बुलडाणा - 30 मे
बुलडाणा तालुक्यातील हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाह देशभरात प्रसिद्ध आहे.हजारो भक्त सैलानी येथे येतात.कोरोनामुळे 15 मार्च रोजीचा वार्षिक संदल उत्सव जिल्हा प्रशासनाने रद्द केला व पुढे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.सैलानी नगरीत अनेक भक्त अडकले.दरम्यान समाजिक बांधिलकी म्हणून मन्नत फाऊंडेशनने जवळपास 500 नागरीकांना प्रशासनाच्या मदतीने घरवापसीसाठी मोफत ई-पास बनवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली आहे.
सैलानी येथील मन्नत फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख साजेद शेख फारुक मुजावर हे लॉकडाऊनची घोषणा झाल्यापसुन सैलानी येथे अडकलेल्या भक्तांना मोफत किराणा किट,औषधी,कोरोना युद्धानना मास्क,सेनेटाइजर आदि मोफत वाटून अशा प्रकारे सामाजिक काम करत आहे.भारती गणेश भांडे रा.गंगाखेड,जिल्हा परभणी येथील एक अपंग महिला सैलानी दर्गाह येथे दर्शनाला आली असता लॉकडाऊनमुळे सैलानी येथे काही महिन्या पासून अडकून होती.त्या महिले जवळ काहीच पैसे नव्हते ती कोणालाही मागून आपले पोट भरत होती,त्या महिलेची माहिती मिळताच बुलडाणाचे तहसीलदार संतोष शिंदे,रायपूरचे ठाणेदार सुभाष दुधाळ व बीट जमदार यशवंत तायडे,शेख कय्युम यांच्या मार्गदर्शनाखाली मन्नत फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख साजिद शेख फारुक मुजावर यांनी त्या महिलेला घरी जाण्यासाठी मोफत ई-पास बनुवून तिला स्वतःच्या कारने घरी गंगाखेड जि.परभणी येथे सोडून दिले.तसेच खाजगी गाडी करून आपापल्या घरी जाणाऱ्या अशा 500 पेक्षा जास्त लोकांना मोफत ट्रॅव्हल्स ई-पास बनवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली आहे.
Post a Comment