
श्रीरामपूर शहरात दररोज करोना बाधितांची संख्या वाढत असून काल पुन्हा वॉर्ड नं. 2 मध्ये तीन जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. आता श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 38 वर जावून पोहोचली आहे.श्रीरामपूर तालुक्यातील 36 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा होती. त्यापैकी काल तीन पॉझिटीव्ह आले असून 14 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. काल पुन्हा 16 जणांचे स्त्रास तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता अद्यापही 25 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मधील 17 वर्षीय तरुण असून त्याचे संपर्कातील लोक क्वारंटाईन करण्यात आले आहेत तर दुसरा हा 48 वर्षीय इसम आहे. तर तिसरा इसम हा 36 वर्षीय आहे. या रुग्णांच्या घरातील लोकांना ताब्यात घेण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.या भागात एका ठिकाणी स्त्राव घेण्याचे आयोजन करण्यात येणार असून स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. या तीन रुग्णासह वॉर्ड नं. 2 मधील करोनाबाधितांची संख्या 13 वर जावून पोहोचली आहे. या भागात कन्टेटमेंट झोन जाहीर केला असून घराच्या बाहेर कोणीही पडू नये असे आवाहन तहसीलदार श्री. पाटील यांनी केले आहे.नागरिकांनी या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घ्यावी. तोंडाला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment