Latest Post

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे 57  वर्षीय  व्यक्तीचे कोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने लोणी खुर्द गाव 14 दिवसांसाठी म्हणजे 15/ 6/ 20 20पर्यंत पूर्णपणे लोक डाऊन करण्यात आले असल्याची माहिती  दाढ येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीपाद मैड व ग्रामविकास अधिकारी संतोष थिगळे यांनी दिली लोणी खुर्द येथील 57 वर्षीय व्यक्तीस त्रास जाणवू लागल्याने त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टर श्रीपाद मैड यांनी सांगितले या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोणी खुर्द ,दाढ ,आडगाव ,कोल्हार बुद्रुक येथील सतरा व्यक्तींना शिर्डी येथे विलगी करण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टर मैड व ग्राम विकास अधिकारी थिगळे यांनी सांगितले.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायतीच्या मासीक बैठकीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यामुळे सत्ताधार्यांनाच विरोधकाची भूमिका बजावण्याची वेळ आली असुन सत्ताधार्यांनीच कामाच्या बिला संदर्भात विरोध करण्याची ही पहीलीच वेळ आहे      तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बेलापूर गावची ग्रामपंचायत ओळखली जाते या पचांयतीत एकुण सदस्य संख्या १७ आहे सध्या पंचायतीत काँग्रेस व जनता अघाडीची सत्ता आहे दोघांनीही सरपंच पद आडीच आडीच वर्ष तसेच उपसरपंच पदही वाटून घेतले होते आडीच वर्ष जनता आघाडीचा सरपंच  होता त्यानंतर काँग्रेसच्या राधाताई बोंबले सरपंच  झाल्या बेलापूर ग्रामपंचायतीची मुदत आँगस्ट महीन्यात संपत असुन राजकीय वातावरण आत्ताच तापु लागले आहे बेलापूर ग्रामपंचायतीच्या बँक खात्याच्या पुस्तकाची तसेचा झालेल्या कामाची व अदा केलेल्या बिलाची माहीती अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी मागीतली होती त्यातच बेलापूर ग्रामपंचायतीची मासीक बैठक संपन्न झाली या बैठकीत सदस्यांना न विचारता अनेक कामे केल्याचे व बिलही अदा केल्याचे उघड झाले त्यामुळे उपसरपंच रविंद्र खटोड भरत साळुंके यांनीच बैठकीत विरोध नोंदवीला बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीवर कँमेरे बसविण्यात आले एकच काम असताना त्या कामाचे दोन बिल काढण्यात आले ५० हजार रुपयाच्या पुढे असणार्या काणाची ई निविदा करण्याचे आदेश असताना पाच सी सी टिव्ही कँमेर्याचे पहीले बिल ४९३२४ रुपये अदा केल्यानंतर दोनच महीन्यात पुन्हा ३९१४७ रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे तसेच संगणक  खरेदी करुन बराच कालावधी लोटला तरी तो संगणक पचांयतीत आला नव्हता परंतु खंडागळे यांनी लेखी माहीती मागताच खरेदी केलेला संगणक अचानक प्रगट झाला मग  ईतके दिवस तो संगणक कुठे होता असा प्रश्न सदस्यांना पडला बेलापूर ग्रामपंचायतीने अंगणवाडी करीता तीन लाख रुपयांची खेळणी खरेदी केली गावात एकुण १९ अंगणवाडी असाताना सहाच सेट खरेदी करण्यात आले असुन तीन लाख रुपयाची खरेदी केलेली खेळणी ग्रामपंचायत जागेत ठेवण्या ऐवजी एका खाजगी जागेत ठेवण्यात आली असुन या खेळण्याचे ई परचेस करण्या ऐवजी एका वर्तमान पत्रात जाहीरात छापुन ती खेळणी खरेदी करण्यात आली असुन या खरेदी बाबतही सदस्यांना काहीच माहीत नसल्याचे म्हणणे आहे शिवाय नियम डावलुन ही खरेदी करण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी )-महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बेलापूरच्या मुख्य चौकात असणार्या पुतळ्या भोवतीचे  सरंक्षण कठडे तोडून सहा महीने झाले परंतु ई निविदा न झाल्यामुळे  अजुनही त्या कामास सुरुवात झाली नाही या बाबत ग्रामपंचायतीस जाब विचारण्याची वेळ आली आहे        बेलापूरच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असुन या पुतळ्यास संरक्षक कठडे बसविण्यात आले होते परंतु  ग्रामपंचायतीने ते कठडे नविन  बसविण्याच्या नावाखाली जानेवारी महीन्यात तोडले  त्या ठिकाणी  नविन कठडे बसविण्याचा निर्णय घेतला तो निर्णय एकदम घाईत घेण्यात आला नविन संरक्षक कठडे त्याचा नकाशा त्यासाठी लागणारा निधी काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी या बाबींचा गांभीर्याने विचार न करता पुतळ्या भोवती असलेले संरक्षक कठडे तोडण्यात आले  त्यांनतर काही शिवप्रेमींनी सरपंच  उपसरपंच यांना या कामाबाबत सांगितले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनीही फेब्रुवारी महीन्यात ग्रामपंचायतीस लेखी निवेदन दिले त्या वेळेसे ग्रामविकास अधीकार्यांनी ई निविदा झाली नसुन या कामा करीता  निधी राखीव असल्याचे सांगितले  होते या नंतर कामास सुरुवात करण्यात आल्याचे भासविण्यात आले  अन निधी अभावी ते काम अर्धवटच सोडून देण्यात आले या ठिकाणाहून दररोज शेकडो जबाबदार नागरीक जातात परंतु कुणीही या बाबत ग्रामपंचायतीला साधा जाब विचारला नाही गावात अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली कामे चालू आहे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवतीचे संरक्षक कठडे तातडीने पूर्ण होणे आवश्यक  होते परंतु या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले जर पंचायतीकडे निधीच नव्हता तर ते कठडे का तोडले यास जबाबदार कोण जुने कठडे कुणाच्या परवानगीने तोडले ते तोडताना वेगवेगळ्या ठिकाणाहून निधी आणून काम तातडीने पूर्ण करु अशी ग्वाही ग्रामस्थांना देण्यात आली होती मग आता घोडे नेमके अडले कोठे  दुर्दैवाने काही घटना घडल्यास एखादे जनावर तेथे घुसल्यास  त्यास जबाबदार कोण राहणार असा सवाल शिवप्रेमी नागरीकाकडून विचारला जात आहे

