शिर्डी (जय शर्मा)-कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन सुरू असून शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थान मध्ये तात्पुरत्या स्वरूपातील आऊटसोर्सिंगमध्ये काम करणारे कामगार अद्यापही पगाराविना आहेत, या काळातला त्यांना पगार झालेला नाही, त्यामुळे या गरीब ,सर्वसामान्य कुटुंबातील कामगारांना आता उपासमारीची वेळ आली असून साई संस्थानने या आऊटसोर्सिंग कामगारांना त्वरित पगार करावेत अशी मागणी आता या कामगारांकडून होऊ लागली आहे,
लॉक डाऊन मुळे श्री साईबाबा संस्थानने श्रीसाईमंदिर बंद केल्यामुळे व साईभक्त येथे येणे बंद असल्यामुळे तसेच येथे गर्दी होऊ नये म्हणून काही कामगारांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, मात्र स्वच्छता वॉचमेन, पुजारी व काही कामगारांना ड्युटी देण्यात आले आहेत, आऊटसोर्सिंगचे कामगार काही घरी आहेत ,तर ड्युटीवर आहेत ,याकाळात आर्थिक टंचाई सर्वांनाच बसत आहे, त्यात गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील साई संस्थांमध्ये काम करणारे आउटसोर्सिंगचे हे कामगार यांनाही या काळात पगार झालेला नाही, गेल्या दोन-अडीच महिन्यापासून पगार नसल्याने ह्या कामगारावर व,त्याच्या कुटुंबावर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे, यापुढे साई संस्थानने जसे कायम कामगारांना पगार केलेत तसेच आउटसोर्सिंग च्या या कामगारांना पगार करावेत, अशी मागणी या कामगारांकडून होत आहे, अन्यथा या आउटसोर्सिंग कामगारांमधील काही कामगार आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत, तरी या सर्व गोष्टींचा विचार करून साईबाबा संस्थानने या आऊटसोर्सिंग कामगारांचे पगार द्यावेत, अशी मागणी आता या कामगाराबरोबर त्यांच्या कुटुंबीय व तसेच शिर्डीकर व साईभक्तांमधूनही होऊ लागली आहे.
Post a Comment