Latest Post

बुलडाणा - 13 जून
बुलडाणा तालुक्याती सैलानी येथे माहामार्ग ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका अनेक शेतकरी व नागरिकांना बसला आहे.जोरदार पावसामुळे शेतांचे नुकसान झाले व घरात व दुकानात पाणी शिरले आहे.
       बुलडाणा तालुक्यातील पिंपळगांव सराय जवळ हाजी हज़रत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाह आहे.हिन्दू-मुस्लिम एकतेची प्रतीक या दर्ग्यावर देश भरातून भाविक येत असतात.हे स्थान मुख्य मार्गापासुन आत
असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना फार अडचनीचा सामना करावा लागत होता म्हणून भाविकांच्या सुविधेसाठी दूधा ते हातनी या मार्गचा काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे.ठेकेदार सदर काम संथा गति ने होत असल्याने मागील वर्षी पावसाळ्यात तर सैलानी कडे जाणारा मार्ग तब्बल 4 महीने बंदच होता या मुळे या मार्गावरील गावाच्या नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. 12 जून रोजी सैलानी परिसरात जोरदार पाऊस पडला त्यामुळे सैलानीत अनेक घरात,दुकानात रात्रीच्या वेळी पानी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली होती.रसत्याला लागून योग्यरित्य नाल्या नसल्याने पानी शेतात शिरले व शेतात उभे मिर्ची व इतर पिकांचे फार नुकसान झाले आहे.सदर लोकांना ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाउन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या काही समाज माध्यमांमध्ये आणि वाहिन्यांवर येत आहेत पण अशाप्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले मात्र स्वयंशिस्त पाळावीच लागेल गर्दी करणे आरोग्याला अपायकारक होईल असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.राज्यात पुन्हा लॉकडाऊन अशा बातम्या जनमानसात संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नये अशा गैरसमज आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे याची जाणीवही मुख्यमंत्र्यांनी करून दिली
स्वयं शिस्त पाळावी
बाहेर पडल्यावर कायम चेहर्‍याचा मास्क लावणे, साबणाने जंतुनाशक आणि हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवनपद्धती सर्वांनी स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगीकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- फेस बुक अकाऊंट हँक करुन मोबाईल धारकाच्या नातेवाईका कडून पैसे उकळण्याचा प्रयत्न  थोडक्यात फसला असुन संबधीत मोबाईल धाराकाने सायबर शाखेकडे तक्रार दाखल केली आहे          या बाबत सविस्तर हकीकत अशी की बेलापूर येथील अमोल विठ्ठल गाडे यांचे मोबाईल  अज्ञात व्यक्तीने हँक करुन त्या मोबाईल मधील सर्व व्यक्तीचे मोबाईल नंबर  मिळवुन त्यांना मेसेज केले की मला पैशाची अंत्यंत गरज असुन तातडीने फोन पे वर या खात्यावर पैसे पाठविण्याची विनंती केली मात्र हे संदेश पाठविताना पाठविणार्या व्यक्तीने हिंदीतुन संदेश पाठविला त्यामुळे अमोल गाडे यांच्या मेव्हण्याला संशय आला त्यांनी तातडीने अमोलला फोन करुन विचारणा करताच मी पैसे मागीतलेच नाही असे अमोलने सांगताच त्याच्या मेव्हण्याने   मोबाईलचा स्क्रीन शाँट काढून पाठविला त्याच दरम्यान अमोलला एका व्यापार्याचाही फोन आला अन मग अनेक मित्राचे फोन सुरु झाले की तुला अचानक पैशाची काय गरज पडली या प्रश्नामुळे अमोल गोंधळून गेला त्याने तातडीने गुन्हा अन्वेषन शाखेचे रविंद्र कर्डीले मनोज गोसावी यांना ही घटना सांगीतले त्यांनी ताताडीने व्हाँटसअप वर संदेश पाठविण्यास सांगीतला अशाच प्रकारे गावातील चार पाच जणाचे मोबाईल हँक करण्याच्या घटना घडल्या असुन अमोल गाडे याने अहमदनगर येथील सायबर शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली असुन गाडे यांच्या बरोबर घडलेली घटना आणखी कुणाच्याही बाबतीत घडू शकते त्यामुळे कुणीही विनाकारण चौकशी केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करु नये असे अवाहन बेलापूर पोलीस स्टेशनचे रामेश्वर ढोकणे यांनी केले आहे.

बुलडाणा - 12 जून
रात्री झालेल्या पहील्याच जोरदार पावसाने नदी-नाले वाहु लागले आहे.बुलढाणा-धाड मार्गाचे काम सुरु असल्याने कोलवड जवळ पैनगंगा नदीवर पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते परंतु पहील्याच पावासाने नदीला आलेल्या पूरामुळे सदर पर्यायी पुल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
   विदर्भाला मराठवाड्याशी जोडणारा बुलडाणा-धाड हा प्रमुख मार्ग आहे.सद्या या मार्गाचे काम सार्वजिनक आंधकाम विभागा कडून "हेम" या योजने अंतर्गत जिजामाता रोड निर्मिति व पालसिद्ध कंस्ट्रक्शन करीत आहे.ग्राम कोलवड जवळून पैनगंगा नदी वाहते.या नदीवरचा जुना पुल तोडून नवीन पुलाचे निर्माण कार्य सुरु असून पर्यायी पुलावरुन वाहतूक वळविण्यात आली होती.11 जूनच्या रात्री बुलडाणा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडल्याने पैनगंगा नदी दुथड़ी वाहु लागल्याने पर्यायी पुल सकाळी 6 वाजेच्या दरम्यान वाहून गेला. त्यामूळे अनेक वाहने अडकुन पडली होती. पाण्याच्या टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहून गेलेल्या पूलावरन ट्रॅक्टर टाकण्याचा धाडसी प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने ट्रॅक्टर नदीत कोसळता कोसळता वाचला. सद्या या मार्गावारील वाहतूक बंद असून वाहने इतर मार्गाने जात आहे.

बुलडाणा - 12 जून
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या देखरेख खाली बुलडाणा ते देऊळघाट या 7 किलोमीटर मार्गाचे काम मागील काही दिवसापासुन जोरात सुरु आहे.बुलडाणा-अजिंठा या सीमेंट कॉन्क्रीट महामार्गाचे काम दोन वर्षापासून सुरु असून सदर मार्ग दोन भागात विभागलेला आहे.प्रथम बुलडाणा ते देऊळघाट या 7 किलोमीटर मार्गाचे काम डांबरीकरनचे आहे तर पुढे देऊळघाट ते अजिंठा हे जवळपास 40 किलोमीटर चा मार्ग सीमेंट कॉन्क्रीटचा आहे.अनेक अडचणी मुळे या कामात दिरनगाई झाली असून
आता मागील एक महिन्यापासुन बुलडाणा ते देऊळघाट मार्गाचे काम जोमात सुरु आहे.मार्गाचे दोन्ही साइड खोदुन मुरुमाने भरण्यात येत आहे तसेच आयुर्वेद महाविद्यालय जवळचे घाट माथा रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरु आहे.या 7 किलोमीटरच्या मार्गावरील जुने पुल पाडून नवीन पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे.खोदकामा मुळे धुळीने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.सदर माहामार्गाचा काम लवकर होने अपेक्षित आहे.

बुलडाणा - 12 जून
कोरोना विरूद्धच्या युद्धात सर्वात मोठे योगदान देत असलेल्या पोलिस प्रशासनातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी राज्यात कोरोना संसर्गीत होवून विविध हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत आहेत.संसर्गित पोलिसांना वेळीच चांगला उपचार मिळावे या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या समन्वयातून रिक्त पोलिस इमारतींमध्ये कोरोना केअर सेंटर उभारण्याचे ठरविले आहे.बुलडाणा जिल्ह्यात 2 ठीकाणी सीसीसी उभारण्यासाठी एसपी डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी 
बुलडाण्यातील स्व.दीपक जोग भवन आणि खामगांव येथील पोलिस कल्याण निधी डॉरमेटरी हॉल अशा दोन ठिकाण निश्चित केले आहे त्यापैकी खामगांव येथील कोरोना केअर सेंटरचे उदघाटन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 4 जून रोजी करण्यात आले आहे.बुलडाणा येथील स्व.दीपक जोग भवनचे दुरुस्तीचे काम सुरु आहे लवकरच येथे औषधी व उपचारासाठी लागणारे इतर साहित्य येणार आहे.

बुलढाणा - 12 जून
बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारवा  अभयारण्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र मध्ये गुरुवारी एका चीडलेल्या अस्वलाने जंगलात दोघा आदिवास इसमांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली.घटनास्थळाच्या लगतच अस्वलाच्या 2 लहान पिल्लांना कुणीतरी कुर्‍हाडीने मारून ठार केल्याने अस्वलाने चिडून जावून आपल्या पिल्ल्यांचा बदला या दोघे व्यक्तिन्ना ठार करून घेतल्याची चर्चा परिसरात रंगु लागली आहे.
      बुलढाणा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट अन्तर्गतच्या अंबाबारवा अभयारण्य मधील सोनाळा वनपरिक्षेत्रच्या दक्षिण  आलेवाडी बीट मधील खडकमाणी शिवारामध्ये गुरुवारी 11 जून रोजी सकाळी अशोक मोतीराम गवते वय
52 वर्ष व माना बंडू गवते वय 42 वर्षे रा.निमखेडी हे दोघे जन गेले असता त्यांच्यावर या गाभा क्षेत्रात एका अस्वलाने हल्ला केला.यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.अस्वलाने एका व्यक्तीचा पूर्ण चेहरा छिन्न- विच्छिन्न केलेला होता. यामुळे सदर अस्वल हा चीडलेल्या असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा 15 ते 20 फुटाच्या अंतरावरच अस्वलाचे जवळपास आठ महिन्याचे दोन पिल्लयांना कुणीतरी कुर्‍हाडीने वार करून ठार केल्याचे दिसून आले.आपल्या पिल्लयांच्या मृत्युने मादा अस्वलाने या दोघांना ठार करून आपल्या पिल्लयांचा बदला घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या पिल्लयांना कोणी व का मारले असेल हे सद्या स्पष्ट नाही. याप्रकरणी अकोट वन्य जीव विभागाच्या चमू ने घटनास्थळी पोहचून पंचनामा करून वन गुन्हा दाखल केला आहे.या परिसरातील नागरिकांना अस्वला पासून सतर्क राहण्याची सूचना वन्यजीव विभागाकडून देण्यात आली आहे.या प्रकरणी सोनाळा ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget