श्रीरामपूर (वार्ताहर) तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्त शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्र पवार होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर वडाळा महादेव यांच्यावतीने श्रीरामपूर शहरातील कंटेन्मेंट झोन मध्ये सुमारे दिड हजार कुटूंबाना अरसनिक अलबमच्या गोळ्यांचे वाटप तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवा ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून कोरोना आजारावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच कॉलेजची भव्य वास्तू संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहे. या शैक्षणिक संस्थेच्या उभारणीमध्ये माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांचे मोलाचे योगदान आहे त्यामुळे शिवा ट्रस्टच्या वतीने स्व.ससाणे यांच्या जयंतीनिमित्त गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि आज सुमारे दिड हजार कुटूंबाना सदर गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
यावेळी डीवायएसपी राहुल मदने, पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, जेष्ठ नगरसेवक मुज्जफर शेख, मुक्तार शाह, मुन्ना पठाण, अहमदभाई जहागीरदार, नजीर मुलाणी, रईस जहागीरदार, रियाज पठाण, कलीम कुरेशी, कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव, तसेच डॉक्टर व सेवक उपस्थित होते.