बेलापूर ( प्रतिनीधी )ट्रँक्टरचा भिंतीला धक्का लागुन भित पडून त्या भिंतीखाली दबुन दोन लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू झिल्याची हृदयद्रावक घटना गायकवाड वस्ती येथील बोंबले वस्तीवर घडली या बाबत सविस्तर वृत्त असे की बेलापूर बु! येथील बोंबले वस्ती या ठिकाणी कसबे यांच्या नविन घराचे बांधकाम चालु होते घराच्या भिंतीचे दहा फुट बांधकाम पुर्ण झाले होते त्या शेजारीच गांगुर्डे यांचा प्लाँट आहे या ठिकाणी ट्रँक्टरच्या सहाय्याने विटा टाकण्याचे काम चालु होते ट्रँक्टर सरकल्यामुळे तो नविन बांधकाम केलेल्या भिंतीवर आदळला त्यामुळे ती भिंत कोसळली त्या भिंती लगतच ऋतुजा बाळासाहेब गांगुर्डे वय ४ वर्ष वा शृतीका बाळासाहेब गायकवाड वय ६ वर्ष या मुली खेळत होत्या ट्रँक्टरच्या धडकेने विटाचे बांधकाम असलेली भिंत या दोन लहान चिमुरड्यांच्या अंगावर कोसळली त्यात दोघीही जागेवरच गतप्राण झाल्या घटनेची माहीती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आमदार लहु कानडे सचिन गुजर करण ससाणे यांनी गायकवाड व गांगुर्डे यांच्या घरी जावुन सांत्वन केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post a Comment