बुलडाणा - 30 मे - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराच्या बर्डे प्लॉट येथील
एकाच कुटुंबातील 4 जणांचा  विद्युत ताराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार 30 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.या घटनेने संपूर्ण शहर हादरुन गेले आहे.
    मिळालेली माहिती अशी की आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास खामगांव येथील बर्डे प्लॉट भागातील राहणारे भुरू घासी पटेल (52),साजेदा बी भूरू पटेल (50),जावेद भूरू पटेल (25) व जाकिर भूरू पटेल (22) हे घरात असताना विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू त्यांचा मृत्यु झाला.सदर घटना आज संध्याकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.यातील जावेद याचे 7 जून तर जाकिर याचे 8 जूनला लग्न ठरलेले होते. एकाची सासरवाडी वाशिम तर दुसऱ्याची सासरवाडी खामगांव मधील असल्याची माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले आहेत.पंचनामा करुण चारही मृतदेह पोस्टमार्टम साठी सामान्य रुग्णालयात पाठविन्यात आले आहे.

बुलडाणा - 30 मे
बुलडाणा तालुक्यातील हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाह देशभरात प्रसिद्ध आहे.हजारो भक्त सैलानी येथे येतात.कोरोनामुळे 15 मार्च रोजीचा वार्षिक संदल उत्सव जिल्हा प्रशासनाने रद्द केला व पुढे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.सैलानी नगरीत अनेक भक्त अडकले.दरम्यान समाजिक बांधिलकी म्हणून मन्नत फाऊंडेशनने जवळपास 500 नागरीकांना प्रशासनाच्या मदतीने घरवापसीसाठी मोफत ई-पास  बनवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली आहे.
        सैलानी येथील मन्नत फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख साजेद शेख फारुक मुजावर हे लॉकडाऊनची घोषणा झाल्यापसुन सैलानी येथे अडकलेल्या भक्तांना मोफत किराणा किट,औषधी,कोरोना युद्धानना मास्क,सेनेटाइजर आदि मोफत वाटून अशा प्रकारे सामाजिक काम करत आहे.भारती गणेश भांडे रा.गंगाखेड,जिल्हा परभणी येथील एक अपंग महिला सैलानी  दर्गाह येथे दर्शनाला आली असता लॉकडाऊनमुळे सैलानी येथे काही महिन्या पासून अडकून होती.त्या महिले जवळ काहीच पैसे नव्हते ती कोणालाही मागून आपले पोट भरत होती,त्या महिलेची माहिती मिळताच बुलडाणाचे तहसीलदार संतोष शिंदे,रायपूरचे ठाणेदार सुभाष दुधाळ व बीट जमदार यशवंत तायडे,शेख कय्युम यांच्या मार्गदर्शनाखाली मन्नत  फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख साजिद शेख फारुक मुजावर  यांनी त्या महिलेला घरी जाण्यासाठी मोफत ई-पास बनुवून तिला स्वतःच्या कारने घरी गंगाखेड जि.परभणी येथे सोडून दिले.तसेच खाजगी गाडी करून आपापल्या घरी जाणाऱ्या अशा 500 पेक्षा जास्त लोकांना मोफत ट्रॅव्हल्स ई-पास बनवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली आहे.

टिळकनगर (वार्ताहर) रमजान ईदच्या दिवशी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम अन्सार पठाण या विवाहित तरुणाने पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतले होते. त्यात तो गंभीर भाजला होता. उपचारादरम्यान गुरुवारी चारच्या दरम्यान नदीमचा दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाईकांनी नदीमच्या मृत्यूची चौकशी करून मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, असा आक्रमक पवित्रा घेत मयत नदीमचा अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र आ. लहू कानडे यांच्या मध्यस्थीने व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या ठोस आश्वासनानंतर तब्बल 28 तासानंतर मयत नदीमचा अंत्यविधी कडेकोट पोलिस बंदोबस्तात काल रात्री नऊच्या दरम्यान करण्यात आला.आ.लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे अहमद जहागीरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, राहुरी पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद, रिपाईचे भिमराज बागुल, राजाभाऊ कापसे, सरपंच सुनील शिरसाठ, माजी उपसरपंच नानासाहेब शिंदे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, सागर भोसले, सरपंच चांगदेव ढोकचौळे, पोलीस पाटील सुनील गायकवाड, कृष्णा अभंग, प्रेमचंद कुंकलोळ, समाजवादी पार्टीचे जोएब जमादार, आदिल मखदुमी, बबलू शाह यांनी नदीमच्या घरी भेट देऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे लावून धरली.आ. कानडे यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत असमर्थता दाखविल्याने आ. कानडे आणि पोलीस प्रशासनाच्या या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरीत याबाबत जाब विचारला व त्यानंतर आ. कानडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना घटनेचे गांभीर्य समजावून सांगितले व घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ घटनास्थळी काही पोलीस अधिकार्‍यांचा ताफा पाठवून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांनी मयत नदीमच्या घरी भेट देत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचार्‍यांवर लगेचच कारवाई करण्याचे ठोस आश्वासन देत मयत नदीमच्या आईचा जवाब नोंदवून पुढील कारवाईस जलदगतीने सुरुवात केली.संध्याकाळी सहाच्या सुमारास मयत नदीमचा मृतदेह लोणी रुग्णालयातून आणण्यात आला. अंत्ययात्रेला सुरुवात होताच ज्या पोलीस चौकीसमोर मयत नदीमने स्वतःला पेटवून घेतले होते. त्याच ठिकाणी नातेवाईकांनी अंत्ययात्रा थांबवत मयत नदीमचा मृतदेह चौकीसमोर ठेऊन दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. काहींनी मध्यस्थी करित काही मिनिटातच अंत्ययात्रा पुढे नेत रांजणखोल येथील कब्रस्थान येथे अंत्यविधी करण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान संपूर्ण परिसरात पोलीस छावणीचे रूप आले होते.
नदीमचा श्वास थांबला तपास थांबू देऊ नका..!
याप्रकरणी टिळकनगर पोलीस चौकीच्या कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून स्वतःला पेटवून घेतल्याचा आरोप मयत नदीम यांच्या नातलगांनी केला आहे. एकुलता एक असलेला मयत नदीमच्या आईनी नदीमचा श्वास थांबला तपास थांबू देऊ नका..! अशी भावुक विनवणी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून या पोलीस कर्मचार्‍यास तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी नदीमच्या आईसह नातलगांनी केली.

शिर्डी : कोरोनाने शिर्डीत शिरकाव केला आहे़ निमगाव येथील कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या महिलेच्या शिर्डीतील नातेवाईक महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.शिर्डी व निमगावमधील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या सातवर पोहचली आहे. या महिलेच्या संपर्कातील २९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सायंकाळी निमगाव येथील एका भाजी विक्रेती महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या महिलेने शिर्डीतील संस्थान रूग्णालयात उपचार घेतले होते. शिर्डीतील एका नातेवाईकाच्या घरीही तिचे वास्तव्य होते. या महिलेच्या निमगावातील कुटूंबासह सर्वांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते. शुक्रवारी या महिलेच्या कुटूंबातील अन्य पाचजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. या महिलेची सून लहान मुलीसह शिर्डीतील नातेवाईकाकडे दोन ते तीन दिवसांपासून राहात होती. शुक्रवारी सुनेचा अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र लहान मुलीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने चिंता वाढली होती. त्यानंतर आज शिर्डीतील महिलेचा अहवालही पॉझिटीव्ह आला.प्रांताधिकारी गोंविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ प्रमोद म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक निरीक्षक दिपक गंधाले यांच्यासह वैद्यकीय टिमने सायंकाळी तातडीची बैठक आयोजित केली आहे.पुढील चौदा दिवस या महिलेच्या घराचा परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व व्यवहार व नागरीकांचा वावर बंद राहील. या बाजुचा परिसर बफर झोन असेल. या भागात झोन जाहीर करण्यात येणार आहे. या बफर झोनमध्येही चौदा दिवस ठराविक वेळत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे असे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget