रेल्वेने जाणाऱ्या परप्रांतीयांची दाखला घेण्यासाठी न पं समोर मोठी गर्दी । लॉकडाऊनच्या नियमाचा उडाला फज्जा।

शिर्डी( जय शर्मा )-शिर्डी येथून आज परप्रांतीयांना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात येणार असल्यामुळे शिर्डी व परिसरातील  परप्रांतीय मोठ्या संख्येने शिर्डीत  दाखले घेण्यासाठी  नगरपंचायत समोर  जमा झाल्याने येथे मोठी गर्दी दिसून येत होती, या परप्रांतीयाकडून लॉक डाऊन चे कोणतेही नियम पाळले जात नव्हते, सोशल डिस्टंन्सचा येथे फज्जा उडाला होता,शिर्डीतून आज शनिवारी दुपारी परप्रांतीयांना जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार होती, त्यामुळे अनेक परप्रांतीय आरोग्य तपासणी करून व आरोग्य प्रमाणपत्र घेऊन नगरपंचायत चा दाखला घेण्यासाठी नगरपंचायत समोर मोठ्या संख्येने जमा झाले होते त्यामुळे येथे मोठी गर्दी दिसून येत होती ,मात्र या परप्रांतीयाकडून सोशल डिस्टंन्स पाळले जात नव्हते, तसेच अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते, नगरपंचायत जवळच प्रांताधिकारी कार्यालय आहे, पण या गर्दीकडे कोणाचेही लक्ष नव्हते,  प्रशासनाने येथून रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वेनी जाणाऱ्या परप्रांतीयांसाठी नियोजन करणे महत्त्वाचे होते, मात्र तसे नियोजन येथे दिसून येत नव्हते, साईनगर रेल्वेस्टेशन वरून यापूर्वी तीन रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या व आज शनिवारी दुपारी ही चौथी रेल्वे  परप्रांतीयांना जाण्यासाठी सोडण्यात येण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली,
त्यामुळे  नगरपंचायत दाखला घेण्यासाठी या परप्रांतीयांना मोठी अडचण येत होती, तसेच शिर्डी नगरपंचायत  जवळून  साईनगर रेल्वे स्टेशनला सुमारे  दोन ते तीन किलोमीटर  अंतर सर्व बंद असल्यामुळे या परप्रांतीयांना  पायीच।डोक्यावर  सामान व मुलाबाळाना घेऊन  उन्हातानात  जातानाचे दृश्य  नगर-मनमाड रस्त्यावर दिसून येत होते, नगरपंचायत जवळील  गर्दीकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होताना दिसत होते, कोणीही त्यांना लॉकडाऊनचे नियम सांगण्यासाठी किंवा सोशल डिंस्टन्स पाळण्यासाठी सांगताना दिसत नव्हते, राहता तालुका कोरोनामुक्त असला तरी असा प्रकार शिर्डीत घडत राहीला तर दुर्दैवाने भविष्यात काहीही घडू शकते, शिर्डी व परिसरात  अजूनही मोठ्या प्रमाणात  वीट भट्टी,  बांधकाम  व इतर क्षेत्रात  कामासाठी आलेले परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत व  आपापल्या राज्यात जाण्यासाठी  या लोकांची संख्याही अाता मोठी आहे ,तरी याचा प्रशासनाने विचार करून  बस ,रेल्वे सोडण्यासाठी  व त्यांना दाखले मिळण्यासाठी व्यवस्थित  गर्दी न होता नियोजन करणे गरजेचे आहे,असे शिर्डीतून बोलले जात आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget