Latest Post

शिर्डी( जय शर्मा)- कोरोणा पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातअटी  व शर्ती ठेवून नॉन रेड झोन जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेस काही ठिकाणाहून आजपासून धावणार होत्या ,मात्र शिर्डी या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या बसस्थानकात मात्र आज शुकशुकाट दिसत होता, येथून आज एकही बस बाहेर गेल्याचे व आल्याचे दुपार पर्यंत दिसत नव्हते, येथे फक्त एसटी महामंडळाचे कामगार व पोलीस दिसत होते, एवढ्या मोठ्या बसस्थानकात  प्रवासी मात्र एकही दिसत नव्हता , जिल्ह्यात आज बस सुरू झाल्या , शिर्डी सारख्या बसस्थानकातून ठराविक मार्गावर बसेस सोडणार होते, मात्र  या बस स्थानकात प्रवासी फिरकले नाही ,शिर्डी बस स्थानक हे नेहमी साई भक्तांनी गजबजलेले असते, मात्र श्री साईबाबांचे मंदिर बंद असल्यामुळे साईभक्त येणे ,जाणे बंद आहे प्रवासी  व साई भक्तच नाही तर बस सोडून करणार काय । प्रवासी नसल्यामुळे हे बस स्थानक शांत शांत दिसूनयेत होते, ,आज बसेस सोडण्यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी  संपूर्ण तयारी करण्यात आली होती ,कोपरगाव, संगमनेर श्रीरामपूर आगारातून बसेस सोडण्यात आल्या, शिर्डीतून ही बसेस सोडण्यासाठी तयारी झाली होती मात्र दुपारपर्यंत येथे प्रवासी फिरकले नसल्यामुळे येथून एकही बस येथून दुसरीकडे धावली नाही, राहता तालुका कोरोणा मुक्त आहे, राहता तालुक्यातील शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अांतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, लॉकडाउनच्या पूर्वी एसटी महामंडळाला, कोपरगाव आगाराला सर्वात जास्त उत्पन्न शिर्डी बसस्थानकातील प्रवाशांमुळे मिळते, कारण शिर्डीहून अनेक ठिकाणी,अनेक बसेस जातात, येतात,लॉकडाउनकाळातही शिर्डीतून परप्रांतीयांना जाण्यासाठी काही बसेस सोडण्यात आल्या होत्या, शिर्डीचे  आंतरराष्ट्रीय बस स्थानक यापूर्वी सनेंटायझर करण्यात आले आहे,  सर्व सुविधा व सुसज्ज असेहे बसस्थानक आहे ,असे असतानाही आज हे बस स्थानक सामसूम दिसत होते, नेहमी गजबजलेले हे बस स्थानक लॉकडाउन काळात शांत।तर होतेच मात्र आज बस सुरू झाल्या पण श्रीसाई मंदिर बंद असल्यामुळे व प्रवासी नसल्यामुळे आजही हे बस स्थानक नेहमीप्रमाणे गजबजले  दिसत नव्हते, शांत शांत वाटत होते, जोपर्यंत श्री साईबाबांचे मंदिर सुरू होत नाही व साईभक्त येथे येणे सुरू होत नाही तोपर्यंत शिर्डीचे बसस्थानक असेच शांत शांत दिसणार आहे ,येथे प्रवासी किरकोळ प्रवास करू शकतात मात्र नेहमीसारखे साईभक्तांनी गर्दीने गजबजलेले हे बसस्थानक सध्यातरी श्री साईं चे मंदिर उघडेपर्यंत तसे गजबजलेले दिसणार नसल्याचे शिर्डीकर बोलत आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन सुरू असून शिर्डीत श्री साईबाबा मंदिर साई संस्थान ने  दर्शनासाठी बंद केले आहे, तसेच काही कामगारांना सुट्ट्या देण्यात आले आहेत, या लॉकडाउनच्या दोन महिन्याच्या कालावधीत, मार्च महिन्यापासून कामगारांना पगार नव्हते .गेल्या काही दिवसातच कायम कामगारांना पगार देण्यात आले मात्र आऊटसोर्सिंग कामगारांना पगार नाहीत .असे असताना श्री साईबाबा संस्थानने मोठी रक्कम देऊन शिर्डी जवळील रुई शिवारात जमीन खरेदी केली आहे ,जर लॉकडाउनच्या दरम्यान साईबाबा संस्थानला देणगी रूपात येणारे उत्पन्न कमी झाले आहे व कामगारांचा पगार एफडी मोडून करावा लागत आहे तर मग या लॉक डाऊन च्या काळात साईबाबा संस्थानने मोठी रक्कम देऊन जमीन खरेदीचा आटापिटा का केला। असा सवाल कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
 संजय काळे यांनी म्हटले आहे की  श्री साईबाबा संस्थाननै 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे, त्यामुळे येथे साईभक्त येणे व रोख देणगीचे प्रमाणही ही पूर्ण बंद झाल्या असून ऑनलाईन देणगी थोड्याफार प्रमाणात मिळत आहे, याचे कारण दाखवून साई संस्थानने आपली एफडी मोडून गेल्या दोन महिन्यात चा पगार गेल्या काही दिवसात कायम कामगारांना दिला आहे, अजून आऊटसोर्सिंग कामगार बाकी आहेत ,असे असताना ,देणगी कमी असताना साई संस्थानने रुई शिवारातील दर्यानानी यांची जमीन यापूर्वी देऊ केलेली असतानाही त्यांनी खरेदी केली नाही, त्यांनी काही जमीन देणगीदाखल दिली असून काही जमीन खरेदी करण्यासाठी संस्थांनला शासनाने परवानगी दिली होती, मात्रसन 2018 पासून ही जमीन संस्थांनी खरेदी केली नाही ,मात्र लॉकडाउनच्या दरम्यान ही जमीन खरेदी करण्यात आली, जमीन खरेदी करताना किंवा कोणताही व्यवहार करताना उच्च न्यायालयाची  संस्थांनला परवानगी।घ्यावी लागते, साई संस्थानने संस्थांनच्या कामगारांचा 40% पगार कपात करण्याचे निर्णय घेतला आहे ,तसेच तिरुपतीच्या धर्तीवर कामगार कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे, मात्र उच्च न्यायालयाची त्यासाठी परवानगी नाही ,उच्च न्यायालय म्हणते पगार द्या आणि संस्थान उलट पगार कपात करीत आहे ,हा उच्च न्यायालयाचा अपमान आहे, उच्च न्यायालयात त्यासंबंधी कोणताही अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे संस्थान उच्च न्यायालयाचा अपमान करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, जर या खरेदी केलेल्या जमिनीपासून एक हजार फुटावर असणाऱ्या तुरकणे यांची जमीन लोकडाउन अगोदर सहा महिने पूर्वी आता संस्थांननी घेतलेल्या खरेदी भावाच्या निम्म्या पटीने विकली जाती , मात्र संस्थानलॉकडाउन काळात गरज नसताना डबल पैसे देऊन सुमारे १४ कोटी ला ही जमीन खरेदी करते, एवढा आटापिटा कशासाठी संस्थान करत आहे ,शिवाय कामगारांना पगार देण्यासाठी एफडी मोडुन पगार।करावा लागतो, कामगारांचा 40% पगार  कपात करावा लागतो तर मग जमीन खरेदी करण्याची सध्यातरी आवश्यकता काय होती।। असा सवाल करत हा उच्च न्यायालयाचा तात्पुरते नेमलेल्या विश्वस्तांनी जणू अपमानच केला असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याने या गोष्टीचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी  या सर्व गोष्टींची उच्च न्यायालयाने चौकशी करावी तसेच विधी व न्याय खात्याने ही चौकशी  करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)-कोव्हिड१९ विरुद्ध अहोरात्र लढणाऱ्या देश विदेशातील कोरोना योध्द्यांना  आणखी  स्फूर्ती मिळण्यासाठी तसेच कोरोनाचा  लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना प्रार्थना करत राहाता तालुक्यातील हजारो साई भक्तांनी आज दि,२१मेला दुसर्‍या गुरुवारीही   तालुक्यातील गावागावातील घराघरात कुटुंबासहित सामूहिक श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करत व सामूहिक घरात आरती करत श्री साईबाबांकडे साकडे घातले,  या उपक्रमात  राहता तालुक्यातील मोठ्या संख्येने साई भक्त व हजारो कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते, त्यास साईभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला,
जगातील सर्वच देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजला असून दररोज देशात, जगात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, अशा कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल, अधिकारी-कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी,प्रत्रकार, प्रशासन व प्रत्येक जण आपापल्या परीने अहोरात्र काम करीत आहे, असे कोरोनावॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला हटवण्यासाठी लढा देत आहेत, रुग्णांची सेवा करीत आहेत,यालॉकडाउन काळात सर्वसामान्य गोरगरीब व सर्व नागरिक घराघरात आहेत, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत ,सुविधा पुरवीत आहेत, अशा सर्वाना  पूर्ती मिळावी मिळावी, त्यांचे कौतुक अभिनंदन व्हावे, म्हणून व या देशातून, जगातून कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना आज गुरुवार दि,२१मे रोजी साकडे घालण्यात आलेआहे, शिर्डी येथील श्री साई निर्माण ग्रुप द्वारकामाई प्रतिष्ठान, श्री साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्यावतीने आज गुरुवार दिनांक२१ मे रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत राहाता तालुक्यातील प्रत्येक घराघरात श्री मंगलाचरण, श्री साईस्तवनमंजरी व लकी ड्रॉ द्वारे निघालेल्या अध्यायाचे वाचन आपल्या घरात राहून देवघरासमोर किंवा श्री साईंच्या प्रतिमेसमोर मनोभावे करून सामूहिक श्री साईचरित्र पारायण  घराघरात करण्यात आले, लॉकडाऊन चे नियम पाळत प्रत्येकाने आपापल्या घरात श्री साईचरित्र पारायण यांचे वाचन करून श्री साईबाबांची प्रार्थना करत कोरोनाला हटवण्या साठी साईबाबांकडे साकडे घातले, या धार्मिक उपक्रमाला मागील गुरुवारी 14 मेला शिर्डी व परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला,होता, असाच मोठा प्रतिसाद आज गुरुवारी 21 मेला राहता तालुक्यातून गावागावातून मोठ्याप्रमाणात मिळाला आहे, तसेच पुढच्या गुरुवारी२८ मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात असे सामूहिक पारायण घराघरात राबविण्यात येणार आहे, साईचरित्र पारायणा चा तिसरा टप्पा गुरुवार दिनांक 28 मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील ,प्रत्येक गावागावात होणारअसुन , त्यानंतर ४जूनला संपूर्ण देशात  व त्यानंतर पुढच्या गुरुवारी११जुनला संपूर्ण जगातील साईभक्त  असे घरात राहून  श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करणार आहेत  ,हा एक  मोठा उपक्रम  राबविण्यात येत असून सर्वांनी मोठ्या संख्येने या धर्मीक उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान  साई निर्माण ग्रुप ,साई संदेश प्रतिष्ठान व द्वारकामाई प्रतिष्ठानने केले आहे .

शिर्डी (जय शर्मा)-कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन सुरू असून शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थान मध्ये तात्पुरत्या स्वरूपातील आऊटसोर्सिंगमध्ये काम करणारे कामगार अद्यापही पगाराविना आहेत, या काळातला त्यांना पगार झालेला नाही, त्यामुळे या गरीब ,सर्वसामान्य कुटुंबातील कामगारांना आता उपासमारीची वेळ आली असून साई संस्थानने या आऊटसोर्सिंग कामगारांना त्वरित पगार करावेत अशी मागणी आता या कामगारांकडून होऊ लागली आहे,
 लॉक डाऊन मुळे श्री साईबाबा संस्थानने श्रीसाईमंदिर बंद केल्यामुळे व साईभक्त येथे येणे बंद असल्यामुळे तसेच येथे गर्दी होऊ नये म्हणून काही कामगारांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, मात्र स्वच्छता वॉचमेन, पुजारी व काही कामगारांना  ड्युटी देण्यात आले आहेत, आऊटसोर्सिंगचे कामगार काही घरी आहेत ,तर ड्युटीवर आहेत ,याकाळात आर्थिक टंचाई सर्वांनाच बसत आहे, त्यात गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील साई संस्थांमध्ये काम करणारे आउटसोर्सिंगचे हे कामगार यांनाही या काळात पगार झालेला नाही, गेल्या दोन-अडीच महिन्यापासून पगार नसल्याने ह्या कामगारावर व,त्याच्या कुटुंबावर आता उपाशी राहण्याची वेळ  आली आहे, यापुढे साई संस्थानने जसे कायम कामगारांना पगार केलेत तसेच आउटसोर्सिंग च्या या कामगारांना पगार करावेत, अशी मागणी या कामगारांकडून होत आहे, अन्यथा या   आउटसोर्सिंग कामगारांमधील काही कामगार आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत, तरी या सर्व गोष्टींचा विचार करून साईबाबा संस्थानने या आऊटसोर्सिंग कामगारांचे पगार द्यावेत, अशी मागणी आता या कामगाराबरोबर त्यांच्या कुटुंबीय व तसेच शिर्डीकर  व साईभक्तांमधूनही होऊ लागली आहे.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )दि. २१- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु. आगामी काळात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
          पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाटी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
          पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या आपल्याकडे कोरोना वाधित ६८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आगामी काळात कोरोना रुग्ण सापडले नाहीत, तर आपण ०१ जून रोजी कोरोनामुक्त होऊ. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता.  मे महिन्यात बाहेरुन येणार्‍या नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
          लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना परत त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगला पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ३० हजार नागरिकांपैकी २३ हजारांपेक्षा अधिक मजूर, कामगार, भाविक, विद्यार्थी त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत १० विशेष श्रमिक रेल्वेमार्फत त्यांना रवाना करण्यात आले आहे. आणखी ०६ रेल्वेद्वारे उर्वरित नागरिकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात येणार आहे. याशिवाय, परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून १६ हजार नागरिक आपल्या जिल्ह्यात परत आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
          जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी कौतुक केले.
     यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या विविध सामाजिक योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावाही घेतला. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन अशा विशेष साहाय्य योजनेतील १ लाख ६२ हजार १४८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
          जिल्ह्यातील मोठ्या धरणांत सध्या ३६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा२४ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हयात सध्या २१ शासकीय आणि ६१ खाजगी टॅंकरद्वारे ७२ गावे आणि २९१ वाड्यांना पाणीपुरवठा होत असून टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या २०६९ कामे सुरु असून त्यावर १० हजार ३१० मजूर कामांवर असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
          जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यातील ८३ टक्के धान्याचे वाटप पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रतिमाह अर्धा किलो चणाडाळ आणि अर्धा किलो तूरडाळ वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा)सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे, अशा लॉक डाऊन च्या काळात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये राहता व कोपरगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना व व दोन्ही तालुक्यातील मौलानाना पोलिसांनी बोलावून रमजान ईद निमित्त बैठक घेतली, मात्र या बैठकीला सुमारे शंभर ते दीडशे मुस्लीम बांधव उपस्थित होते पोलिसांनी लॉक डाऊन चे नियम तोडत पोलीस स्टेशन आवारात गर्दी जमवली, हे लॉक डाऊन चे नियम पायदळी तुडवल्या यासारखे असून यावेळी कोणतेही सोशल डिस्टंन्स पाळण्यात आले नाही ,शिवाय अनेकांनी मास्क वापरलेले नव्हते, विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लॉक डाऊन चा नियम दाखवणारे पोलीस मात्र आपल्याच आवारात ईदनिमित्त मुस्लिम बांधवांची बैठक बोलावतात व या बैठकीला गर्दी होत असताना शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे मार्गदर्शन करतात, इतर पोलिस अधिकारीही  हे सर्व पाहतात पण कोणीही नियमाचे पालन करण्यासाठी दक्षता घेत नाही,येथे कोणताही नियम पाळला जात नव्हते, तसेच पत्रकारांनाही आत मध्ये येण्यास मज्जाव करण्यात येत होता, अहमदनगर जिल्हा नॉन रेड झोन मध्ये जरी असला व। शिर्डीजरी  कोरोणा मुक्त असली तरी कोरोणा चा प्रादुर्भाव किंवा संसर्ग अशा  गर्दीच्या बैठकांमुळे होण्याची दाट शक्यता असल्याने हे टाळणे गरजेचे होते परंतु कुंपणच शेत खात असले तरी यावर सर्वसामान्य काय करणार। पोलिसांनी यावेळी गर्दी सांगणे गरजेचे होते मात्र पोलीस यंत्रणाही यावेळी कुचकामी ठरली गेली, नियम व कायदा सर्वांना सारखाच आहे ,त्यामुळे लॉकडाउन चे नियम व कायदे मोडणाऱ्या सर्वांची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी त्वरित चौकशी करून कारवाई करावी व ज्यांनी लॉकडाउनचे  नियम मोडले आहेत, ज्यांनी ही बैठक बोलावली व सोशल डिस्टंन्स न पाळता  नियम मोडले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शिर्डी मधून होत आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने जाहीर केलेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये झाल्याने जिल्ह्यात अनेक सुविधा, बाबींना शुक्रवार (दि.22) पासून जिल्हा प्रशासनाने नव्याने परवानगी दिली आहे. त्यात प्रामुख्याने सर्व बाजारपेठा, दुकाने उघडण्यास, तसेच रिक्षा, टॅक्सी, जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलूनही सुरू होणार असून विवाह, अंत्यविधीला 50 लोक उपस्थित राहू शकतात, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. मात्र, दररोज सायंकाळी 7 ते सकाळी सातपर्यंत सक्तीने सर्व बंद ठेवण्यात येणार असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनमधील जिल्हे घोषित केले असून त्यात नगर जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी बुधवारी जिल्ह्यात कोणत्या बाबी सुरू राहतील व कोणत्या बाबींना प्रतिबंध असेल याबाबत आदेश काढले. त्यात प्रामुख्याने कंटेन्मेंट झोन (ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळले) वगळता आतापर्यंत बंद असलेल्या बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. याशिवाय सर्व दुकानेही उघडतील. मात्र, याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असेल.अत्यावश्यक सेवेची दुकाने (मेडिकल, पेट्रोलपंप, एटीएम) मात्र त्यांच्या निर्धारित वेळेत सुरू राहतील. दुकानांत गर्दी झाल्याचे आढळल्यास दुकाने त्वरित बंद केली जातील. क्रीडा संकुले, तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या होतील. मात्र प्रेक्षक व सार्वजनिक जमावास बंदी असेल. सर्व खासगी व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी असेल. मात्र दुचाकीवर केवळ एकचजण प्रवास करेल. तीन चाकीवर तीन, तर चार चाकीतही तिघांनाच परवानगी असेल. जिल्हांतर्गत बस सेवेला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह व शारिरिक अंतर ठेवून व स्वच्छताविषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.
144 कलम कायम-जिल्ह्यात अनेक व्यवहारांना परवानगी दिलेली असली तरी कलम 144 अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. याचा भंग करणार्‍यावर कडक करवाईचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.
सातच्या आत घरात-अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर, फिरण्यास सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत निर्बंध राहतील. सर्व सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानांत ग्राहकांमध्ये 6 फुटांचे अंतर राखावे व पाच पेक्षा जास्त ग्राहक एका ठिकाणी नसावेत, असे आदेशात म्हटले आहे.
थुंकणार्‍यावर होणार दंड-सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कामाचे ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वा कामाचे ठिकाणी थुंकणार्‍यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी. सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकी दरम्यान सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आदेश दिले आहेत.
 हे सुरू करण्यास परवानगी-सलून दुकाने, हॉस्पिटल, क्लिनिक, बाह्यरुग्ण तपासणी, टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी वाहने (चालकासह तिघे), दुचाकी (केवळ चालक), जिल्हांतर्गत बससेवा, मालवाहतूक, उद्योग, बांधकामे, शहरातील व ग्रामीणमधील सर्व दुकाने, बाजारपेठा, ई-कॉमर्सद्वारे वस्तूपुरवठा, खासगी कार्यालये, शासकीय कार्यालये (100 टक्के), कृषीविषयक कामे, बँका आणि वित्तीय सेवा, टपाल व कुरिअर सेवा, तातडीच्या वैद्यकीय कारणासाठी प्रवास, कटिंग, सलून, स्पा, ब्यूटीपार्लर, स्टेडियम (प्रेक्षकांशिवाय), रेस्टॉरंट (केवळ होम डिलीवरीकरिता), बसस्थानक, रेल्वेस्थानकवरील कॅन्टीन, दुय्यम निबंधक कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, विवाह समारंभ, अंत्यविधी (केवळ 50 व्यक्तींच्या मर्यादेत).
 हे मात्र बंदच-विमान, रेल्वे, मेट्रो वाहतूक, आंतरराज्य रस्ते मार्गाने प्रवास, आंतरजिल्हा बससेवा, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मॉल्स, धार्मिक स्थळे व मोठ्या गर्दीची ठिकाणे, आठवडे बाजार बंद राहणार. 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षांखालील मुले व गरोदर स्त्रिया यांना घराबाहेर पडता येणार नाही. तथापी बस स्थानक, रेल्वे स्टेशन व विमानतळ येथील कॅन्टीन सुरू ठेवता येतील. केवळ घरपोहच डिलीवरीसाठी रेस्टॉरंटचे किचन सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget