Latest Post

♦पोकलैंड व 3 टिप्पर जप्त
🔹ठेकेदाराला 14 लाखचा दंड
बुलडाणा - 17 मे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वात अगोदर पैनगंगा नदीतील मुरुम,दगड खोदुन बुलडाणा-अजिंठा महामार्गाच्या कामात उपयोगी आना असे आदेश देऊन पैनगंगा नदीचे खोलिकरणच्या या कामाला त्यांनी आपले "पायलेट प्रोजेक्ट" म्हणून देशभरात प्रसिद्धि दिली मात्र या कामात प्रशासनच अडसर बनत असल्याची धक्कादायकबाब समोर आली असून देऊळघाट जवळ नदीचे खोलीकरणाचे काम थांबवून महामार्ग ठेकेदाराचे 3 टिप्पर व पोकलैंड बुलडाणा तहसीलदार यांच्या चमुने जप्त केल्याने त्यांनी एका प्रकारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना चैलेंज दिल्याची चर्चा महसूल प्रशासनात सुरु आहे.
     बुलडाणाचे तात्कालीन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेला हो म्हणत रास्ते व महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नदी,नाले,लहान कट्टे,धरण यातील मुरुम,दगड खोदुन सदर मटेरियल महामार्गाच्या कामी उपयोगी आणून या कामात लागणारा शासनाचा पैशा वाचवण्यासाठी खोलिकरणच्या कामांना प्राथमिकतेने करण्याचे निर्देश देशभरात दिले,जेणे करुण शासनाचे कोट्यावधी पैशेही वाचनार व पाणी पातळीही वाढणार.मागील दोन वर्षात पैनगंगा नदीचे मढ,पाडळी,दत्तपुर,कोलवड शिवारात खोलीकरण करण्यात आले.यावर्षी देऊळघाट जवळ मार्गाचा काम सुरु असल्याने संबंधित ठेकेदाराने गावा जवळ नादिखोलीकरण सुरु करूण मटेरियल मार्गाच्या कामासाठी नेन्यास सुरुवात केली मात्र शुक्रवारी दुपारी देऊळघाट नजीक पैनगंगा नदीतून अवैध मुरुमाचे उत्खनन सुरु असल्याची माहिती तहसीलदार संतोष शिंदे यांना कोणीतरी दिली. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन विचारपूस केली असता सुनील हायटेक कंपनीकडून बुलडाणा-अजिंठा महामार्गाच्या कामासाठी नदीतुन हे मुरुम उत्खनन सुरु असून त्यांनी काही पावती पुस्तक सुद्धा दाखविले व दत्तपूर येथे उत्खननाबाबत 2018 चा जिल्हाधिका-यांचा आदेश दाखविला.महसूल विभागा प्रमाणे आवश्यक कागदपत्रे आढळली नसल्याने 3 टिप्पर व एक पोकलैंड जप्त करून टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत.अवैध उत्खनन प्रकरणी संबंधित ठेकेदाराला 14 लाख दंड करण्यात आला आहे.एकीकडे मा. नितिन गडकरी यांच्या पैनगंगा नदी खोलिकरणच्या या "पायलेट प्रोजेकट" च्या नावा खाली बुलडाणा जिल्हा प्रशासनाने आपले उदो-उदो करुण घेतले व ज्या देऊळघाट गावाजवळ नदीचे खोलिकरण होऊन जमिनीतील जल पातळी वाढने गरजेचे असतांना त्या ठिकाणचे कामाला अवैध दाखवून अशा प्रकारे थांबविण्यात आल्याने गावकरी नाराज झाले आहेत.

नियम व अटींचे पालन न केल्याचे कारण, तहसीलदार प्रशांत पाटील यांचा आदेश.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील व्यवसाय सुरू करण्यात आले. परंतु व्यावसायिक व नागरिकांतून सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. अनावश्यक गर्दी केली. त्यामुळे सोमवार दि. 18 मे पासून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांना दिले. सदर आदेशाचे पालन करत मुख्याधिकारी समीर शेख यांनी सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद राहतील असे, जाहीर केले आहे.प्रशासनाने नियम व अटी घालून देऊन मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ खुली झाली होती. मात्र, बाजारपेठ खुली झाल्यानंतर व्यवसायिक व नागरिक यांच्याकडून नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या कालावधीनंतर लॉकडाऊनमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी सातत्याने केली होती. त्यास प्रतिसाद देत प्रशासनाने दि. 13 मे पासून काही नियम घालून देऊन बाजारपेठ खुली केली होती.
यावेळी दुकानदारांनी व पालिका प्रशासनाने गर्दीचे व इतर नियम पाळणे अपेक्षीत होते. मात्र तसे न झाल्याने शेवटी बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे.याबाबत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीत लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन झाले. त्यामुळे तालुक्यात करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तथापि शासनाच्या सुधारीत आदेशानुसार आर्थिक उलाढाली सुरू होणे आवश्यक असल्याने सोशल डिस्टन्सिंग अबाधित राहून शासनाच्या आदेशाच्या अधीन राहून इतर दुकाने उघडण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण शहरातील दुकाने सुरू करण्याचा आदेश दिला, मात्र मागील तीन दिवसांत असे निदर्शनास आले आहे, की गावातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहेत.तसेच दुकानांसमोर ग्राहकांचे सोशल डिस्टन्सिंग राखण्यात दुकानदारांना पालिका प्रशासनाला मर्यादा येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दीर्घकाळ रोखून ठेवलेला करोना विषाणूचा प्रादूर्भाव श्रीरामपूर शहरात व तालुक्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याने बाजारपेठेतील दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद करावी.तहसीलदारांचा हा आदेश मिळताच मुख्याधिकारी समीर शेख यांनी तत्काळ त्याची अंमलबजावणी करत श्रीरामपूर सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन तसे पत्रक पसिध्दी दिले आहे.
अन्यथा कारवाई होणार
सोमवार दि. 18 मे पासून श्रीरामपूर शहरातील जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करून कोणी दुकाने सुरू ठेवल्यास भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोगप्रतिबंधात्मक कायदा 1897 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

 अहमदनगर दि.१६: राहाता येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून लुटमार करणारे ४ गुन्हेगारांना दोन गावठी कट्टे व ७ जिवंत काडतुसासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी आरोपी किरण सोनवणे याच्यावर एकूण ३५ गुन्हे तर विकी चावरे याच्यावर ६ गुन्हे दाखल असून, याबाबत अधिक चौकशी करून पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली. यावेळी श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार आदी उपस्थित होते.पकडण्यात आलेल्या मध्ये किरण उर्फ अँन्थोनी छगन सोनवणे
( वय ३२, रा.पेठरोड,आरटीओ आँफिसजवळ, अश्र्वमेघनगर, नाशिक), बाबासाहेब शिवाजी पगारे (वय २०, रा.शिंगवे, ता.राहाता), विकी विष्णु चावरे (वय २९, रा.खंडोबागल्ली, राहाता) अशी नावे आहेत. या आरोपींकडून ५० हजार रु.च्या दोन गावठी कट्टे, १ हजार ४०० रु. सात जिवंत काडतुसे व एक रिकामी पुंगळी, ३८ हजार रु.वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, ४० हजार रु.चे शाईन मोटारसायकल (एमएच १५, जीएन ८५२७), ४० हजार रु.चे पल्सर (एमएच २०, एडडब्लु ७७७२) असा एकूण १ लाख ६९ हजार ४०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि.१५ मे ला सायंकाळी ५.३० वा.सुमारास कँनाँलच्या बाजूने मोटारसायकलने घरी जात होते. यावेळी आरोपींनी मोटारसायकल आडवी लावून मारहाण करुन बंदुकीचा धाक दाखवून जवळील पैसे बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरडा केल्याने आजुबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी लोकांचा जमाव पाहून आरोपींनी हवेत गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमलेल्या लोकांनी आरोपीचा पाठलाग करून एकास (आरोपी नारायण रामचंद्र म्हस्के वय २५, रा.विश्रांतवाडी, भिमनगर,पुणे) पकडले. उर्वरित आरोपी शेतामध्ये पळून गेले. पकडलेल्या आरोपीसह गावकऱ्यांनी राहाता पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची विकास पोपट ताठे यांनी फिर्याद दिली होती. या घटनेचे गांभीर्या ओळखून श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली. पळलेल्या आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके शोधार्थ पाठविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार शिंगवे येथे जाऊन सापळा लावून मुख्य आरोपी किरण सोनवणे याला पकडले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच, अनिल शिंदे, बाबासाहेब पगारे, विकी चावरे असे मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या माहितीवरुन आरोपी शिंदे,पगारे, चावरे याना पकडून त्याच्याकडील दोन गावठी कट्ट्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींपैकी किरण सोनवणे याच्यावर अनेक गंभीर ३५ गुन्हे नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर आरोपी विकी चावरे याच्यावर राहाता, लोणी पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत. या पकडण्यात आलेल्या आरोपींची अधिक चौकशी करण्यात येणार आहे. त्यादष्टीने पुढील तपास करण्यात येणार असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने या वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, पथकातील पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ मनोहर गोसावी, दत्ता हिंगडे, पोना शंकर चौधरी, आण्णा पवार, रविंद्र कर्डीले, भागीनाथ पंचमुख, सुनील चव्हाण, सुरेश माळी, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आडबल, विशाल दळवी, योगेश सातपुते, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे, बबन बेरड, भरत बुधवंत आदिंच्या पथकाने ही महत्त्वाची कारवाई केली.

अहमदनगर : शहरातील नगर-पुणे रोड वरील हॉटेल फरहतच्या शेजारी असलेल्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.उसवाल इंपिरियल चव्हाण व सेंथॉल अस्तनदूर काळे (रा.दोघे कुरणवस्ती, वाळूंज, ता. नगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी ३० एप्रिल रोजी रात्री बँकेच्या शाखेत घुसून आलाराम व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक विजयकुमार देवकरण वाडबुदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानंतर या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात नगर तालुका, कोतवाली, पारनेर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

कोरोनाच्या तिसर्या टप्यात काही ठिकाणी वाईन शॉपला अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली असली तरी काही ठिकाणी शोषलं डिस्टन्स चा फज्जा उडाल्यामुळे अनेक ठिकाणी वाईन शॉप बंद करून वाईन शॉप मालकावर गुन्हे दाखल झालेले उदहारण ताजे असतांना मात्र श्रीरामपूर येथे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेले महाराष्ट्र वाईन शॉपवर प्रचंड गर्दी जमलेली आहे तेथे
बाउंसरही असतांना गर्दी होत आहे कुठलेही शोषलं डिस्टन्स नाही व काही मद्य खरेदीला  आलेल्या काही लोकांनी माक्स हि घातलेले दिसत नाहीत विशेष म्हणजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे आणि मुख्य रस्त्यावर हे वाईन शॉप आहे त्या रोड वरून अनेक अधिकारी यांचे येणे जाणे आहे असे असतांना कोणी का दाखल घेत नाही अशे श्रीरामपूर येथील जागरूक नागरिक बोलत आहेत श्रीरामपुरात एकूण पाच वाईन शॉप आहेत परंतु दिशेच्या वादामुळे शहरात एकमेव हे वाईन शॉप चालू असल्याने येथे प्रचंड गर्दी जमली आहे आणि वाईन शॉप मालकाने येथे बाउन्सर ठेवूनही मद्य घेणारे कुठलेही नियम अटींचे पालन करीत नाही अशी परिस्तिथी सर्व श्रीरामपूरकर बघत आहेत यावर कोणी दखल घेईल का अशी चर्चा ही  रंगत  आहे जर अशीच परिस्तिथी राहिलीतर मोठी घटनाही घडण्याचे धोखे निर्माण होतील अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे यावर लवकरात लवकर शासनाने लक्ष घालावे हि मागणी जोर धरू लागली आहे.



* रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ 9 लाख 47 हजार 700 रुपये अदा केले शासनाने
* राहाता, संगमनेर व कोपरगांव तालुक्यातील कामगार
* वैद्यकीय तपासणी करुन प्रशासनाने पुरविल्या विविध सुविधा
 * साईनगर शिर्डी येथून चौथी रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना
            शिर्डी,प्रतिनिधी जय शर्मा: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील उत्तर प्रदेश राज्यातील 1519 कामगार व त्यांचे कुटुंबिय आज साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हयाकडे रवाना झाले. यापैकी 1 हजार 404 प्रौढ कामगारांचे रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ रुपये 675 प्रमाणे एकूण 9 लाख 47 हजार 700 एवढे भाडे महाराष्ट्र शासनातर्फे अदा करण्यात आले आहे. रोजगारानिमित्त हे सर्व जण उपरोक्त तीन तालुक्यातंत वास्तव्यास होते. या कामगारांना उत्तर प्रदेशातील उन्नाव, सीतापूर व बस्ती येथे पोहोचविण्यात येणार आहे. साईनगर शिर्डी येथून आज चौथी रेल्वे सोडण्यात आली असून तीन्ही तालुक्यातील परप्रांतीय कामगारांना उत्तर प्रदेशकडे नेणारी पहिलीच रेल्वे होती.
            राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या   पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. राज्याच्या विविध भागात अन्य राज्यातून आलेले कामगार, नागरिक,पर्यटक,विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या सर्वांना विहित प्रक्रिया राबवूव त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबधित तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना प्राधिकृत केले होते. यासंबधीची विहित प्रक्रिया राहाता, संगमनेर आणि कोरपगांव तहसील कार्यालयाने अन्य कार्यालयांच्या सहकार्याने पूर्ण केली. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे, निवासी नायब तहसीलदार योगेश कोतवाल, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतिश दिघे, कोपरगांव नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सामेनाथ वाकचौरे, सूर्यतेज सेवाभावी संस्था, कोपरगांवचे संस्थापक समन्वयक सुशांत घोडके, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, रेल्वेस्थानक व्यवस्थापक बी.एस.प्रसाद तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रक्रिया पार पाडून संबधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. पोलीस निरिक्षक नितीन गोकावे, दीपक गंधाले, मिथुन घुगे तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे रामजी मीना,अनुप देशमुख यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून संबधित कामगारांना तालुक्याच्या ठिकाणाहून शिर्डी रेल्वेस्थानक येथे आणण्यात आले होते.
            सर्व प्रवाशांना यावेळी साई संस्थान प्रशासनाच्यावतीने भोजनाचे पॅकेटस, पाणी, मास्क  पुरविण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्टेशनवर पुरेशा औषधांसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने संबधितांची आरोग्यविषयक तपासणी केली. सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन या सर्वांची रेल्वे डब्यात बसायची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या सहकार्याबद्दल याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. लॉकडाऊनमुळे शिर्डी येथे अडकून पडलेल्या 4 हजार 212 कामगारांना यापूर्वीच त्यांच्या मूळ गावी रेल्वेने पाठविण्यात आले आहे.
            स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लॉकडाऊन असतानाही तालुका प्रशासनाने तत्परतेने केलेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाणे शक्य झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी आहोत, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

शिर्डी( जय शर्मा )-शिर्डी येथून आज परप्रांतीयांना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात येणार असल्यामुळे शिर्डी व परिसरातील  परप्रांतीय मोठ्या संख्येने शिर्डीत  दाखले घेण्यासाठी  नगरपंचायत समोर  जमा झाल्याने येथे मोठी गर्दी दिसून येत होती, या परप्रांतीयाकडून लॉक डाऊन चे कोणतेही नियम पाळले जात नव्हते, सोशल डिस्टंन्सचा येथे फज्जा उडाला होता,शिर्डीतून आज शनिवारी दुपारी परप्रांतीयांना जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार होती, त्यामुळे अनेक परप्रांतीय आरोग्य तपासणी करून व आरोग्य प्रमाणपत्र घेऊन नगरपंचायत चा दाखला घेण्यासाठी नगरपंचायत समोर मोठ्या संख्येने जमा झाले होते त्यामुळे येथे मोठी गर्दी दिसून येत होती ,मात्र या परप्रांतीयाकडून सोशल डिस्टंन्स पाळले जात नव्हते, तसेच अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते, नगरपंचायत जवळच प्रांताधिकारी कार्यालय आहे, पण या गर्दीकडे कोणाचेही लक्ष नव्हते,  प्रशासनाने येथून रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वेनी जाणाऱ्या परप्रांतीयांसाठी नियोजन करणे महत्त्वाचे होते, मात्र तसे नियोजन येथे दिसून येत नव्हते, साईनगर रेल्वेस्टेशन वरून यापूर्वी तीन रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या व आज शनिवारी दुपारी ही चौथी रेल्वे  परप्रांतीयांना जाण्यासाठी सोडण्यात येण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली,
त्यामुळे  नगरपंचायत दाखला घेण्यासाठी या परप्रांतीयांना मोठी अडचण येत होती, तसेच शिर्डी नगरपंचायत  जवळून  साईनगर रेल्वे स्टेशनला सुमारे  दोन ते तीन किलोमीटर  अंतर सर्व बंद असल्यामुळे या परप्रांतीयांना  पायीच।डोक्यावर  सामान व मुलाबाळाना घेऊन  उन्हातानात  जातानाचे दृश्य  नगर-मनमाड रस्त्यावर दिसून येत होते, नगरपंचायत जवळील  गर्दीकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होताना दिसत होते, कोणीही त्यांना लॉकडाऊनचे नियम सांगण्यासाठी किंवा सोशल डिंस्टन्स पाळण्यासाठी सांगताना दिसत नव्हते, राहता तालुका कोरोनामुक्त असला तरी असा प्रकार शिर्डीत घडत राहीला तर दुर्दैवाने भविष्यात काहीही घडू शकते, शिर्डी व परिसरात  अजूनही मोठ्या प्रमाणात  वीट भट्टी,  बांधकाम  व इतर क्षेत्रात  कामासाठी आलेले परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत व  आपापल्या राज्यात जाण्यासाठी  या लोकांची संख्याही अाता मोठी आहे ,तरी याचा प्रशासनाने विचार करून  बस ,रेल्वे सोडण्यासाठी  व त्यांना दाखले मिळण्यासाठी व्यवस्थित  गर्दी न होता नियोजन करणे गरजेचे आहे,असे शिर्डीतून बोलले जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget