महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाउन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या काही समाज माध्यमांमध्ये आणि वाहिन्यांवर येत आहेत पण अशाप्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले मात्र स्वयंशिस्त पाळावीच लागेल गर्दी करणे आरोग्याला अपायकारक होईल असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.राज्यात पुन्हा लॉकडाऊन अशा बातम्या जनमानसात संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नये अशा गैरसमज आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे याची जाणीवही मुख्यमंत्र्यांनी करून दिली
स्वयं शिस्त पाळावी
बाहेर पडल्यावर कायम चेहर्याचा मास्क लावणे, साबणाने जंतुनाशक आणि हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवनपद्धती सर्वांनी स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगीकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Post a Comment