जांभरुन येथील गोठ्यातून अजगर केले रेस्क्यू.

बुलडाणा - 8 जुलै
बुलडाणा शहराला लागुनच असलेल्या जांभरुन गावात बुलडाणा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जावून 8 फूट लांबीच्या अजगरला रेस्क्यू केला आहे.
     आज दिनांक 7 जुलै रोजी मौजे जाभरून गावातील रहिवासी शिवाजी मुळे यांच्या मालकीच्या जनावारांच्या गोठ्यात मोठा अजगर असल्याची माहिती बुलडाणा वनविभागाला प्रप्त झाली त्यानुसार वनविभागाची रेस्क्यू टीम सदर ठीकाणी दाखल झाली त्या वेळी अजगर गोठ्यात बसलेला आढळून आला.त्या अजगराला पकडून बुलढाणा शहरा जवळच्या ज्ञानगंगा अभयारण्यात वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव विभाग खामगाव डांगे यांच्या समक्ष सुखरुप सोडून देण्यात आले. सदर कार्यवाही वनपरीक्षेत्र अधिकारी बुलडाणा गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेसक्यु टीमचे सदस्य संदीप मडावी, दिपक घोरपडे व वन्य जीवप्रेमी निलेश जाधव यांनी पार पाडली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget