Latest Post

अहमदनगर : शहरातील नगर-पुणे रोड वरील हॉटेल फरहतच्या शेजारी असलेल्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.उसवाल इंपिरियल चव्हाण व सेंथॉल अस्तनदूर काळे (रा.दोघे कुरणवस्ती, वाळूंज, ता. नगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी ३० एप्रिल रोजी रात्री बँकेच्या शाखेत घुसून आलाराम व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक विजयकुमार देवकरण वाडबुदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानंतर या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात नगर तालुका, कोतवाली, पारनेर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

कोरोनाच्या तिसर्या टप्यात काही ठिकाणी वाईन शॉपला अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली असली तरी काही ठिकाणी शोषलं डिस्टन्स चा फज्जा उडाल्यामुळे अनेक ठिकाणी वाईन शॉप बंद करून वाईन शॉप मालकावर गुन्हे दाखल झालेले उदहारण ताजे असतांना मात्र श्रीरामपूर येथे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेले महाराष्ट्र वाईन शॉपवर प्रचंड गर्दी जमलेली आहे तेथे
बाउंसरही असतांना गर्दी होत आहे कुठलेही शोषलं डिस्टन्स नाही व काही मद्य खरेदीला  आलेल्या काही लोकांनी माक्स हि घातलेले दिसत नाहीत विशेष म्हणजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे आणि मुख्य रस्त्यावर हे वाईन शॉप आहे त्या रोड वरून अनेक अधिकारी यांचे येणे जाणे आहे असे असतांना कोणी का दाखल घेत नाही अशे श्रीरामपूर येथील जागरूक नागरिक बोलत आहेत श्रीरामपुरात एकूण पाच वाईन शॉप आहेत परंतु दिशेच्या वादामुळे शहरात एकमेव हे वाईन शॉप चालू असल्याने येथे प्रचंड गर्दी जमली आहे आणि वाईन शॉप मालकाने येथे बाउन्सर ठेवूनही मद्य घेणारे कुठलेही नियम अटींचे पालन करीत नाही अशी परिस्तिथी सर्व श्रीरामपूरकर बघत आहेत यावर कोणी दखल घेईल का अशी चर्चा ही  रंगत  आहे जर अशीच परिस्तिथी राहिलीतर मोठी घटनाही घडण्याचे धोखे निर्माण होतील अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे यावर लवकरात लवकर शासनाने लक्ष घालावे हि मागणी जोर धरू लागली आहे.



* रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ 9 लाख 47 हजार 700 रुपये अदा केले शासनाने
* राहाता, संगमनेर व कोपरगांव तालुक्यातील कामगार
* वैद्यकीय तपासणी करुन प्रशासनाने पुरविल्या विविध सुविधा
 * साईनगर शिर्डी येथून चौथी रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना
            शिर्डी,प्रतिनिधी जय शर्मा: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील उत्तर प्रदेश राज्यातील 1519 कामगार व त्यांचे कुटुंबिय आज साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हयाकडे रवाना झाले. यापैकी 1 हजार 404 प्रौढ कामगारांचे रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ रुपये 675 प्रमाणे एकूण 9 लाख 47 हजार 700 एवढे भाडे महाराष्ट्र शासनातर्फे अदा करण्यात आले आहे. रोजगारानिमित्त हे सर्व जण उपरोक्त तीन तालुक्यातंत वास्तव्यास होते. या कामगारांना उत्तर प्रदेशातील उन्नाव, सीतापूर व बस्ती येथे पोहोचविण्यात येणार आहे. साईनगर शिर्डी येथून आज चौथी रेल्वे सोडण्यात आली असून तीन्ही तालुक्यातील परप्रांतीय कामगारांना उत्तर प्रदेशकडे नेणारी पहिलीच रेल्वे होती.
            राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या   पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. राज्याच्या विविध भागात अन्य राज्यातून आलेले कामगार, नागरिक,पर्यटक,विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या सर्वांना विहित प्रक्रिया राबवूव त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबधित तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना प्राधिकृत केले होते. यासंबधीची विहित प्रक्रिया राहाता, संगमनेर आणि कोरपगांव तहसील कार्यालयाने अन्य कार्यालयांच्या सहकार्याने पूर्ण केली. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे, निवासी नायब तहसीलदार योगेश कोतवाल, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतिश दिघे, कोपरगांव नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सामेनाथ वाकचौरे, सूर्यतेज सेवाभावी संस्था, कोपरगांवचे संस्थापक समन्वयक सुशांत घोडके, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, रेल्वेस्थानक व्यवस्थापक बी.एस.प्रसाद तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रक्रिया पार पाडून संबधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. पोलीस निरिक्षक नितीन गोकावे, दीपक गंधाले, मिथुन घुगे तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे रामजी मीना,अनुप देशमुख यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून संबधित कामगारांना तालुक्याच्या ठिकाणाहून शिर्डी रेल्वेस्थानक येथे आणण्यात आले होते.
            सर्व प्रवाशांना यावेळी साई संस्थान प्रशासनाच्यावतीने भोजनाचे पॅकेटस, पाणी, मास्क  पुरविण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्टेशनवर पुरेशा औषधांसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने संबधितांची आरोग्यविषयक तपासणी केली. सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन या सर्वांची रेल्वे डब्यात बसायची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या सहकार्याबद्दल याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. लॉकडाऊनमुळे शिर्डी येथे अडकून पडलेल्या 4 हजार 212 कामगारांना यापूर्वीच त्यांच्या मूळ गावी रेल्वेने पाठविण्यात आले आहे.
            स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लॉकडाऊन असतानाही तालुका प्रशासनाने तत्परतेने केलेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाणे शक्य झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी आहोत, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

शिर्डी( जय शर्मा )-शिर्डी येथून आज परप्रांतीयांना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात येणार असल्यामुळे शिर्डी व परिसरातील  परप्रांतीय मोठ्या संख्येने शिर्डीत  दाखले घेण्यासाठी  नगरपंचायत समोर  जमा झाल्याने येथे मोठी गर्दी दिसून येत होती, या परप्रांतीयाकडून लॉक डाऊन चे कोणतेही नियम पाळले जात नव्हते, सोशल डिस्टंन्सचा येथे फज्जा उडाला होता,शिर्डीतून आज शनिवारी दुपारी परप्रांतीयांना जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार होती, त्यामुळे अनेक परप्रांतीय आरोग्य तपासणी करून व आरोग्य प्रमाणपत्र घेऊन नगरपंचायत चा दाखला घेण्यासाठी नगरपंचायत समोर मोठ्या संख्येने जमा झाले होते त्यामुळे येथे मोठी गर्दी दिसून येत होती ,मात्र या परप्रांतीयाकडून सोशल डिस्टंन्स पाळले जात नव्हते, तसेच अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते, नगरपंचायत जवळच प्रांताधिकारी कार्यालय आहे, पण या गर्दीकडे कोणाचेही लक्ष नव्हते,  प्रशासनाने येथून रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वेनी जाणाऱ्या परप्रांतीयांसाठी नियोजन करणे महत्त्वाचे होते, मात्र तसे नियोजन येथे दिसून येत नव्हते, साईनगर रेल्वेस्टेशन वरून यापूर्वी तीन रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या व आज शनिवारी दुपारी ही चौथी रेल्वे  परप्रांतीयांना जाण्यासाठी सोडण्यात येण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली,
त्यामुळे  नगरपंचायत दाखला घेण्यासाठी या परप्रांतीयांना मोठी अडचण येत होती, तसेच शिर्डी नगरपंचायत  जवळून  साईनगर रेल्वे स्टेशनला सुमारे  दोन ते तीन किलोमीटर  अंतर सर्व बंद असल्यामुळे या परप्रांतीयांना  पायीच।डोक्यावर  सामान व मुलाबाळाना घेऊन  उन्हातानात  जातानाचे दृश्य  नगर-मनमाड रस्त्यावर दिसून येत होते, नगरपंचायत जवळील  गर्दीकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होताना दिसत होते, कोणीही त्यांना लॉकडाऊनचे नियम सांगण्यासाठी किंवा सोशल डिंस्टन्स पाळण्यासाठी सांगताना दिसत नव्हते, राहता तालुका कोरोनामुक्त असला तरी असा प्रकार शिर्डीत घडत राहीला तर दुर्दैवाने भविष्यात काहीही घडू शकते, शिर्डी व परिसरात  अजूनही मोठ्या प्रमाणात  वीट भट्टी,  बांधकाम  व इतर क्षेत्रात  कामासाठी आलेले परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत व  आपापल्या राज्यात जाण्यासाठी  या लोकांची संख्याही अाता मोठी आहे ,तरी याचा प्रशासनाने विचार करून  बस ,रेल्वे सोडण्यासाठी  व त्यांना दाखले मिळण्यासाठी व्यवस्थित  गर्दी न होता नियोजन करणे गरजेचे आहे,असे शिर्डीतून बोलले जात आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राहता तालुका अद्यापपर्यंत कोरोना मुक्त आहे व या पुढेही कोरोना मुक्त राहावा यासाठी राहाता तालुक्यातील सर्व कोरोना वारियर्स मोठे प्रयत्न करत आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे, या तिसऱ्या टप्प्यात मात्र अनेक ठिकाणाहुन,काही शहरातील व्यक्ती ग्रामीण भागात, गावागावात येत आहेत, मात्र त्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे व तशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना, कोरोना ग्राम सुरक्षा समितीला देणे आवश्यक  आहे, असे आवाहन करण्यात येत आहे,राहाता तालुका यापुढेही कोरोना मुक्त रहावा, यासाठी सर्वजण आपापल्या परीने मोठा प्रयत्न करीत आहे ,त्यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका यांचाही मोठा हातभार आहे, राहाता तालुक्यात श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटल, प्रवरा हॉस्पिटल ,राहाता व पुणतांबा ग्रामीण रुग्णालये व सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तसेच उपकेंद्रे आहेत, या सर्व रुग्णालयील वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत ,राहता तालुक्यातील ग्रामीण भागातही ही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मोठी दक्षता घेण्यात येत आहे,
तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना ग्राम सुरक्षा समितीच्या स्थापना करण्यात आल्या आहेत, बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वॉरनटाईन किंवा संस्था विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे, त्यासाठी  प्रत्येक गावात  शाळा रूम किंवा अंगणवाडी रूम  ताब्यात घेऊन व्यवस्था करण्यात आली आहे, शिर्डी येथे साईबाबा संस्थान चे साई आश्रम फेज टू मध्ये विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे  ,लॉकडाउनमध्ये अडकलेल्या व काल उत्तरप्रदेश मधून आलेल्या काही परप्रांतीयांना दक्षता म्हणून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना  येथे विलगीकरण कक्षात  ठेवण्यात आले आहे , तसेच सावळीविहीर येथेही  दोन जणांना आरोग्य तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे,तसेच तालुक्यातुन आत्तापर्यंत  परप्रांतीय अनेक जण राहता तालुक्यातून  आपापल्या घरी ,परराज्यात  परतत आहेत, जात आहेत व जाणार आहेत, या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य प्रमाणपत्र देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथक करत आहेत, राहता तालुक्यातील शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्टेशन वरून उत्तर प्रदेश व।इतर  राज्यासाठी यापूर्वी तीन रेल्वे गेल्या आहेत, व आज शनिवारी चौथी रेल्वे परप्रांतीयना जाण्यासाठी सोडण्यात येत आहे, या सर्वांची आरोग्य तपासणी वैद्यकिय पथक करत असतात, तसेच शिर्डी बस स्थानकातूनही राज्यातील श्रमिक, मजूर, कामगार ,वीटभट्टी वरील कामगार यांना आपापल्या राज्यात,आपल्या गावी जाण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या आहेत, बसने जाणाऱ्या तसेच इतर वाहनातून जाणाऱ्या परप्रांतीय लोकांची आरोग्य तपासणी ही वैद्यकीय पथक करत आहे, शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे, सध्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहोरात्र काम सुरू असून या सर्व कामकाजासंदर्भात माहिती देताना राहता तालुक्यातील सावळीविहीर  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर गागरे यांनी सांगितले की , राहता तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, यामधील वैद्यकीय अधिकारी ,सर्व आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविका ,आशा वर्कर सर्वजण अहोरात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहे, शिर्डी येथे साई पालखी निवारा येथे 142 निराधार व परप्रांतीय लोकांना सुरक्षे साठी ठेवण्यात आले होते त्यांची भोजन व्यवस्था साईबाबा संस्थांनी केली होती, निवासाची व्यवस्था केली होती, त्यांची आरोग्य तपासणी सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येत होती, त्यातील काही टीबी व इतर आजाराचे रुग्ण यांची तपासणी व उपचार करून त्यांना विविध ठिकाणी पुढील उपचारासाठी  दाखल करण्यात आले तर काही बरे होऊन आपापल्या घरी त्यांना सोडण्यात आले, सावळीविहीर येथून दररोज परप्रांतीयांना आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र दिले जात आहे, परप्रांतीयांची हेळसांड होऊ नये म्हणून अहोरात्र प्रयत्न केले जात आहे, सध्या बाहेर गावावरून आपल्या गावात कोणी नवीन व्यक्ती आल्यास त्वरित ंसबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करावा तसेच त्या व्यक्तिने प्रथम आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे सांगत डॉक्टर गागरे पुढे म्हणाले की, परप्रांतीयांना जाण्यासाठी कोणतीही अडचण यायला नको म्हणून  लॉकडाउनचे नियम पाळत त्यांना आरोग्य तपासणी करून बस स्थानक म्हणा, रेल्वेस्टेशन म्हणा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे आरोग्य प्रमाणपत्र दिले जात आहे, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे व पं स,चे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे तसेच राहाता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी अहोरात्र त्यासाठी परिश्रम घेत आहे, नागरिकांनीही ही प्रशासनाला सहकार्य करावे, आपली स्वतःची, कुटुंबाची गावाची, राज्याचे, देशाची सुरक्षितता पाळण्यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळावेत, विनाकारण कुठेही फिरू नये गर्दी करू नये ,मास्क लावावे, जर कोरोना संदर्भात प्राथमिक लक्षणे वाटली तर त्वरित वैद्यकीय बअधिकारी किंवा  आरोग्यकर्मचाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहनही यावेळी डॉक्टर श्रीधर गागरे यांनी  केले आहे.

राहाता (तालुका प्रतिनिधी)राहाता शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार झाला असून जमावाने एका आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर दोघे पसार झाले. राहाता पोलिसांनी तिघा जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.तीन दिवसांपूर्वी राहाता येथील गोदावरी कालव्यावरील पत्री पुलाजवळ वैभव ताठे या तरुणास, या तीन आरोपींनी मारहाण करून त्याच्याकडील सहा हजार रुपये बळजबरीने चोरून नेले. सदर आरोपी काल शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास याच परिसरात पल्सर मोटार सायकलवर फिरताना, वैभव ताठे यास दिसून आले.ताठे याने याबाबतची माहिती आपल्या भावाला आणि सहकार्‍यांना दिली. त्यांनतर संबंधित सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने मदतीला धावून येऊन त्यांनी आरोपीला घेरले. पल्सर मोटारसायकलवर असलेल्या तीन आरोपींनी मोटारसायकल तेथेच टाकून बाजूच्या शेतामध्ये पळ काढला. त्यांचा पाठलाग करत जमाव त्यांच्यामागे धावला. यावेळी आरोपीतील एकाने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून जमावाच्या दिशेने गोळीबार केला. तर एकाने हातातील कोयता उगारला आणि परत पळ काढला. पळत असताना यातील हातात कोयता असलेला आरोपी शेतातील बांधाला पाय अडकून पडल्याने नागरिकांच्या तावडीत सापडला तर दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली आणि राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली.राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाने पकडलेल्या आरोपीस ताब्यात घेत दोघा पसार आरोपींचा नागरिकांसह परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत ते दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर घटनेची माहिती काळताच श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी केली तर तपसाबाबत सूचना केल्या.यातील नारायण म्हस्के या आरोपीस राहाता पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात वैभव ताठे याच्या फिर्यादीवरून जबरी चोरी आणि आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस करत आहेत.सदर आरोपींच्या मागावर तीन दिवसांपासून श्रीरामपूरचे पोलीसही असल्याचे कळते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) शहराच्या साठवण तलावांमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या गोंधवणी येथील साठवण तलावात शुक्रवारी एक मृतदेह अढळला. सोमनाथ नारायण आव्हाड (वय 40. रा, नवीन घरकुल, पाण्याच्या टाकीजवळ) असे मृताचे नाव आहे. हा तीन दिवसांपासून घरातुन बेपत्ता झाला होता. तलावातील पाण्यात शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलीस आणि पालिका प्रशासनाला दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह पाण्याबाहेर काढला. पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविलात्यामुळे नगरपालिकेने याबाबत तातडीने दखल घेत तलाव काठोकाठ भरलेला असल्यामुळे त्यामध्ये पावडर टाकून निर्जंतुकीकरण केले असून ज्या तलावांमध्ये मृतदेह सापडला त्या तलावाचे पाणी सध्या वापरले जात नसल्याचे आज आढळून आले.
 साठवण तलावांमध्ये मृतदेह सापडल्यामुळे शहरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क केला असता दोन दिवसापूर्वी सदर इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून आज तो मृतदेह वर आला होता. त्यामुळे तो तातडीने पाण्याबाहेर काढण्यात आला.  पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही अशी माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या संदर्भात माहिती घेण्यासाठी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी इत्यादींना वारंवार संपर्क करूनही त्यांचे फोन लागत नव्हते. ज्यांचे वाजत होते, त्यांनी फोनच घेतला नाही. त्यामुळे आमच्या प्रतिनिधीने  साठवण तलावावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता नवीन साठवण तलावांमध्ये कॅनलमधून पाणी येण्याचे सुरू असून तलाव जवळजवळ भरत आला आहे . तेथील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता तलावांमध्ये ब्लिचिंग पावडर च्या गोण्या सोडून पाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगण्यात आले.
 तलावाची सुरक्षा वाऱ्यावर

 दरम्यान साठवण तलावाच्या संरक्षण भिंतीची एक बाजू तुटली असून पाण्याच्या टाकीजवळ भिंत तुटल्याने बाहेरचे लोक सर्रास तेथे शिरतात. टाकीवर बसून जुगार खेळतात.तेथील तलावाला वर लावलेली सुरक्षा जाळी सुद्धा तुटलेली आढळली. कोणताही वाचमेन तेथे नव्हता .शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या सुरक्षेबद्दल खूपच हलगर्जीपणा होत असून याबाबत नगरपालिकेने तातडीने पावले उचलण्याची मागणी शहरातील जागरुक नागरिकांनी केली आहे .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget