राहाता येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करणारे अटक १ लाख ६९ हजार ४०० रु.चा मुद्देमाल जप्त,एलसीबीची कारवाई.

 अहमदनगर दि.१६: राहाता येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून लुटमार करणारे ४ गुन्हेगारांना दोन गावठी कट्टे व ७ जिवंत काडतुसासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी आरोपी किरण सोनवणे याच्यावर एकूण ३५ गुन्हे तर विकी चावरे याच्यावर ६ गुन्हे दाखल असून, याबाबत अधिक चौकशी करून पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली. यावेळी श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार आदी उपस्थित होते.पकडण्यात आलेल्या मध्ये किरण उर्फ अँन्थोनी छगन सोनवणे
( वय ३२, रा.पेठरोड,आरटीओ आँफिसजवळ, अश्र्वमेघनगर, नाशिक), बाबासाहेब शिवाजी पगारे (वय २०, रा.शिंगवे, ता.राहाता), विकी विष्णु चावरे (वय २९, रा.खंडोबागल्ली, राहाता) अशी नावे आहेत. या आरोपींकडून ५० हजार रु.च्या दोन गावठी कट्टे, १ हजार ४०० रु. सात जिवंत काडतुसे व एक रिकामी पुंगळी, ३८ हजार रु.वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, ४० हजार रु.चे शाईन मोटारसायकल (एमएच १५, जीएन ८५२७), ४० हजार रु.चे पल्सर (एमएच २०, एडडब्लु ७७७२) असा एकूण १ लाख ६९ हजार ४०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि.१५ मे ला सायंकाळी ५.३० वा.सुमारास कँनाँलच्या बाजूने मोटारसायकलने घरी जात होते. यावेळी आरोपींनी मोटारसायकल आडवी लावून मारहाण करुन बंदुकीचा धाक दाखवून जवळील पैसे बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरडा केल्याने आजुबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी लोकांचा जमाव पाहून आरोपींनी हवेत गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमलेल्या लोकांनी आरोपीचा पाठलाग करून एकास (आरोपी नारायण रामचंद्र म्हस्के वय २५, रा.विश्रांतवाडी, भिमनगर,पुणे) पकडले. उर्वरित आरोपी शेतामध्ये पळून गेले. पकडलेल्या आरोपीसह गावकऱ्यांनी राहाता पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची विकास पोपट ताठे यांनी फिर्याद दिली होती. या घटनेचे गांभीर्या ओळखून श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली. पळलेल्या आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके शोधार्थ पाठविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार शिंगवे येथे जाऊन सापळा लावून मुख्य आरोपी किरण सोनवणे याला पकडले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच, अनिल शिंदे, बाबासाहेब पगारे, विकी चावरे असे मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या माहितीवरुन आरोपी शिंदे,पगारे, चावरे याना पकडून त्याच्याकडील दोन गावठी कट्ट्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींपैकी किरण सोनवणे याच्यावर अनेक गंभीर ३५ गुन्हे नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर आरोपी विकी चावरे याच्यावर राहाता, लोणी पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत. या पकडण्यात आलेल्या आरोपींची अधिक चौकशी करण्यात येणार आहे. त्यादष्टीने पुढील तपास करण्यात येणार असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने या वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, पथकातील पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ मनोहर गोसावी, दत्ता हिंगडे, पोना शंकर चौधरी, आण्णा पवार, रविंद्र कर्डीले, भागीनाथ पंचमुख, सुनील चव्हाण, सुरेश माळी, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आडबल, विशाल दळवी, योगेश सातपुते, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे, बबन बेरड, भरत बुधवंत आदिंच्या पथकाने ही महत्त्वाची कारवाई केली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget