देऊन गुन्हा नोंदविला पाहिजे होता,मात्र उलट पोलीसाने 15 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग बुलडाणा यांना पत्र देऊन पुढील कार्रवाई करण्याचे सांगीतले होते.त्यानुसार अन्न व औषध विभागाचे अधिकारी मलकापुर ठाण्यात गेले व त्यांनी पंचनामा करण्यासाठी आरोपी मागितला मात्र आरोपी नसल्याचे पोलीसाने सांगितले म्हणून अन्न व औ.प्रशासन विभागाने काही कार्यवाही केली नाही व जो पर्यंत गुटखा मालक आमच्या समोर येत नाही तो पर्यंत आम्ही पुढील कार्यवाही करणार नाही असे म्हणत ते बुलडाणा माघारी परतले.अशा प्रकारे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात गुटखा माफिया वर गुन्हा दाखल करण्यासाठी या दोन विभागामध्ये चालढकल सुरु होती.शेवटी वरिष्ठा अधिकारी कडून कान टोचल्यावर जाग आली व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय खामगांव येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत दिलीपराव बोरसे यांची फिर्यादवर आरोपी अतिकुर रहेमान शफीकुर रहेमान रा. पारपेठ मलकापुर यांच्या विरुद्ध भादवीची कलम 188,269,270,272,273,328,468 तसेच अन्न सुरक्षा मानके कलम 26 (2)(lV),59 तसेच आपत्ति व्यवस्थापन कायदा,साथरोग प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र कोविड नियंत्रण कायद्या प्रमाणे 17 जुलैच्या रात्री तब्बल 72 तासानंतर मलकापुर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात वाढलेली गुटखा तस्करीवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही.तसेच आरोपी अतीक ला घटनास्थळावारुन कोणी व कोणाच्या ईशाऱ्याने फरार करण्यात आले?हे तर ना समजणारे कोड़े आहे.
Post a Comment