बेलापूर (प्रतिनिधी )- बेलापूरातील त्या रुग्णाची तातडीने रँपीड टेस्ट करण्यात आली असुन तो अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे बेलापूरकरांचा जिव भांड्यात पडला बेलापूरातील त्या रुग्णाचा अहवाल तब्बल बारा दिवसा नंतर पाँझीटीव्ह आला त्या अहवालावरुन वैद्यकीय अधीकारी पोलीस पाटील यांनी तो रुग्ण राहत असलेला दोनशे मीटरचा परिसर बंद केला हा परिसर सील केल्यामुळे ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले होते दरम्यान संबधीत रुग्णास श्रीरामपूर येथे नेण्यात आले असता त्याची रँपीड टेस्ट ही निगेटीव्ह आली त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्या अहवालावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे आता सील केलेला भाग खूला करणार का असा सवाल नागरीकामधुन विचारला जात आहे.
Post a Comment