Latest Post

बुलडाणा - 19 जून
आज 19 जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय मोताळा येथे ठेवण्यात आला होता सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली असून पहिले महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले एड.संजय राठोड  मागास्वार्गिय सेलचे प्रदेशअधक्ष विजय अंभोरे,लक्ष्मणराव घुमरे, आंबेकर सर, शैलेश खेडकर, दीपक रिंठे, ढगे संतोष पाटील, मुक्तारसिंग राजपूत,
एड. विजय साळवे,बाबासाहेब भोंडे, एकनाथ खर्चे, तुळशीराम नाईक, सुनील जयस्वाल, मिलिंद पाटील, सोपान पानपाटील,  सुमिता अवकाळे,सौ लताताई पारस्कर,मनोरमा सातव, अब्दुल हसन अब्दुल तायर, मिलिंद आहिरे, सब्जीलाल जाधव, पुंडलिक जावरे,एकनाथ चव्हाण,महेश जाधव,विशाल राठोड, अविनाश चव्हाण, संजय शेळके, किशोर चव्हाण,विष्णू शिराळ, पवन जाधव, गणेश बसी, अल्ताफ खान, नितीन राठोड, संतोष पाटील आदींची उपस्थिती होती या रक्तदान शिबिराचे उद्दिष्ट एक हजार युनिट होते पण रक्तसाठा संपादित करण्यासाठी अडचण येत असल्यामुळे काहीच लोकांनी याठिकाणी रक्तदान केले बाकी 1000 रक्तदात्यांची यादी ही सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकिस्तक यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

मुंबई - यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळाला केले आहे.
आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्रीद्वय सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार महोदय, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रवींद्रन व इतर वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. शिर्डी सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका सम्पलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता , योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. 
ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू असे ही मुख्यमंत्री म्हणाले. 
गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अहमदनगर : जिल्ह्यात आणखी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सकाळी तीन आणि सायंकाळी आणखी चार रुग्ण आढळून आले. त्यापैकी दोन जण हे एस. टी. महामंडळात चालक आहेत. दिवसभरात आज सात रुग्ण आढळून आले आहेत. पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे आलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची बाधा झाली आहे. कोल्हेवाडी (संगमनेर) येथील१८ वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे.  माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथील ३३ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण झाली आहे. कुर्ला नेहरूनगर, मुंबई येथे चालक म्हणून काम करत होता. नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील ३३ वर्षीय व्यक्तिलाही कोरोणाची लागण झाली आहे. ही व्यक्तीही मुंबई येथे चालक म्हणून काम करीत होती.आज सकाळी ०३ बाधित व्यक्ती आढळल्या. पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेल्या 68 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाला होता दाखल. याशिवाय, संगमनेर येथील दोघा जणांचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत १४ जून रोजी पॉझिटिव्ह आला होता. तसेच नवनागापूर अहमदनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पॉझिटिव्ह आला आहे. या तीन रुग्णांची आयसीएमआर पोर्टल वर जिल्ह्याच्या संख्येत नोंद झाली आहे. त्यामुळे या तीन रुग्णांची भर जिल्ह्याच्या एकूण  रुग्ण संख्येत पडली आहे.

बेलापूर  ( प्रतिनीधी )ट्रँक्टरचा भिंतीला धक्का लागुन भित पडून त्या भिंतीखाली दबुन दोन लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू झिल्याची हृदयद्रावक घटना गायकवाड वस्ती येथील बोंबले वस्तीवर घडली                      या बाबत सविस्तर वृत्त असे की बेलापूर बु! येथील बोंबले वस्ती या ठिकाणी कसबे यांच्या नविन घराचे बांधकाम चालु होते घराच्या भिंतीचे दहा फुट बांधकाम पुर्ण झाले होते त्या शेजारीच गांगुर्डे यांचा प्लाँट आहे या ठिकाणी  ट्रँक्टरच्या सहाय्याने विटा टाकण्याचे काम चालु होते ट्रँक्टर सरकल्यामुळे तो नविन बांधकाम केलेल्या भिंतीवर आदळला त्यामुळे ती भिंत कोसळली त्या भिंती लगतच ऋतुजा बाळासाहेब गांगुर्डे वय ४ वर्ष वा शृतीका बाळासाहेब गायकवाड वय ६ वर्ष या मुली खेळत होत्या ट्रँक्टरच्या धडकेने विटाचे बांधकाम असलेली भिंत या दोन लहान चिमुरड्यांच्या अंगावर कोसळली त्यात दोघीही जागेवरच गतप्राण झाल्या घटनेची माहीती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आमदार लहु कानडे सचिन गुजर करण ससाणे यांनी गायकवाड  व गांगुर्डे यांच्या घरी जावुन सांत्वन केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर राहणारे अरुण नवनाथ धनवटे वय वर्ष २९ याने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली  आत्महत्येचे निश्चित कारण समजु शकले नाही नवनाथ ढोल पार्टी नावाचे त्यांचे ढोल पथक आहे बर्याच दिवसापासून त्यांच्या हाताला कामच नव्हते त्यामुळे त्याची पत्नीही पुण्याला माहेरी रहात होती सकाळी जेवण करुन अरुण नेहमी प्रमाणे खोलीत गेला घरच्यांना वाटले तो झोपला असेल परंतु एक वाजण्याच्या सुमारास खोलीत डोकावले असता त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले या घटने बाबत तातडीने बेलापूर पोलीसांना  खबर देण्यात आली बेलापूर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली बेलापूर पोलीस स्टेशनचे राशीनकर रामेश्वर ढोकणे निखील तमनर पोपट भोईटे आदिंनी तातडीने पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला बेलापूर येथील स्मशानभुमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ भावजयी असा परिवार आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- दमदार पावसामुळे बेलापूर  बु!!ते वळदगाव या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आसुन आमदार निधीतुन हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणीआर पी आयच्या कार्यकर्त्यानी केली आहे  आर पी आयच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की जोरदार झालेल्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असुन शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी याच रास्त्याने जावे लागते पावसामुळे या रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले असुन आमदार लहु कानडे यांनी या रस्त्यास निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी रमेश अमोलीक विश्वासराव अमोलीक राजेश अमोलीक दिपक अमोलिक यांनु केली आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- डाळींब उत्पादकांना शासनाने फळबाग विमा योजनेंतर्गत तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी डाळींब उत्पादक शेतकरी रविंद्र खटोड यांनी केली आहे                 प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात खटोड यांनी म्हटले आहे की शासनाने डाळींब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी फळबाग पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दिलेली आहे परंतु राहुरी तालुक्यातील   देवळाली प्रवरा मंडल मधील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली नाही केवळ देवळाली प्रवरा मंडल मधील शेतकरी या लाभापासुन वंचित राहीलेले आहे                  तरी या मंडल मधील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा आंतर्गत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खटोड यांनी केली आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget