राहाता तालुका कोरोनामुक्त राहण्यासाठी आरोग्य विभागाची मोठी धडपड।मात्र नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे--- डॉ,गागरे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राहता तालुका अद्यापपर्यंत कोरोना मुक्त आहे व या पुढेही कोरोना मुक्त राहावा यासाठी राहाता तालुक्यातील सर्व कोरोना वारियर्स मोठे प्रयत्न करत आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे, या तिसऱ्या टप्प्यात मात्र अनेक ठिकाणाहुन,काही शहरातील व्यक्ती ग्रामीण भागात, गावागावात येत आहेत, मात्र त्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे व तशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना, कोरोना ग्राम सुरक्षा समितीला देणे आवश्यक  आहे, असे आवाहन करण्यात येत आहे,राहाता तालुका यापुढेही कोरोना मुक्त रहावा, यासाठी सर्वजण आपापल्या परीने मोठा प्रयत्न करीत आहे ,त्यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका यांचाही मोठा हातभार आहे, राहाता तालुक्यात श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटल, प्रवरा हॉस्पिटल ,राहाता व पुणतांबा ग्रामीण रुग्णालये व सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तसेच उपकेंद्रे आहेत, या सर्व रुग्णालयील वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत ,राहता तालुक्यातील ग्रामीण भागातही ही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मोठी दक्षता घेण्यात येत आहे,
तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना ग्राम सुरक्षा समितीच्या स्थापना करण्यात आल्या आहेत, बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वॉरनटाईन किंवा संस्था विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे, त्यासाठी  प्रत्येक गावात  शाळा रूम किंवा अंगणवाडी रूम  ताब्यात घेऊन व्यवस्था करण्यात आली आहे, शिर्डी येथे साईबाबा संस्थान चे साई आश्रम फेज टू मध्ये विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे  ,लॉकडाउनमध्ये अडकलेल्या व काल उत्तरप्रदेश मधून आलेल्या काही परप्रांतीयांना दक्षता म्हणून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना  येथे विलगीकरण कक्षात  ठेवण्यात आले आहे , तसेच सावळीविहीर येथेही  दोन जणांना आरोग्य तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे,तसेच तालुक्यातुन आत्तापर्यंत  परप्रांतीय अनेक जण राहता तालुक्यातून  आपापल्या घरी ,परराज्यात  परतत आहेत, जात आहेत व जाणार आहेत, या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य प्रमाणपत्र देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथक करत आहेत, राहता तालुक्यातील शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्टेशन वरून उत्तर प्रदेश व।इतर  राज्यासाठी यापूर्वी तीन रेल्वे गेल्या आहेत, व आज शनिवारी चौथी रेल्वे परप्रांतीयना जाण्यासाठी सोडण्यात येत आहे, या सर्वांची आरोग्य तपासणी वैद्यकिय पथक करत असतात, तसेच शिर्डी बस स्थानकातूनही राज्यातील श्रमिक, मजूर, कामगार ,वीटभट्टी वरील कामगार यांना आपापल्या राज्यात,आपल्या गावी जाण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या आहेत, बसने जाणाऱ्या तसेच इतर वाहनातून जाणाऱ्या परप्रांतीय लोकांची आरोग्य तपासणी ही वैद्यकीय पथक करत आहे, शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे, सध्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहोरात्र काम सुरू असून या सर्व कामकाजासंदर्भात माहिती देताना राहता तालुक्यातील सावळीविहीर  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर गागरे यांनी सांगितले की , राहता तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, यामधील वैद्यकीय अधिकारी ,सर्व आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविका ,आशा वर्कर सर्वजण अहोरात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहे, शिर्डी येथे साई पालखी निवारा येथे 142 निराधार व परप्रांतीय लोकांना सुरक्षे साठी ठेवण्यात आले होते त्यांची भोजन व्यवस्था साईबाबा संस्थांनी केली होती, निवासाची व्यवस्था केली होती, त्यांची आरोग्य तपासणी सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येत होती, त्यातील काही टीबी व इतर आजाराचे रुग्ण यांची तपासणी व उपचार करून त्यांना विविध ठिकाणी पुढील उपचारासाठी  दाखल करण्यात आले तर काही बरे होऊन आपापल्या घरी त्यांना सोडण्यात आले, सावळीविहीर येथून दररोज परप्रांतीयांना आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र दिले जात आहे, परप्रांतीयांची हेळसांड होऊ नये म्हणून अहोरात्र प्रयत्न केले जात आहे, सध्या बाहेर गावावरून आपल्या गावात कोणी नवीन व्यक्ती आल्यास त्वरित ंसबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करावा तसेच त्या व्यक्तिने प्रथम आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे सांगत डॉक्टर गागरे पुढे म्हणाले की, परप्रांतीयांना जाण्यासाठी कोणतीही अडचण यायला नको म्हणून  लॉकडाउनचे नियम पाळत त्यांना आरोग्य तपासणी करून बस स्थानक म्हणा, रेल्वेस्टेशन म्हणा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे आरोग्य प्रमाणपत्र दिले जात आहे, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे व पं स,चे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे तसेच राहाता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी अहोरात्र त्यासाठी परिश्रम घेत आहे, नागरिकांनीही ही प्रशासनाला सहकार्य करावे, आपली स्वतःची, कुटुंबाची गावाची, राज्याचे, देशाची सुरक्षितता पाळण्यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळावेत, विनाकारण कुठेही फिरू नये गर्दी करू नये ,मास्क लावावे, जर कोरोना संदर्भात प्राथमिक लक्षणे वाटली तर त्वरित वैद्यकीय बअधिकारी किंवा  आरोग्यकर्मचाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहनही यावेळी डॉक्टर श्रीधर गागरे यांनी  केले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget